Home /News /astrology /

Daily Horoscope : घरामध्ये काही अप्रिय घटना घडतील, काळजी घ्या!

Daily Horoscope : घरामध्ये काही अप्रिय घटना घडतील, काळजी घ्या!

काही राशीच्या लोकांना या परिवर्तनामुळे खूप खर्च करावा लागू शकतो. वृषभ, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांना विशेष लाभ होणार नाही.

काही राशीच्या लोकांना या परिवर्तनामुळे खूप खर्च करावा लागू शकतो. वृषभ, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांना विशेष लाभ होणार नाही.

आज दिनांक १० जून २०२२ वार शुक्रवार. आज ज्येष्ठ शुक्ल दशमी /एकादशी. चंद्र आज दुपारनंतर तुला राशीत भ्रमण करेल. तिथून तो राहू शुक्रशी प्रतियोग व केतुशी युती करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

    आज दिनांक १० जून २०२२ वार शुक्रवार. आज ज्येष्ठ शुक्ल दशमी /एकादशी. चंद्र आज दुपारनंतर तुला राशीत भ्रमण करेल. तिथून तो राहू शुक्रशी प्रतियोग व केतुशी युती करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज सप्तम चंद्र धार्मिक कामासाठी जोडीदारासोबत प्रवास योग घडवून आणेल. शुभ गुरूचे गोचर आनंद देईल. आर्थिक लाभ संभवतो. कौटुंबिक समारंभ होतील. दिवस शुभ. वृषभ आज शष्ठ स्थानातील चंद्र कुटुंबासाठी काही विशेष घडामोडी, आनंद आणि गृह सौख्य देईल. धार्मिक समारंभात भाग घ्याल. सामाजिक जीवनात प्रतिष्ठा लाभेल. उत्तम दिवस. मिथुन राशीच्या पंचम स्थानातील चंद्र राहुशी विशेष योग करीत आहे. उच्च प्रतीचे अध्यात्मिक, गूढ अनुभव येतील. घरात भरपूर वेळ घालवाल. प्रकृती जपा. दिवस चांगला जाईल. कर्क तृतीय /चतुर्थ स्थानात चंद्र काही अध्यात्मिक अनुभव देतील. आर्थिक बाजू उत्तम राहील. मन स्थिर होईल. मित्र मंडळ भेटेल. प्रकृती उत्तम राहील. दिवस मजेत जाईल . सिंह आज चंद्र राहू प्रतीयोग आहे. आर्थिक लाभ झाल्यामुळे आनंदी राहाल. तसेच कुटुंबसुख लाभेल. प्रकृती नाजूक राहील. जोडीदाराला वेळ द्या. प्रवास घडेल. दिवस शुभ. कन्या आज चंद्र द्वितीय स्थानात आहे तुमच्यावर संततीच्या बाबत निर्णय घेण्याची वेळ येईल. सामाजिक जीवनात प्रसिद्धीच्या झोतात याल. गुरू जोडीदाराची मदत करेल. दिवस शुभ. तुला आज राशीतील चंद्र उच्च प्रतीचे फळ देण्यास सज्ज आहे. गृह आणि धार्मिक क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. प्रकृती ठीक राहील. खर्च होतील.  दिवस शुभ. वृश्चिक आज घरात आनंदात राहण्याचा दिवस. चंद्र प्रकृती संबंधी अनिष्ट फळ देईल. घरामध्ये काही विशेष घटना घडतील. प्रवास योग येतील. दिवस मध्यम. धनु आज जीवनातील एक चांगला दिवस आहे कार्यक्षेत्रात देखील चांगला अनुभव देईल. अचानक आर्थिक लाभ होतील . गुरू घरामध्ये शुभ फळ देईल. दिवस आनंदात जाईल. मकर शनि धन स्थानात आहे. काही प्रकृतीचे त्रास, आर्थिक चिंता निर्माण होईल. कुटुंबाकडे लक्ष द्या. नातेवाईक भेट संभवते. मध्यम दिवस. कुंभ चंद्र राहू योग आज सांभाळून दिवस घालवा असे सुचवीत आहे. संतती कडे लक्ष द्या. खर्च टाळा. धार्मिक स्थानाला भेट देण्याचे योग. दिवस शुभ. मीन आज चंद्र आर्थिक दृष्ट्या घडामोडी घडवेल. घरामध्ये काही अप्रिय घटना घडतील . धार्मिक स्थानाचा प्रवास होईल दिवस मध्यम आहे. शुभम भवतू!!
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

    पुढील बातम्या