Home /News /astrology /

Daily Horoscope : आज आर्थिक लाभाचा दिवस; पाहा तुमचं राशिभविष्य

Daily Horoscope : आज आर्थिक लाभाचा दिवस; पाहा तुमचं राशिभविष्य

Horoscope 07 May 2022 : चंद्र आज कर्क राशीत असेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य

आज दिनांक 07 मे 2022. शनिवार. आज वैशाख कृष्ण सप्तमी. चंद्र आज कर्क राशीत असेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य मेष राशी स्वामी मंगळ लाभ स्थानात शनीसोबत ही ग्रहस्थिती अचानक ज्येष्ठ व्यक्तीची भेट करेल. चतुर्थ चंद्र शुभ फल देईल. घरात फार काम पडेल. दिवस उत्तम जाईल. वृषभ शनीचे मंगळसोबत भ्रमण स्त्रियांना अशुभ असून कार्यक्षेत्रात मदत करेल. आर्थिक आणि शारीरिक ताण कमी होईल. काही विशेष लाभ देखील मिळतील. दिवस चांगला. मिथुन राशी स्वामी बुध व्यय स्थानात असून काही नवीन संधी मिळवून देईल. महत्त्वाचे संपर्क होतील. आर्थिक लाभ होतील. घराचे शुभ योग येतील. दिवस उत्तम जाईल. कर्क चंद्र आज राशी स्थानात आहे. घरी आणि कार्यक्षेत्रात धावपळ होईल. जास्तीची जबाबदारी येईल. प्रकृती ठिक राहिल. दिवस उत्तम. सिंह शनी-मंगळ सप्तम स्थानात तर रवी भाग्यस्थानात असून जवळच्या नातेवाईकांना शुभ. चंद्र अध्यात्मिक लाभ मिळवून देतील. दिवस शुभ आहे. कन्या आज आर्थिक लाभ आणि वैवाहिक सौख्य देणारा दिवस आहे. घरात शांत रहा. फार ताण घेऊ नका. संतती चिंता वाटेल. ग्रहांचा प्रभाव जाणवेल. दिवस उत्तम जाईल. तूळ शनी पंचम तर बुध अष्टम स्थानात आहेत. दशम चंद्र कार्यालयात काळजी घ्या. घरामध्ये मोठे खर्च निघतील. भेटी होतील. दिवस बरा जाईल. वृश्चिक राशी स्वामी मंगळ चतुर्थ स्थानात, शनी चतुर्थ स्थानात. हळूहळू परिस्थिती सुधारेल. भाग्यात चंद्र आहे. संततीची काळजी घ्या. दिवस बरा जाईल. धनु तृतीय मंगळ शनी आणि चतुर्थ गुरू शुक्र शुभ असून प्रकृतीत सुधारणा घडवून आणतील . अष्टम स्थानातील चंद्र मात्र कठीण आहे. दिवस मध्यम. मकर शनी महाराज काही विशिष्ट ताण देतील. चंद्र त्यात सुधारणा करेल. दिवस अनुकूल. जोडीदार आनंदी राहिल. तुम्ही व्यस्त राहाल. प्रकृती जपा. खर्च जपून करा. दिवस शुभ. कुंभ धन स्थानातील गुरू ग्रह आर्थिक लाभ देतील. राशीतील मंगळ शनी जोडीदाराला त्रासदायक ठरेल. चंद्र जपून राहण्याचे संकेत देत आहे. दिवस मध्यम. मीन राशीतील गुरू शुक्र आणि चंद्र आर्थिक उलाढाल दाखवत आहे. लाभ होतील. कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळतील. दिवस आनंदाचा ठरेल. शुभम भवतू!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या