• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • राशीभविष्य: दुपारनंतर या 3 राशींना आज होणार फायदा

राशीभविष्य: दुपारनंतर या 3 राशींना आज होणार फायदा

आज बुधवार दिनांक 3 नोव्हेंबर 2021 तिथी त्रयोदशी/चतुर्दशी. तिथीक्षय असल्यामुळे आजचा आहे भाकड दिवस. तुमच्या राशीत आज काय आहे वाचा..

  • Share this:
आज बुधवार दिनांक 3 नोव्हेंबर 2021 तिथी त्रयोदशी/चतुर्दशी. तिथीक्षय असल्यामुळे  दिवाळी अभ्यंगस्नान, नरक चतुर्दशी उद्या साजरी केली जाईल. आज चंद्र हस्त व चित्रा नक्षत्रातून  भ्रमण करेल. गुरूशी शुभ योग करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष राशीच्या सप्तम स्थानात असलेला सूर्य  जोडीदाराला  शुभ  नाही. बरेच दिवस रेंगाळणारी घराची कामे आता पटापट होतील. ऑफिस मध्ये  तुमचा अधिकार वाढेल. लोक तुमच्या मतांचा आदर करतील. दुपारनंतर दिवस अनुकूलता वाढवणारा आहे. वृषभ षष्ठ स्थानात असलेला  रवि स्थावर संपत्तीत वाढ करेल. स्वभाव तेजस्वी होईल. मंगळ बुध युती बोलण्यात तिखट. पंचमात चंद्र  संतती साठी शुभ. दुपारनंतर मानसिक ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. मिथुन पंचमात प्रवेश करणारा मंगळ हा  शैक्षणिक कामांसाठी उत्तम . सरकारी नोकरी असणार्‍यांना आर्थिक लाभ संभवतात. प्रगतीच्या नवीन संधी येतील.  शनीची उपासना करा. दुपारनंतर दिवस  अनुकूल आहे. कर्क राशी च्या चतुर्थ स्थानात  असलेला सूर्य तुम्हाला सरकारी नोकरीची संधी मिळवून देईल. किंवा सरकारी कामे होतील. वकील, कलाकार यांना  संधी निर्माण होईल.  प्रवास योग, भेटी होतील. दुपारनंतर  जरा आराम करा . सिंह तृतीय  स्थानात येणारा मंगळ तीव्र परिणाम देईल. बोलण्यावर ताबा कटाक्षाने  असू द्या आरोग्य संभाळावे  लागेल. पैतृक संपत्ती संबंधी काही अडचणी येतील. दुपारनंतर दिवस शुभ आहे. कन्या धन स्थानात सूर्य आणि  मंगळ  यांचे  काही अचानक परिणाम होतील.  कुटुंबाशी बोलाचाली, मुलांशी वाद होतील. दुपारनंतर आर्थिक लाभ संभवतात. प्रकृती ठीक राहील. तुला राशीत नुकताच आलेला रवि मंगळ प्रगतीचे नवीन दालन उघडेल. पुढील महिना तुमच्या करिअर साठी सर्वोत्तम आहे. मुलाखत यशस्वी झाल्याने आत्मविश्वास वाढेल. पण  मंगळ प्रकृतीची काळजी घ्यावी असे सुचवतो. वृश्चिक रवि अचानक नवीन संधी घेऊन येईल. वडिलोपार्जित संपत्ती संबंधी निर्णय होईल. धार्मिक निष्ठा तीव्र होतील. परदेशी प्रवासासाठी अनुकूल काळ.  मानसिक ताण जाणवत असेल तर  घरी  आराम करा. धनु मंगळाची बुधासोबत होणारी युती आज  नोकरीसाठी उपयोगी सिद्ध होऊ शकते   आईवडिलांना  जपा. काहींना अचानक आर्थिक लाभ होतील. पण सर्व व्यवहार  जपून करा. दुपारनंतर दिवस चांगला जाईल. . मकर राशीतील शनि जपून राहण्याचे संकेत देत आहे. प्रवास योग येतील. कोणाशी शाब्दिक वाद नको. मात्र व्यवसाय असणार्‍यांना सरकारी मदत मिळेल. दुपारनंतर अचानक कामाचा ताण वाढेल. शनी जप, दान करावे. कुंभ भाग्य स्थानात रवि सरकारी कामांसाठी शुभ आहे  .अडचणी येतील पण काम होईल.   प्रकृतीच्या तक्रारी कडे लक्ष द्यावे. शत्रू पिडा वाढेल  पण जिंकणार तुम्हीच.प्रवास जपून करा. दुपारनंतर दिवस शुभ. शनीची उपासना करावी. मीन मंगळ बुध जोडीदाराला  शुभ नाही. प्रकृती ,पोटाचे त्रास, किंवा काही कायदेशीर बाबी समोर येतील. तुमच्या साठी  धार्मिक वाचन, काही नवीन शिकण्यास अनुकूल वेळ आहे. दशमातील शुक्र काही संधी, धनलाभ मिळवुन देईल.  दिवस मध्यम जाईल शुभम भवतु !!
First published: