Home /News /astrology /

तुमच्या राशीत आज आर्थिक परिस्थिती कशी असेल? पाहा तुमचं आजचं राशिभविष्य

तुमच्या राशीत आज आर्थिक परिस्थिती कशी असेल? पाहा तुमचं आजचं राशिभविष्य

दैनंदिन राशिभविष्य

दैनंदिन राशिभविष्य

Horoscope 13 May 2022 : तुमच्या राशीनुसार तुमचं आजचं राशिभविष्य.

आज दिनांक 13 मे 2022 शुक्रवार आज वैशाख शुक्ल द्वादशी. आज चंद्र कन्या राशीतून भ्रमण करेल. तिथं तो गुरूसोबत प्रतियोग करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष षष्ठ चंद्र कार्यक्षेत्र आणि आर्थिकबाबतीत आज शुभ फळ देईल. राहू अहंकार आणि मानसिक द्वंद्व निर्माण करतो. त्यादृष्टीने सावध असावं. जोडीदारासोबत आनंदात दिवस व्यतीत होईल. दिवस चांगला. वृषभ आज राशीच्या पंचमातील चंद्र घरामध्ये काही विशेष धार्मिक काम काढेल. आनंद आणि संततीसुख मिळेल. भरपूर काम करून झाल्यावर विश्रांती मिळेल. उत्तम दिवस. मिथुन चतुर्थ चंद्र भ्रमण गुरुशी योग करीत आहे. उच्च प्रतीचे अध्यात्मिक, सामाजिक अनुभव येतील. घरात भरपूर वेळ घालवाल. आर्थिक बाजू उत्तम. दिवस उत्तम जाईल. कर्क चंद्र आणि गुरू काही विशेष अनुभव देतील. आर्थिक बाजू भक्कम राहिल. मन स्थिर होईल. मित्र मंडळ भेटेल. प्रवास योग येतील. दिवस मध्यम. सिंह आज द्वितीय चंद्र गुरू खूप लाभ मिळवून देईल. मन आनंदी राहिल. तसंच आर्थिक सुख लाभेल. वाचन लेखन यात वेळ घालवा. दिवस शुभ. कन्या आज चंद्र राशीस्थानात आहे. तुमच्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्यामुळे तुम्ही प्रसिद्धीच्या झोतात याल. आदर आणि सन्मान वाढेल. गुरू नोकरी करता मदत करेल. दिवस शुभ. तूळ आज व्यय चंद्र मध्यम प्रतीचे फळ देण्यास सज्ज आहे. कार्यक्षेत्र आणि धार्मिक क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. प्रकृती जपा. दिवस मध्यम. वृश्चिक आज आनंदात राहण्याचा दिवस. चंद्र प्रकृतीसंबंधी उत्तम फळ देईल. घरामध्ये काही विशेष घटना घडतील. प्रवास होतील. जोडीदार आनंदी राहिल. दिवस शुभ. धनु आज जीवनातील एक चांगला दिवस आहे, कार्यक्षेत्रात देखील चांगला अनुभव देईल. आर्थिक बाबी जपा. चंद्र शुभ फळ देईल. दिवस आनंदात जाईल. मकर शनी-मंगळ कुंभमध्ये. ताण निर्माण करील. प्रकृतीकडे लक्ष द्या. नातेवाईक भेट संभवते. आर्थिकदृष्ट्या उत्तम दिवस. कुंभ गुरू-चंद्र योग आज दिवस सांभाळून घालवा असं सुचवत आहे. संततीकडे लक्ष द्या. धार्मिक स्थानाला भेट देण्याचे योग. दिवस शुभ. मीन आज चंद्र गुरू प्रतियोग वैवाहिक सुखाचा लाभ घडवेल. घरामध्ये काही आनंदी घटना घडतील. धार्मिक स्थानाचा प्रवास होईल दिवस शुभ. शुभम भवतू!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या