Home /News /astrology /

जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी महत्त्वाचे निरोप मिळतील; सविस्तर पाहा तुमचं राशिभविष्य

जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी महत्त्वाचे निरोप मिळतील; सविस्तर पाहा तुमचं राशिभविष्य

Horoscope 01 June 2022 : जून महिन्याच्या सुरुवातीलाच तुमच्या आयुष्यात बऱ्याच घटना घडणार आहेत.

आज दिनांक 01 जून 2022 बुधवार. तिथी ज्येष्ठ शुक्ल द्वितीया. आज चंद्र मिथुन राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष राशीतले राहू आणि शुक्र नैतिक आचरण करा असे सांगत आहेत. चंद्र बंधुभेटीचा लाभ घडवेल. गुरू व्ययात आहे. धार्मिक कामासाठी वेळ द्यावा लागेल. दिवस शुभ. वृषभ द्वितीय चंद्र तुम्हाला आर्थिक भरभराट देईल. स्वतः वर खर्च कराल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. धार्मिक कामासाठी वेळ द्याल. दिवस उत्तम आहे. मिथुन राशी स्थानात चंद्र आर्थिक आणि मानसिक ताण दूर करेल. जोडीदाराशी काही तरी कुरबुर होईल. प्रकृती ठिक राहिल. दिवस शुभ. कर्क आज दिवस कुटुंबीयांसोबत घालवा. स्वतःला वेळ द्या. काही आर्थिक प्रश्न सोडवावे लागतील. धार्मिक आस्था वाढीस लागेल. दिवस मध्यम आहे. सिंह चंद्र शैक्षणिक क्षेत्रात नाव करील. काही चिंता असेल तर ती आता दूर होईल. नोकरीसाठी उत्तम काल. जोडीदार खुश राहिल. दिवस शुभ. कन्या आज दिवस खूप काही नवीन घटना घेऊन येईल. थोडी हुरहूर मनात राहिल. चंद्र कामाचा ताण देईल. घरामध्ये काही नवीन बदल कराल. दिवस मध्यम आहे तूळ आज दिवस दगदग, प्रवास यांनी तुम्हाला त्रस्त करेल. संतती सुख मिळेल. सूर्य बुध विचित्र अनुभव देईल. दिवस मध्यम. वृश्चिक आज कार्यालयीन प्रश्नांचा सामना करावा लागेल. वैवाहिक जीवन थोडे तणावपूर्ण होईल. प्रकृतीची काळजी घ्या. जास्त दगदग करू नका. आर्थिक लाभ होतील. दिवस चांगला. धनु आज सप्तम स्थानात चंद्र कुटुंबात आनंद निर्माण करेल. आर्थिक देणंघेणं होईल. नातेवाईक भेट होण्याचे संकेत आहेत. दिवस उत्तम. मकर आजचा दिवस हा घर आणि कुटुंब यांना वेळ देण्याचा आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. शैक्षणिक बाजू ठिक राहिल. दिवस मध्यम आहे. कुंभ शनी घरात काही विचित्र अनुभव देईल. आईवडील नाराज होणार नाहीत याची काळजी घ्या. संततीचे सुख मिळेल घरात जास्तीची काम निघतील. आनंदात दिवस जाईल. मीन आज कुठे तरी प्रवासाला जाण्याचा बेत ठरेल. भावंडं भेटतील. महत्त्वाचे निरोप मिळतील. राशीतील गुरू मंगळ अधिकार प्राप्ती करून देतील. दिवस शुभ आहे. शुभम भवतू!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या