मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /राशीभविष्य: पाडव्याचा दिवस 5 राशींसाठी आहे अनुकूल

राशीभविष्य: पाडव्याचा दिवस 5 राशींसाठी आहे अनुकूल

यासोबतच कर्क लोकांच्या आरोग्य आणि वैवाहिक जीवनावरही विपरित परिणाम होऊ शकतो, काळजी घ्यावी. याशिवाय संक्रमण काळात खर्चही वाढेल. प्रवासादरम्यान विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

यासोबतच कर्क लोकांच्या आरोग्य आणि वैवाहिक जीवनावरही विपरित परिणाम होऊ शकतो, काळजी घ्यावी. याशिवाय संक्रमण काळात खर्चही वाढेल. प्रवासादरम्यान विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

आज दिनांक 5 नोव्हेंबर 2021 शुक्रवार तिथी कार्तिक शुद्ध प्रतिपदा. बलीप्रतिपदा किंवा पाडवा. कृषीप्रधान भारतात या सणाचं फार महत्त्व आहे. कसा साजरा कराल आजचा दिवस?

  आज दिनांक 5 नोव्हेंबर 2021 शुक्रवार तिथी कार्तिक शुद्ध प्रतिपदा. बलीप्रतिपदा किंवा पाडवा. कृषीप्रधान भारतात पाडव्याचे फार  महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त, भूमिपूजन,सुवर्ण खरेदी, वाहन  खरेदी इत्यादीसाठी शुभ दिवस. यादिवशी बलीचे पूजन केले जाते. वडिलांना व पतीला ओवाळून  सण साजरा केला जातो. पाडव्याच्या सर्व वाचकांना मनःपूर्वक शुभेच्छा.

  आज चंद्र रात्री 9.15 पर्यन्त तुला राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

  मेष

  आज आपल्या तापट स्वभावाला काबूत ठेवून काम करा. गुरु दशमात असून  लाभदायक  घटना घडतील. शुक्र जोडीदाराला उत्तम  आर्थिक लाभ देईल. दिवस चांगला आहे.

  वृषभ

  काही  जणांना प्रकृती अस्वस्थ वाटेल.  पोटाचे त्रास जाणवत असतील तर दुर्लक्ष नको. हाती घेतलेली कामे पूर्ण करा. अति  खर्च टाळा. दिवस मध्यम .

  मिथुन

  कामात आणि शिक्षणात  प्रगती होईल. प्रकृती  अस्वस्थ वाटत असेल  तर  आज जपुन रहा. खर्च वाढेल. मुलांकडे  जास्त लक्ष द्यावे लागेल. शनि जप करीत रहावे.

  कर्क

  चतुर्थ मंगळ थोडी  धुसफूस वाढवत असेल पण शांत रहा. लवकरच सगळे ठीक होईल. सप्तम शनि, जोडीदाराला  कष्ट देणारा ठरेल. घरातल्या शुभ घटनांची सुरवात.. दिवस अनुकूल आहे.

  सिंह

  कुटुंब ही तुमची प्राथमिकता आहे. आज दिवस समाधानात जाईल. राशी च्या  तृतीय स्थानातील मंगळ आणि तृतीय चंद्र  प्रवास घडवतील. इच्छा पूर्ती होईल. दिवस  चांगला आहे.

  कन्या

  आज आर्थिक घडामोडी  होतील  कुटुंबियांसाठी वेळ काढला तर बरे होईल. महिला वर्ग नेहमीच  महत्व पूर्ण कामगिरी करतात. . आजही  दिवस तसाच आहे. चांगले फळ मिळेल.

  तुला

  राशीत चंद्र, मंगळ.मातेचं  आरोग्य बिघडलेले असू शकेल. घरातली  विजेची उपकरणे सांभाळून वापरा  दुरुस्ती निघू शकते. प्रकृती जपा.

  वृश्चिक

  व्यय स्थानातील सूर्य,  चंद्र  मतभेद, कुरबुरी  घडवून आणतील. अधिकाऱ्यांशी चर्चा करून मग निर्णय  घ्या. अचानक  छोटा प्रवास  संभवतो. जरा जपून रहा.

  धनु

  आज दिवस जरा वादग्रस्त ठरू शकतो.  मित्रांशी वाद करु नका..नौकरी  व्यवसायातून लाभ  संभवतात. मात्र  सरळ मार्गाने जा. साडेसाती आहे तरी गुरुकृपेने मार्ग निघेल.

  मकर

  राशी स्थानात मार्गी होणारे गुरू महाराज व शनि आप्तेष्टांना नाराज करू नका. त्यांना महत्त्व द्या.असे सुचवीत आहेत. आर्थिक घडी बसवण्याचे प्रयत्‍न करा. कामाच्या ठिकाणी भरपूर वेळ द्यावा लागणार आहे  दिवस चांगला आहे.

  कुंभ

  दिवस उत्तम. आता कामांना वेग येणार आहे  प्रवास योग  येतील. भाग्य साथ देईल. शत्रू पिडा संभवते. पण विजय  तुमचाच होईल. प्रकृती कडे दुर्लक्ष नको. काही  धार्मिक कामात मन रमेल.

  मीन

  जरा जपून राहावे असे  ग्रहमानआहे. एकाग्र राहून काम करा. गुरूची शुभ दृष्टी फायद्याची ठरेल. यश मिळेल पण प्रयत्नाने. संतती  कडे  लक्ष द्यावे लागेल. दिवस मध्यम आहे.

  शुभम भवतु!!

  First published:
  top videos

   Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya