मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily Horoscope : सकाळी उठल्यावर अनिश्चितता; अस्वस्थतेची भावना असेल, मात्र...

Daily Horoscope : सकाळी उठल्यावर अनिश्चितता; अस्वस्थतेची भावना असेल, मात्र...

कसा असेल आजचा दिवस?

कसा असेल आजचा दिवस?

कसा असेल आजचा दिवस?

सितारा-द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 8 ऑगस्ट 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) सहकाऱ्यांसोबत मिळून काम करणं ही आत्ताची महत्त्वाची गरज आहे. एखाद्या रिलेशनशीपमध्ये असाल किंवा लग्न झालं असेल, तर तुमच्याबद्दल अनावश्यक मतं तयार होऊ शकतात. स्वतःला वेळ देण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. LUCKY SIGN – A pair of suitcases वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) स्वतःला सिद्ध करण्याची आणखी एखादी संधी नशिबानं मिळू शकते. स्वतःच्या फायद्यासाठी ती स्वीकारा. तुमचा साधेपणा अनेकवेळा कौतुकास पात्र ठरेल. पैशांच्या बाबतीतले सर्व व्यवहार चोख ठेवा. LUCKY SIGN – A flower shop मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) आज सगळी कामं वेळेत पूर्ण करण्याचं आव्हान असेल. दिवसभराच्या ऊर्जेचा समतोल राखण्यासाठी मनातल्या गोष्टी लिहून काढण्याची सवय ठेवा किंवा पहाटेच्या वेळी एकाग्रता करा. आधीच अडचणीत असलेल्या व्यक्तीला आणखी खिजवू नका. LUCKY SIGN – Sunset Of The Day कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) हळूहळू लोकांवर विश्वास ठेवायची सवय करायला हवी. यामुळे तुमचं दैनंदिन आयुष्य सुकर होईल. भूतकाळातली एखाद्या घटनेची आठवण पुन्हा ताजीतवानी होईल. काही दान केल्यामुळे मनाला समाधान लाभेल. LUCKY SIGN – A new chair सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) एखादा भ्रमाचा भोपळा फुटेल आणि वास्तव स्पष्ट दिसायला लागेल. कामाप्रती निष्ठा ठेवल्यानं निश्चितच यश मिळेल. अनपेक्षित कामात दिवस व्यग्र जाईल. गोष्टी पुढे ढकलण्याचा विचार करू नका. LUCKY SIGN – Rubber plant कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) जुन्या फारसा परिचय नसलेल्या व्यक्तीला आर्थिक मदतीची गरज भासेल. गुंतवणुकीत वाढ करण्याची गरज आहे. तब्येतीच्या तक्रारींकडे वेळीच लक्ष द्या. विशेषतः दातांच्या समस्येकडे दुलर्क्ष करू नका. LUCKY SIGN – A silver spoon तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) तुमच्या अंतःप्रेरणेमुळे दिवस कसा घालवायचा, याबाबत तुम्हाला मदत मिळेल. एका महत्त्वाच्या बैठकीतून भविष्यासाठीचे स्पष्ट संकेत मिळतील. दान करण्याची किंवा धर्मादाय संस्थेसाठी काम करण्याची इच्छा होईल. LUCKY SIGN – A blue sports bag वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) सकाळी उठल्यावर अनिश्चितता, अस्वस्थतेची भावना असेल. मात्र पुढच्या दिवसभरात गोष्टी तुमच्या आवाक्यात आल्यासारख्या वाटतील. गैरसमज टाळण्यासाठी सुस्पष्ट संवाद साधा. भावंडाला तुमच्या मदतीची गरज लागू शकते. LUCKY SIGN – A stained glass धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) एखाद्या गोष्टीची सुरुवात करण्यासाठी तुम्ही मनात योजलेल्या दिवसासारखा सुंदर दिवस आजचा आहे. एखाद्या नवीन गोष्टीची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या वस्तू, ऐवज सुरक्षित ठेवा. छोटी चोरी होण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN – A new dairy मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) तुमच्यापैकी काहींचे जवळचे मित्र कायम तुमची बाजू घेतात, बचाव करतात, खरं तर तसं करायची गरजच नाही. तुमचा दिवस घरात आनंदात जाईल. कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठीही आजचा दिवस योग्य आहे. LUCKY SIGN – A red brick wall कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) आवडीच्या व्यक्तीसोबत मनसोक्त बोलायला मिळणं ही आजच्या दिवसातली ठळक गोष्ट असेल. तुमच्या माहितीतल्या एखाद्या फसवणाऱ्या व्यक्तीपासून लांब राहा. आजचा दिवस नात्यांची वीण घट्ट करेल. काही नाती पुन्हा जोडली जातील. LUCKY SIGN – A bright interior मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) नवीन दिनक्रमाबाबत तुम्ही फारसे खूश नसाल, पण तो तुमच्या भल्यासाठीच आहे. आज एखादी नवी गुंतवणूक करणं धोक्याचं ठरेल. जुन्या मित्राचा अचानक फोन येईल किंवा भेट होईल. LUCKY SIGN – A golden star
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Rashichark

पुढील बातम्या