Home /News /astrology /

दैनंदिन राशिभविष्य : या राशीचा साडेसातीचा काळ सुरू; सांभाळून राहावं

दैनंदिन राशिभविष्य : या राशीचा साडेसातीचा काळ सुरू; सांभाळून राहावं

Horoscope 17 May 2022 : शनीचा कुंभ राशीत प्रवेश झाला असून तिथे असलेल्या मंगळाचा आज मीन राशीत प्रवेश होईल.

आज दिनांक 17 मे 2022 मंगळवार. आज वैशाख कृष्ण प्रतिपदा. शनीचा कुंभ राशीत प्रवेश झाला असून तिथे असलेल्या मंगळाचा आज मीन राशीत प्रवेश होईल. मीन राशीला साडेसातीचा काळ सुरू आहे. आज चंद्र तूळ राशीत असून पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष सप्तम चंद्र आणि लाभ स्थानातील शनि मानसिक ताण निर्माण करतील. व्यय गुरू शुक्र धार्मिक, कौटुंबिक कारणांसाठी खर्च करवतील. दिवस मध्यम. वृषभ दशम स्थानातील शनी पितृ चिंता, कार्यक्षेत्रात अडचणी निर्माण करेल. चंद्राचे षष्ठ स्थानातील भ्रमण नुकसान, आर्थिक चिंता दाखवत आहे. दिवस जपून राहण्याचा आहे. मिथुन राशीच्या अष्टम स्थानातून निघालेला शनी फार मोठा बदल करेल. प्रकृती ठिक राहिल. नवीन संधी मिळतील. संतती सुख मिळेल. चंद्र भ्रमण प्रवासाचे योग आणेल. दिवस बरा आहे. कर्क अष्टम स्थानात प्रवेश करणारा शनी काही काळ सावधगिरीचा इशारा देत आहे. प्रवास टाळा. नुकसान होण्याची शक्यता. चतुर्थ चंद्र गृहक्षेत्रात घडामोडी होतील. दिवस उत्तम. सिंह सप्तम स्थानात शनी जोडीदाराची काळजी घ्या असा इशारा देत आहे. व्यवसाय जपून करा. चंद्र भ्रमण शुभ असून धार्मिक पूजा इत्यादी कराल. दिवस शुभ. कन्या षष्ठ स्थानातील शनि शत्रूपासून सुटका देतील. तुमचाच विजय होईल. चंद्र भ्रमण आर्थिक लाभ देईल. अष्टम राहू घातक असून प्रकृती जपा. दिवस मध्यम. तूळ संतती चिंता, शिक्षणात अनपेक्षित अडचणी असा हा काळ थोडा जपून राहण्याचा आहे. पोटाची काळजी घ्या. चंद्र भ्रमण जोडीदारासोबत वेळ घालवा असं सुचवत आहे. वृश्चिक राशी स्वामी मंगळ गुरूसोबत पंचम स्थानात येत असून संतती किंवा शैक्षणिक क्षेत्रात जपण्याचे संकेत देत आहे. प्रकृती जपा. दिवस मध्यम. धनु चतुर्थ स्थानात गुरू शुक्र वास्तू योग आणतील. भावंडं भेटतील. त्यांना जपा. संततीसोबत काही वेळ घालवा. दिवस उत्तम. मकर राशीतून पुढे जाणारा शनी आणि तृतीय मंगळ हा एक मोठा बदल आहे. आर्थिक बाजू सांभाळा. कुटुंबात काही घटना घडतील. घरामध्ये विशेष काम निघेल. उत्तम दिवस . कुंभ राशीमध्ये प्रवेश केलेला शनी जपून राहण्याचे संकेत देत आहे. प्रवास योग येतील. काळजी घ्या. भाग्य चंद्र लाभ होण्याची शक्यता. दिवस उत्तम. मीन व्यय स्थानातील शनी आणि राशीत येणारा मंगळ जपून राहण्याचा संकेत देत आहे. आर्थिक लाभ संभवतो. प्रवास योग येतील. राशीतील गुरू शुक्र शुभ फल देतील. दिवस उत्तम. शुभम भवतू!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या