मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /दैनंदिन राशिभविष्य : या 8 राशींवर गुरूची कृपा; कुणाला काय लाभ होणार, काय फळ मिळणार पाहा

दैनंदिन राशिभविष्य : या 8 राशींवर गुरूची कृपा; कुणाला काय लाभ होणार, काय फळ मिळणार पाहा

Marathi Horoscope 15 May 2022 : तुमचा रविवार कसा जाणार पाहा तुमचं राशिभविष्य.

Marathi Horoscope 15 May 2022 : तुमचा रविवार कसा जाणार पाहा तुमचं राशिभविष्य.

Marathi Horoscope 15 May 2022 : तुमचा रविवार कसा जाणार पाहा तुमचं राशिभविष्य.

आज दिनांक 15 मे 2022. रविवार. वैशाख पौर्णिमा आज आणि उद्या सकाळी नऊपर्यंत असून चंद्राचे भ्रमण कन्या राशीतून होणार आहे. पाहूया आजचे बारा राशींचे राशीभविष्य.

मेष

गुरू, चंद्र अध्यात्मिक उन्नती, शैक्षणिक लाभ दाखवत आहे.  परदेशसंबंधी शुभ समाचार मिळतील. आर्थिक लाभ संभवतात. दिवस उत्तम.

वृषभ

लाभ स्थानात आलेला गुरू अतिशय शुभ असून संतती प्राप्तीसाठी अनुकूल फळ देईल. घरामध्ये शुभकार्य घडेल. मातृ पितृ सुख लाभेल. राशीतील चंद्र मनस्वास्थ्य देईल. दिवस शुभ.

मिथुन

राशीच्या कर्मस्थानात येणारा गुरू घर आणि कार्यक्षेत्रात यश देईल. आईवडिलांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होईल. आर्थिक व्यय, वाहन दुरुस्ती होण्याची शक्यता आहे. दिवस उत्तम.

कर्क

भाग्य स्थानातील गुरू शुक्र अचानक सगळ्या क्षेत्रात यश, लाभ मिळवून देईल. अनेक दिवसापासून अडकलेली काम मार्गी लागतील. आर्थिक हानीपासून जपावं. प्रकृतीत सुधार होईल. दिवस बरा.

सिंह

अष्टम गुरू प्रकृतीची चिंता निर्माण करेल. तृतीय स्थानातील चंद्र कार्यालयात उलाढाल दाखवत आहे. दिवस शांतपणे व्यतीत करा.

कन्या

राशीच्या जातकांचे जोडीदारासोबत असलेले संबंध मधुर होतील. अविवाहित व्यक्तींना साथीदार मिळेल. नवीन पर्वाची सुरुवात होईल. धन चंद्र मन आनंदी ठेवेल. दिवस उत्तम आहे.

तूळ

व्यय स्थानात आलेला चंद्र नोकरी, आर्थिक व्यवहार, कर्जमुक्ती यासाठी शुभ असून मानसिक ताण देणार आहे. दिवस उत्तम.

वृश्चिक

संततीसाठी अतिशय शुभ फल देणारा गुरू उच्च शिक्षणातदेखील मदत करेल. कार्यक्षेत्रात लाभ होतील. नवीन जबाबदारी येईल. दिवस शुभ .

धनु

चतुर्थ स्थानात येणारा गुरू शुक्र गृह सौख्य, नवीन वास्तू, वाहन मिळवून देईल. भाग्यकारक घटना घडतील. शुभ आणि अध्यात्मिक अनुभव येतील. दिवस शुभ.

मकर

देश विदेशचे प्रवास, भावंडांशी भरभराट असा हा काळ आहे. वाणी तेजस्वी होईल. चंद्र भ्रमण संततीला जपून राहण्याचे संकेत देत आहे.

कुंभ

राशीच्या धन स्थानात येणारा गुरू शुक्र मंगळ कौटुंबिक, आर्थिक सुखात वाढ करेल. गृहसौख्य मिळेल. जोडीदाराला शुभ काळ. दिवस उच्च प्रतीचे अनुभव देईल.

मीन

राशीमध्ये आलेला गुरू परीपक्व आणि स्थिर व्यक्तिमत्व देईल. विचार सुधारतील. तेजस्वी व्यक्तिमत्व होईल. चंद्र भ्रमण प्रवासात काळजी घ्या असं सुचवत आहे.

शुभम भवतू!!

First published:
top videos

    Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs