Home /News /astrology /

कुणाला आर्थिक लाभ तर कुणाला आर्थिक हानी; तुमच्या राशीत काय पाहा तुमचं राशिभविष्य

कुणाला आर्थिक लाभ तर कुणाला आर्थिक हानी; तुमच्या राशीत काय पाहा तुमचं राशिभविष्य

Horoscope 08 June 2022 : बाराही राशींचं आजचं भविष्य काय आहे पाहा.

आज दिनांक 08 जून 2022 बुधवार. आज ज्येष्ठ शुक्ल अष्टमी. आज चंद्र कन्या राशीतून भ्रमण करेल. तिथून तो गुरूसोबत प्रतियोग करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष संथ आणि साधा दिवस. मन थोडं उद्विग्न राहिल. ईश्वरी उपासना बळ आणि यश देईल. आर्थिक स्थिती ठिक राहिल. कार्यक्षेत्रात विशेष लक्ष द्यावं लागेल. दिवस मध्यम. वृषभ आज चंद्र पंचम स्थानातून भ्रमण करत आहे. संतती थोडी नाराज होण्याचे संकेत आहेत. काळजी घ्या. मंगळ धार्मिक आस्था वाढेल असं सुचवत आहे. दिवस बरा आहे. मिथुन आज शरीर शिथील वाटेल. जास्त दगदग टाळा. नको असलेली कामं गळ्यात येतील. मानसिक ताण येईल घरात शांत दिवस घालवा. आर्थिक बाजू सांभाळा. दिवस मध्यम. कर्क आज भक्तिमय वातावरणात दिवस मंगलमय होईल. वाचन मनन कराल. संततीसुख मिळेल. धार्मिक कार्यक्रम किंवा पूजेत सहभागी व्हाल. दिवस उत्तम. सिंह आज तुमच्यापुढे कामाचा डोंगर असेल. घरात जास्त ताण न घेता आलेली जबाबदारी पार पाडाल. पितृ सुख मिळेल. दिवस आनंदात पर पडेल. कन्या तुमच्यापुढे आज प्रवास, भेटीगाठी कार्यक्रमात सहभाग असे भरपूर पर्याय असतील. भाग्य साथ देईल. तुम्ही योग्य निर्णय घ्याल. दिवस आनंदी आहे. तूळ आज चंद्र व्यय स्थानात आहे. आर्थिक हानी होईल. घरात आनंदी वातावरण राहिल. जोडीदाराची प्रकृती देखील उत्तम राहिल. दिवस शुभ आहे. वृश्चिक आज लाभस्थानात चंद्र तणावमुक्त करेल. धार्मिक कार्यात मन गुंतून राहिल. आर्थिक लाभ होतील. वैवाहिक सुख मिळेल. दिवस चांगला आहे. धनु आज दशम चंद्र आर्थिक आणि शारीरिक ताण देईल. जपून रहा. राशीच्या तृतीयात शनी आहे. भावंडांना क्लेश होतील. दिवस उपासनेत घालवा. मकर प्रवास योग. तृतीय गुरू आहे. आईवडिलांची, भावंडांची भेट होईल. आर्थिक बाजू सांभाळून राहा. दिवस उत्तम . कुंभ आज दिवस कार्यक्षेत्रात काही विशेष घडामोडींचा आहे. यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. दूरचे प्रवास योग येतील. दिवस उत्तम. मीन आज भाग्यदायक आणि आनंदी दिवस आहे. सगळीकडून सुसंधी, लाभ, प्रवास भेटीगाठी यात दिवस आनंदात निघून जाईल. शुभम भवतू!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या