मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

राशीभविष्य: या राशीचे नोकरीचे प्रयत्न येतील फळाला; कुणाला बुध लाभणार पाहा

राशीभविष्य: या राशीचे नोकरीचे प्रयत्न येतील फळाला; कुणाला बुध लाभणार पाहा

आज बुधवार  दिनांक18 ऑगस्ट 2021. तिथी श्रावण शुद्ध एकादशी. बुध पूजन.

आज बुधवार दिनांक18 ऑगस्ट 2021. तिथी श्रावण शुद्ध एकादशी. बुध पूजन.

आज बुधवार दिनांक18 ऑगस्ट 2021. तिथी श्रावण शुद्ध एकादशी. बुध पूजन.

आज बुधवार  दिनांक18 ऑगस्ट 2021. तिथी श्रावण शुद्ध एकादशी. बुध पूजन. आजचे ग्रहमान अणि चंद्र भ्रमण  यावर आधारित हे राशीभविष्य  बघू या. आज चंद्र धनु राशीत असेल. तर सूर्य सिंह राशीत असेल. मंगळ आणि बुध भ्रमण सिंह राशीत असून शुक्र कन्या राशीत आहे. मेष आज भाग्य स्थानातील चंद्र भ्रमण सुखद आणि हवे हवेसे अनुभव देईल. तुमचा मान सन्मान वाढेल.  घरात काही विशेष  बोलणी सुरू होतील. प्रकृती  चांगली राहील. दिवस उत्तम आहे. वृषभ आज वृषभ राशीच्या व्यक्ती साठी  दिवस ताण तणावाचा आहे. उगीच थकवा  जाणवेल. आर्थिक बाजू उत्तम असली तरी घरांमधे खर्च वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबात मतभेद  होतील. दिवस मध्यम  आहे. मिथुन आज गुरुवार व्यवसाय  आणि नोकरीसाठी उत्तम असून जोडीदाराची मदत मिळेल. आर्थिक स्थिती ठीक राहील. बुध डोक्यात नवीन कल्पना  आणेल. पण  घाईने निर्णय घेऊ नका. दिवस बरा जाईल. कर्क आज दिवस  संथ, अणि कंटाळवाणा असेल. खूप काम पडेल  पण मन रमणार नाही. आर्थिक बाजू ठीक आहे. अचानक मोठा खर्च येऊ शकतो. गुरूची उपासना करावी. दिवस मध्यम. सिंह आज संतती साठी काही तरी  विशेष करावे लागेल. त्यासाठी खर्च ही होईल. जोडीदारा शी संबंध बिघडण्याची शक्यता आहे. धार्मिक गोष्टी मध्ये वेळ घालवाल. प्रकृती जपा. काहींना अचानक परदेश प्रवास संभवतो. दिवस शुभ. कन्या आज सगळा वेळ घरासाठी द्यावा लागेल. त्यात  साफसफाई, काही नवीन सजावट  कराल. आर्थिक बाजु जपा. जास्तीचे खर्च उभे राहतील. मंगळाचा जप करा. दिवस बरा जाईल. तुला आज छोटा प्रवास घडेल. लाभ स्थानातील बुध  नवीन संधी मिळवुन देईल. धैर्य आणि चिकाटी वाढवेल. नोकरीच्या ठिकाणी तुमचे महत्व वाढेल .सूर्य मंगळ  नोकरीच्या ठिकाणी सांभाळून रहा  आणि काळजी घ्या असे सांगतो आहे. वृश्चिक आर्थिक लाभ संभवतात. बुद्धीचा वापर करून एखादे काम  तुमच्या हाताने  छान पार पडेल. कार्यक्षेत्रात तुमचा  प्रभाव वाढेल. नवीन नोकरीसाठी प्रयत्‍न केला तर यश मिळेल. दिवस उत्तम जाईल. धनु भाग्यात सूर्य मंगळ वडीलधारी व्यक्ती काही लाभ मिळवून देईल. धार्मिक कामात रुची वाढेल.  काहींना भावंडाची साथ मिळेल. दिवस चांगला जाईल . मकर अष्टमात आलेला मंगळ जपून राहण्याचे संकेत देत आहे. कुटुंबात नवीन व्यक्तीचे आगमन होईल. मधल्या काळात बरेच सोसावे लागले. आता त्याची तीव्रता कमी होईल. गुरुकृपा राहील. दिवस शुभ कुंभ राशीतील गुरू  अणि लाभातील चंद्र  शुभ फळ देतील. जोडीदाराची काळजी घ्या. काही खर्च ही होईल. भागीदारीचे  निर्णय  चुकू शकतात. खर्च वाढेल. पण लाभ ही होतील. दिवस उत्तम जाईल. मीन आज चा दिवस हा गुरू सेवा करण्याचा आहे. मंगळाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.त्यासाठी  सावध रहा. तुमच्या चांगल्या स्वभावामुळे शत्रू टिकणार नाहीत कार्यालयात जास्त काम पडेल .दिवस मध्यम जाईल. शुभम भवतु!!
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या