मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily Horoscope : नवीन वस्त्र, दागिना खरेदी करण्याची संधी; कसा जाईल आठवड्याचा पहिला दिवस!

Daily Horoscope : नवीन वस्त्र, दागिना खरेदी करण्याची संधी; कसा जाईल आठवड्याचा पहिला दिवस!

ज्योतिष शास्त्रानुसार काही राशीच्या लोकांनी रक्षाबंधनापर्यंत खूप काळजी घेणे आवश्यक आहे. दिल्लीचे आचार्य गुरमीत सिंहजी यांच्याकडून जाणून घेऊया रक्षाबंधनापर्यंत कोणत्या चार राशीच्या लोकांनी काळजी घ्यावी आणि अंगारक योगाचा त्यांच्यावर काय परिणाम होऊ शकतो.

ज्योतिष शास्त्रानुसार काही राशीच्या लोकांनी रक्षाबंधनापर्यंत खूप काळजी घेणे आवश्यक आहे. दिल्लीचे आचार्य गुरमीत सिंहजी यांच्याकडून जाणून घेऊया रक्षाबंधनापर्यंत कोणत्या चार राशीच्या लोकांनी काळजी घ्यावी आणि अंगारक योगाचा त्यांच्यावर काय परिणाम होऊ शकतो.

आज दिनांक ८ ऑगस्ट २०२२. वार सोमवार. श्रावण शुक्ल एकादशी. चंद्र सायंकाळपर्यंत वृश्चिक राशीत असून गुरूशी नवपंचम योग करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

आज दिनांक ८ ऑगस्ट २०२२. वार सोमवार. श्रावण शुक्ल एकादशी. चंद्र सायंकाळपर्यंत वृश्चिक राशीत असून गुरूशी नवपंचम योग करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज दिवस तुम्हाला त्रास दायक आहे. चंद्र मन आशंकित ठेवेल. तृतीय स्थानातील शुक्र स्त्री वर्गाकडून अकल्पित लाभ प्राप्त करून देईल. संततीची काळजी घ्या. दिवस शुभ. वृषभ आज आर्थिक दृष्ट्या दिवस उत्तम आहे. अनपेक्षित खर्च झाले तरी आनंद मिळेल. नाव लौकिक वाढेल. संतती आनंदी राहील. दिवस शुभ फल देईल. मिथुन अचानक कामासाठी प्रवास योग आहे. भाग्यात शनि, धार्मिक कार्यात यश देतील. शुक्राचा आनंददायक वावर तुम्हाला नवीन शुभ घटनांची चाहूल देईल. प्रकृती सांभाळा. दिवस मजेत जाईल. कर्क राशीच्या पंचम स्थानातील चंद्र अचानक उलाढाल घडवेल. तुम्हाला काही नवीन जबाबदारी येईल. घरात देखील काम राहील. उत्तम खरेदी कराल. दिवस आनंदात जाईल. सिंह आज दिवस भाग्यदायक असून अध्यात्मिक अनुभव देईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक लाभ होतील. गाठीभेटी होतील. दिवस सौख्याचा जाईल. कन्या आज दिवस गडबडीचा व कष्टाचा आहे. अंगावर घेतलेली जबाबदारी जास्त ताण देईल. मात्र विचलित होऊ नका. जोडीदार आनंदी राहील. दिवस शांतपणे घालवा. तुला आज जोडीने आनंदात गृह सौख्य अनुभव कराल. आर्थिक लाभ होईल. हर्ष आणि उल्हास याने मन भरून जाईल. नातेवाईक भेटतील. दिवस शुभ. वृश्चिक आज दिवस कोणाशीही वाद विवाद न करता घालवा. संततीशी वाद होतील. दिवस ईश्वराची सेवा करण्यात घालवा. आर्थिक बाजू जपा. चांगला दिवस. धनु राशीच्या व्यय स्थानातील चंद्र गुरू सामाजिक जीवनात प्रतिष्ठा मिळवून देईल. घरात शुभ घटना घडतील. आर्थिक खर्च होतील. मुलासोबत दिवस सुखात जाईल. मकर तुमच्या लाभस्थानातील चंद्र शुभ संकेत देत आहे. आज भाग्य उजळेल. आनंदात दिवस साजरा करताना त्रास विसरून जाल. प्रवास योग येतील. दिवस शुभ आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींनी आर्थिक हानी पासून जपावे. मात्र अचानक होणारा धनलाभ आनंद देईल. नवीन वस्त्र, दागिना खरेदी कराल. संतती खुश राहील. दिवस उत्तम. मीन आज उत्तम प्रतीचा लाभ मिळणार असून आर्थिक बाजु समृद्ध होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. दिवस अतिशय गडबडीत जाईल. शुभम भवतू !!
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Rashichark

पुढील बातम्या