Home /News /astrology /

दैनंदिन राशिभविष्य : आज आर्थिक लाभ होतील तरी सावध राहा कारण...

दैनंदिन राशिभविष्य : आज आर्थिक लाभ होतील तरी सावध राहा कारण...

Horoscope 05 May 2022 : आज चंद्र मिथुन राशीत प्रवेश करेल. पाहुया आजचे बारा राशींचे भविष्य.

आज दिनांक 05 मे 2022. वार गुरुवार. आज वैशाख कृष्ण पंचमी. आज चंद्र मिथुन राशीत प्रवेश करेल. पाहुया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज मानसिक आंदोलनं होतील. जोडीदाराच्या मताला किंमत द्या. कार्यक्षेत्रात परदेश संबंधी घटना घडतील. विशेष पूजा हातून घडेल. दिवस मध्यम. वृषभ आज दिवस लाभदायक असून महत्त्वाचे निरोप मिळतील. मौल्यवान खरेदी, आर्थिक लाभ होतील. वडीलधारी व्यक्ती मदत करेल. तरीही सावध रहा. दिवस शुभ. मिथुन काळजीपूर्वक राहण्याचा दिवस. आर्थिक लाभ होईल. मात्र खर्च देखील भरपूर होईल. घरात काही तणावाची स्थिती राहिल. महत्त्वाचे निर्णय टाळा. दिवस मध्यम. कर्क आज प्रकृती ठिक राहिल. व्यवसायात प्रगती होईल. जोडीदाराची काळजी घ्या. ईश्वराची उपासना सर्व संकटातून मार्ग काढेल. मानसिक ताण होईल. दिवस मध्यम. सिंह शत्रू डोकं वर काढण्याचा प्रयत्न करतील. पण शनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडेल. चंद्र आर्थिक लाभ दाखवत आहे. आरोग्य चिंता वाटेल. दिवस उत्तम. कन्या जोडीदाराला नवीन संधी प्राप्त होतील. मुलांची अनाठायी चिंता वाटेल. आर्थिक आणि शारीरिक चिंता कमी होतील. कार्यक्षेत्रात नाव मिळेल. दिवस उत्तम. तूळ गृह, नवीन वाहन याचे योग येतील. कुठेही अनावश्यक धाडस करू नये. कार्यक्षेत्रात विशेष घटना घडतील. आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. महत्त्वाचा निर्णय आज घ्या. दिवस उत्तम. वृश्चिक आज अचानक संततीसंबंधी काही काळजी वाटेल. फिरायला जाणं होईल. पण मन अशांत राहिल. वादविवाद टाळा. दिवस मध्यम. धनु आज अनेक ठिकाणाहून जबाबदाऱ्या येतील. आर्थिक चिंता दूर झाली तरी खर्च जपून करा. जोडीदार आनंदी राहिल. कुटुंब सुख लाभेल. दिवस उत्तम. मकर शनी-मंगळ अनेक संमिश्र फळ देणार आहेत. फार ताण घेऊ नका. डोकेदुखीचा त्रास होईल. जोडीदाराला शुभ काळ. आर्थिक प्राप्ती चांगली राहिल. दिवस उत्तम. कुंभ जपून रहा. फार महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न करा. आर्थिक कामं पूर्ण होतील. धार्मिक कार्यात वेळ जाईल. देवदर्शन घडेल. दिवस मध्यम. मीन कुटुंबियांच्या समवेत दिवस जाईल. काही तरी विशेष करून दाखवाल. लोकांमध्ये तुमच्या नावाची चर्चा होईल. संततीला आर्थिकदृष्ट्या शुभ दिवस आहे. उपासना करा. दिवस मध्यम. शुभम भवतू!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या