Home /News /astrology /

Daily Horoscope : जास्तीचा खर्च होईल, घरी पाहुणे येण्याची शक्यता; वाचा कसा जाईल दिवस

Daily Horoscope : जास्तीचा खर्च होईल, घरी पाहुणे येण्याची शक्यता; वाचा कसा जाईल दिवस

आज दिनांक १५ जून २०२२ वार बुधवार. ज्येष्ठ कृष्ण प्रतिपदा. आज चंद्र धनु राशीतून भ्रमण करेल. तिथून तो गुरुशी केंद्र योग करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

    आज दिनांक १५ जून २०२२ वार बुधवार. ज्येष्ठ कृष्ण प्रतिपदा. आज चंद्र धनु राशीतून भ्रमण करेल. तिथून तो गुरुशी केंद्र योग करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष राशीतील राहू जोडीदाराची चिंता वाढवेल. भाग्य चंद्र आहे शुभ घटना घडतील. दिवस आनंदात जाईल. शारीरिक ताण घेऊ नका. दिवस बरा आहे. वृषभ आज अष्टम चंद्राचे भ्रमण अशुभ फळ देईल. कुटुंबात महत्वाचे निर्णय होतील. आर्थिक लाभ होतील. व्यय राहू सावध गिरीचा इशारा देत आहे. खर्च होईल. दिवस मध्यम आहे. मिथुन राशी स्वामी बुध वृषभ राशीत सूर्य सोबत आहे. आता बरेच मार्ग सुलभ होतील. सरकारी काम, लिखाण यात अडचणी आल्या तरी यश मिळेल . दिवस चांगला. कर्क आज राशीच्या षष्ठ स्थानात चंद्र असून दैवी संकेत मिळतील. गुरू धार्मिक आस्था वाढवेलं. अष्टम शनि जपून रहा असे सुचवीत आहे. थोडे नैराश्य वाटेल पण खंबीर रहा. दिवस मध्यम आहे. सिंह आज चंद्र भ्रमण शुभ असून प्रकृती ठीक राहील. मन थोडे चिंतेत राहील. पण काळजी नको. गुरूची उपासना करीत रहा. लवकरच शुभ घटना घडणार आहेत. दिवस मध्यम. कन्या आज दिवस कार्यालयीन जीवनात काही विशेष घडेल असा आहे. दोघे मिळून खरेदी कराल. हाताने शुभ काम होईल. आर्थिक लाभ होतील. दिवस उत्तम. तुला चंद्राचे भ्रमण तृतीय स्थानात आहे. खूप काम येईल असे संकेत आहेत. कुटुंबाशी मतभेद होऊ शकतात. आर्थिक व्यवहार होतील. संततीकडे लक्ष द्या. शांततेत दिवस घालवा. वृश्चिक जोडीदाराला काही लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबाची जबाबदारी तुमच्यावर येईल. मन अशांत राहील. आर्थिक लाभ होईल पण खर्च जपून करा. दिवस मध्यम. धनु आज दिवस घरातल्या विशेष कामांसाठी खर्च होईल. काही जबाबदाऱ्या येतील तरी चांगला दिवस आहे. भावंडाना वेळ द्यावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे वाटेल. दिवस शुभ. मकर वक्री शनि तुम्हाला नैराश्याला समोर जायला लावेल. व्यय चंद्र खर्चाचे, सामाजिक जबाबदारी घेण्याचे योग आणेल. व्यय जपून करा. दिवस बरा. कुंभ आज आर्थिक घडामोडीचा दिवस आहे. अचानक होणारे लाभ प्रसन्न करतील. कायदा मोडू नका. अन्यथा कारवाईला समोर जावे लागेल. दिवस शुभ. मीन राशीच्या दशम स्थानातील चंद्र घरामध्ये जास्तीचे खर्च येतील. भटकंतीचे योग येतील. खर्च जपून करा. घरात पाहुणे येण्याची शक्यता आहे. प्रकृती नरम राहील. दिवस मध्यम आहे. शुभम भवतू!!
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

    पुढील बातम्या