Home /News /astrology /

Daily Horoscope : वैवाहिक जीवन नाराज राहील, तणाव पूर्ण वातावरण; वाचा आजचं भविष्य!

Daily Horoscope : वैवाहिक जीवन नाराज राहील, तणाव पूर्ण वातावरण; वाचा आजचं भविष्य!

आज दिनांक ११ जून २०२२ वार शनिवार. आज ज्येष्ठ शुक्ल द्वादशी. आज चंद्र तुला राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य

    आज दिनांक ११ जून२०२२ वार शनिवार. आज ज्येष्ठ शुक्ल द्वादशी. आज चंद्र तुला राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज सप्तम स्थानातील चंद्र भ्रमण बरे असून काही ताण असेल तर विचलित होऊ नका. मंगळ गुरू धार्मिक आस्था निर्माण करतील. दिवस शुभ. वृषभ राशीच्या षष्ठ स्थानातील चंद्र आज आर्थिक, व्यावसायिक लाभ देईल. प्रकृती ठीक राहील. दशम स्थानातील शनि अनुकूल असून मंगळ उत्तम लाभ देईल. शुभ दिवस. मिथुन आज पंचम स्थानातील चंद्र संतती आणि कामकाजासाठी उत्तम आहे. नवीन संधी मिळतील. प्रकृतीची काळजी घ्या असे ग्रह सुचवीत आहे. . दिवस शुभ जाईल. कर्क चंद्र आज विविध क्षेत्रात विशेष घडामोडी घडवून आणेल. आर्थिक लाभ संभवतो. तुमच्यावर नवीन जबाबदारी येईल. अष्टम शनि पाठदुखी पासून जपा . दिवस मध्यम. सिंह आज दिवस अनेक घटना घडवणारा आहे. आज मन आशंकित राहील. भावंडं भेट होईल.. दिवस जोडीदाराला आर्थिक लाभ घडवेल. मध्यम दिवस. कन्या आज दिवस उत्तम असून प्रकृती जरा जपून असावे .काही विचित्र अशी हुरहूर लागून राहिलं. कार्यक्षेत्रात भरपूर काम कराल . प्रवास योग येतील. काळजी घ्या. दिवस ठीक आहे. तुला राशीच्या सहाव्या स्थानात चंद्र जीवनात ताण निर्माण करेल. खरेदी कराल. आर्थिक दृष्ट्या कष्ट. घरात काही विशेष घटना घडतील. दिवस मध्यम आहे. वृश्चिक चंद्र भ्रमण प्रकृतीच्या तक्रारी निर्माण करेल. आर्थिक घडामोडी ,अध्यात्मिक व्यक्तींची भेट घडवून आणेल. स्वतःवर वेळ आणि पैसा खर्च कराल. अनपेक्षित अडचणी येतील. दिवस मध्यम. धनु चंद्र भ्रमण आज कार्यालयीन जीवनात यश देईल. आईशी मंगळ मतभेद करील. जोडीदाराची काळजी लागून राहील. दिवस मध्यम.. मकर राशीच्या तृतीय स्थानातील गुरू भ्रमण प्रवासाचे योग आणेल. त्यात तुम्ही अडकून जाल. मंगळ गुरू खर्चाचे नवीन मार्ग तयार करतील. तसेच प्रप्तीही वाढेल. दिवस चांगला आहे. . कुंभ चंद्र भाग्यस्थानात आहे. व्यय शनि कायदा पाळा असे सांगत आहे. आर्थिक लाभाचे मार्ग मिळतील. मात्र सांभाळून असा. दिवस मध्यम जाईल. मीन कौटुंबिक लाभ देणारा हा दिवस आहे. समारंभ होईल. थोडे तणाव पूर्ण वातावरण राहील. वैवाहिक जीवन नाराज राहील. दिवस मध्यम आहे. शुभम भवतू!!
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

    पुढील बातम्या