Home /News /astrology /

दैनंदिन राशिभविष्य : आज कुठलाही आर्थिक व्यवहार करू नका

दैनंदिन राशिभविष्य : आज कुठलाही आर्थिक व्यवहार करू नका

Daily Horoscope 11 May 2022 : आर्थिकबाबतीत जपून राहण्याचा दिवस आहे.

आज दिनांक 11 मे 2022 वार बुधवार. आज वैशाख शुक्ल दशमी. आज चंद्र सिंह राशीत भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशिभविष्य. मेष कार्यक्षेत्रातील घडामोडींना वेग येईल. काहीसे आशावादी विचार आणि मानसिक स्थैर्य जाणवेल. लग्नेश मंगळ शनीसोबत आहे. लाभ होतील. दिवस उत्तम. वृषभ आयुष्यात येणारी नवीन संधी आनंदित करेल. रवी-बुध लाभाचे नवीन मार्ग देतील. चतुर्थ चंद्र काही नवीन जबाबदारी निर्माण करेल. शांत रहा. दिवस शुभ. मिथुन सिंह-चंद्र मानसिक ताण निर्माण करेल. आज कुठलाही आर्थिक व्यवहार करू नका. भावंडं आणि प्रवास याबाबत शुभ फल मिळेल. दिवस शांततेत घालवा. कर्क आज कौटुंबिक जीवनात काही समस्या निर्माण होऊ शकतात. काळजी घ्या. दशमात आलेले रवी-बुध अधिकाराचा अनुभव देतील. दिवस शुभ आहे. सिंह राशी स्वामी रवी सध्या सकारात्मक मानसिकता देईल. शरीरात ऊर्जा वाटेल. चंद्र संततीसाठी शुभ वर्तमान आणेल. आज दिवस उत्तम जाईल. कन्या व्यय चंद्र असून आज घराविषयक काही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. जास्तीची जबाबदारी येईल. सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी होईल. दिवस चांगला. तूळ घरात अशांतता निर्माण होईल असे वागू नका. कलह टाळा. जास्तीचे काम अंगावर घेऊ नका. प्रवास योग येतील. आर्थिकदृष्ट्या दिवस मध्यम आहे. आनंदात दिवस घालवा. वृश्चिक अतिशय धावपळीचा असा हा आठवडा असणार आहे. खूप महत्त्वाचे निर्णय, फोनवर संवाद होतील. पण प्रवास टाळा. नुकसान होईल. दिवस बरा आहे. धनु आर्थिकबाबतीत जपून राहण्याचा दिवस आहे. काही व्यवहार असतील तर ते उद्यावर टाका. कुटुंबात काही समारंभ होतील. दिवस उत्तम. मकर शनी, अष्टम चंद्र दिवस जरा कठीण जाईल. मन काहीसं उदास राहिल. जोडीदाराची मदत घ्या. प्रकृती जपा. दिवस संथ आहे. कुंभ राशी स्थानात झालेली ग्रहांची स्थिती आर्थिक आणि शारीरिक कष्ट दाखवत आहे. गुरू स्थिती नियंत्रणात ठेवेल. दिवस मध्यम आहे. मीन आज दिवस नातेवाईकांना भेट, संपर्क करण्याचा आहे. काहीशी हुरहूर जाणवत असली तरी शांत राहा. कोणी अधिकारी व्यक्ती भेटेल. दिवस शुभ. शुभम भवतू!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या