मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

दैनंदिन राशिभविष्य : आजचा दिवस शुभ, आर्थिक लाभासह बरेच लाभ होणार; तुमच्या राशीत काय पाहा

दैनंदिन राशिभविष्य : आजचा दिवस शुभ, आर्थिक लाभासह बरेच लाभ होणार; तुमच्या राशीत काय पाहा

Horoscope 13 April 2022 : आज चैत्र शुक्ल द्वादशी. आजचा दिवस शुभ आहे.

Horoscope 13 April 2022 : आज चैत्र शुक्ल द्वादशी. आजचा दिवस शुभ आहे.

Horoscope 13 April 2022 : आज चैत्र शुक्ल द्वादशी. आजचा दिवस शुभ आहे.

आज दिनांक 13 एप्रिल 2022 बुधवार तिथी चैत्र शुक्ल द्वादशी. आज दिवस शुभ आहे. आज चंद्र सिंह राशीतून भ्रमण करेल. पाहुया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष सध्या मानसन्मानात वाढ, आर्थिक लाभ कार्यक्षेत्रात संधी असा काळ आहे. आज संतती नाराज होऊ शकते. त्यांना वेळ द्या. शांत रहा. चांगला दिवस. वृषभ आज राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्र भ्रमण आहे. तुम्हाला घरगुती जीवनात अनेक नवीन प्रस्ताव येतील. कार्यक्षेत्रात लाभ, उत्तम वाचन, नातेवाईक भेट असा हा दिवस उत्तम आहे. मिथुन आज घर आणि कुटुंबीय ही तुमची प्राथमिकता असेल. आनंददायी खरेदी, प्रवास काही घरासाठी विशेष वस्तू तुम्ही खरेदी कराल. दिवस शुभ. कर्क दिवस काही महत्त्वाचे व्यवहार घडवून आणेल. घरात विशेष काम निघेल. मात्र त्यात अडचणी येतील. खर्च झाला तरी प्राप्ती होईल. मध्यम दिवस आहे. सिंह आज कुठूनतरी प्रवास योग येतील. कुटुंब सुख चांगले असून शेजाऱ्यांशी मतभेद होण्याचे संकेत आहेत. गुरू कृपा राहिल. दिवस शुभ आहे. कन्या घरामध्ये किंवा सामाजिक जीवनात काहीतरी ताण निर्माण होईल. सध्या शांत रहा. तुमचा हेवा वाटणारे लोक फायदा घेतील. आर्थिक लाभ संभवतात. दिवस उत्तम. तूळ चंद्राचं लाभ स्थानातून भ्रमण आणि सप्तम राहू आज जपून राहण्याचे संकेत देत आहे. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला असेल. काही अचानक खर्च होईल. दिवस मध्यम. वृश्चिक मंगळ शुक्र घरामध्ये काही तरी ताण निर्माण करेल. सूर्य पंचम स्थानात असून संतती चिंता वाढेल. मात्र लाभ होतील. दिवस शुभ. धनु आज कार्यक्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींकडे लक्ष असू द्या. तुमचे विरोधक सध्या बलवान आहेत. कुठेतरी अडकण्याची शक्यता आहे. मात्र नवीन संधी मिळेल. दिवस शुभ. मकर आज दिवस शुभ असून भाग्य जोरात आहे. मंगळ आरोग्य समस्या निर्माण करतील. कार्यक्षेत्र गाजवाल. आर्थिक लाभ. दिवस शुभ. कुंभ दिवस आनंददायक आहे. शांत रहा. होणाऱ्या खर्चाला आवर घाला. थोडे नकारात्मक वातावरण राहिल. जोडीदार आनंदी राहिल. दिवस शुभ. मीन व्यवसाय आणि नोकरी करणाऱ्या व्यक्तींना शुभ लाभ मिळतील. वैवाहिक सुख भरपूर मिळेल. सध्या बारावा गुरू असल्याने काही तरी धार्मिक कार्यक्रम कराल. दिवस चांगला. शुभम भवतु!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या