Home /News /astrology /

दैनंदिन राशिभविष्य : 'या' राशीची जोडीदाराची प्रतीक्षा संपणार; पाहा तुमची रास तर नाही ना?

दैनंदिन राशिभविष्य : 'या' राशीची जोडीदाराची प्रतीक्षा संपणार; पाहा तुमची रास तर नाही ना?

Horoscope 16 June 2022 : आजचे बारा राशींचे राशीभविष्य.

आज दिनांक 16 जून 2022. गुरुवार ज्येष्ठ कृष्ण द्वितीया. चंद्राचे भ्रमण धनू राशीतून होणार आहे. पाहूया आजचे बारा राशींचे राशीभविष्य. मेष गुरू आणि चंद्र अध्यात्मिक उन्नती शैक्षणिक लाभ दाखवीत आहे. परदेशसंबंधी शुभ समाचार मिळतील. आर्थिक लाभ, प्रवास संभवतात. दिवस उत्तम. वृषभ लाभस्थानात आलेला गुरू अतिशय शुभ असून संतती प्राप्तीसाठी अनुकूल फळ देईल. घरामध्ये शुभकार्य घडेल. मातृपितृ सुख लाभेल. अष्टम चंद्र मानसिक ताण देईल. आर्थिकदृष्ट्या दिवस शुभ. मिथुन राशीच्या कर्म स्थानात येणारा गुरू घर आणि कार्यक्षेत्रात यश देईल. आईवडिलांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होईल. जोडीदाराला लाभ होण्याची शक्यता आहे. दिवस उत्तम. कर्क भाग्यस्थानातील गुरू अचानक सगळ्या क्षेत्रात यश, लाभ मिळवून देईल. अनेक दिवसापासून अडकलेली काम मार्गी लागतील. आर्थिक हानीपासून जपावं. प्रकृतीत सुधार होईल. दिवस बरा. सिंह अष्टम गुरू प्रकृतीची चिंता निर्माण करेल. पंचम स्थानातील चंद्र सामाजिक प्रतिष्ठा दाखवत आहे. संततीला वेळ द्या. दिवस शांतपणे व्यतीत करा. कन्या राशीच्या जातकांचे जोडीदारासोबत असलेले संबंध मधुर होतील. अविवाहित व्यक्तींना साथीदार मिळेल. नवीन पर्वाची सर्वात होईल. धनू चंद्र मन आनंदी ठेवेल. दिवस उत्तम आहे. तूळ तृतीय स्थानात आलेला चंद्र नोकरी, आर्थिक व्यवहार, कर्जमुक्ती यासाठी शुभ असून मानसिक ताण कमी करणार आहे. प्रवास योग येतील. दिवस उत्तम. वृश्चिक संततीसाठी अतिशय शुभ फल देणारा गुरू उच्च शिक्षणात देखील मदत करेल. कार्यक्षेत्रात लाभ होतील. नवीन जबाबदारी येईल. द्वितीय चंद्र, आर्थिक लाभ होतील. दिवस उत्तम धनू राशी स्थानात येणारा गुरू गृह सौख्य, नवीन वास्तू, वाहन मिळवून देईल. भाग्यकारक घटना घडतील. शुभ आणि अध्यात्मिक अनुभव येतील. दिवस शुभ. मकर देश-विदेशचे प्रवास, भावंडांची भरभराट असा हा काळ आहे. वाणी तेजस्वी होईल. चंद्रभ्रमण संततीला जपून राहण्याचे संकेत देत आहे. कुंभ राशीच्या धन स्थानात येणारा गुरू कौटुंबिक, आर्थिक सुखात वाढ करेल. गृहसौख्य मिळेल. जोडीदाराला शुभ काळ. दिवस उच्च प्रतीचे अनुभव देईल. मीन राशीमध्ये आलेला गुरू विचारी आणि स्थिर व्यक्तिमत्व देईल. विचार सुधारतील. तेजस्वी व्यक्तिमत्व होईल. चंद्रभ्रमण प्रवासात काळजी घ्या असं सुचवत आहे. शुभम भवतू!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या