Home /News /astrology /

आज चंद्राचा शनीशी प्रतियोग; तुमच्या राशीवर काय परिणाम होणार पाहा राशिभविष्य

आज चंद्राचा शनीशी प्रतियोग; तुमच्या राशीवर काय परिणाम होणार पाहा राशिभविष्य

काही राशीच्या लोकांना या परिवर्तनामुळे खूप खर्च करावा लागू शकतो. वृषभ, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांना विशेष लाभ होणार नाही.

काही राशीच्या लोकांना या परिवर्तनामुळे खूप खर्च करावा लागू शकतो. वृषभ, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांना विशेष लाभ होणार नाही.

आज चंद्र पूर्व फाल्गुनी नक्षत्रातून भ्रमण करेल. तिथे तो शनीसोबत प्रतियोग करेल.

आज दिनांक 07 जून 2022 मंगळवार. आज ज्येष्ठ शुक्ल सप्तमी. आज चंद्र पूर्व फाल्गुनी नक्षत्रातून भ्रमण करेल. तिथे तो शनीसोबत प्रतियोग करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष पंचम चंद्र कार्यक्षेत्र आणि आर्थिक बाबतीत आज शुभ फळ देईल. राहू अहंकार आणि मानसिक द्वंद्व निर्माण करतो. त्यादृष्टीने सावध असावं. संततीसोबत आनंदात दिवस व्यतीत होईल. दिवस चांगला. वृषभ आज राशीच्या चतुर्थ स्थानातील चंद्र घरामध्ये काही विशेष धार्मिक काम काढेल. आनंद आणि संततीसुख मिळेल. भरपूर काम करून झाल्यावर विश्रांती मिळेल. उत्तम दिवस. मिथुन तृतीय चंद्र भ्रमण शनीशी योग करत आहे. उच्च प्रतीचे अध्यात्मिक, सामाजिक अनुभव येतील. घरात भरपूर वेळ घालवाल. आर्थिक बाजू उत्तम. दिवस उत्तम जाईल. कर्क चंद्र आणि शनी काही विशेष अनुभव देतील. आर्थिक बाजू भक्कम राहिल. मन स्थिर होईल. मित्रमंडळ भेटेल. प्रवास योग येतील. दिवस मध्यम. सिंह आज राशीतील चंद्र खूप लाभ मिळवून देईल. मन आनंदी राहिल. तसंच आर्थिक सुख लाभेल. वाचन लेखन यात वेळ घालवा. दिवस शुभ. कन्या आज चंद्र व्यय स्थानात आहे. तुमच्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्यामुळे तुम्ही प्रसिद्धीच्या झोतात याल. आदर आणि सन्मान वाढेल. गुरू नोकरी करता मदत करेल. दिवस शुभ. तूळ आज चंद्र मध्यम प्रतीचे फळ देण्यास सज्ज आहे. कार्यक्षेत्र आणि धार्मिक क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. प्रकृती जपा. दिवस मध्यम. वृश्चिक आज आनंदात राहण्याचा दिवस. चंद्र प्रकृतीसंबंधी उत्तम फळ देईल. घरामध्ये काही विशेष घटना घडतील. प्रवास होतील. जोडीदार आनंदी राहील दिवस शुभ. धनु आज जीवनातील एक चांगला दिवस आहे कार्यक्षेत्रात देखील चांगला अनुभव देईल. आर्थिक बाबी जपा. चंद्र शुभ फळ देईल. दिवस आनंदात जाईल. मकर शनी कुंभेमध्ये वक्री असून ताण निर्माण करील. प्रकृतीकडे लक्ष द्या. नातेवाईक भेट संभवते. आर्थिकदृष्ट्या उत्तम दिवस. कुंभ शनी चंद्र योग आज दिवस सांभाळून घालवा असं सुचवत आहे. संततीकडे लक्ष द्या. धार्मिक स्थानाला भेट देण्याचे योग. दिवस शुभ. मीन आज चंद्र शनी प्रतीयोग मानसिक ताण घडवेल. घरामध्ये काही अप्रिय घटना घडतील. धार्मिक स्थानाचा प्रवास होईल दिवस शुभ. शुभम भवतू!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या