• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • राशीभविष्य: वृषभ, मिथुन, कर्केला दिवस लाभदायक; कुठल्या राशींनी सांभाळून राहायचं वाचा...

राशीभविष्य: वृषभ, मिथुन, कर्केला दिवस लाभदायक; कुठल्या राशींनी सांभाळून राहायचं वाचा...

बुध ग्रह भरभराट करतो, असं मानलं जातं. ज्याच्या पत्रिकेत बुध ती चांगली, असंही म्हणतात. पण बुध ग्रहाची इतर लक्षणही जाणून घ्या, सोबत तुमचं आजचं राशीभविष्यही वाचा...

  • Share this:
आज  गुरुवार दिनांक 1 जुलै 2021.ज्येष्ठ कृष्ण सप्तमी. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीतून राहील. ग्रह माळेतला पुढचा ग्रह म्हणजे बुध. सर्वात लहान व सूर्या पासून सर्वात जवळ असलेला हा ग्रह आहे. बुध ग्रह आश्लेषा ,ज्येष्ठा व  रेवती  नक्षत्रांचा स्वामी आहे. मध्यम गती, नपुंसक  ग्रह असून याचा अंमल मेंदू वर चालतो. 'बुध बुद्धीचा कारक, बुध ग्रह आहे ज्यास नीट, त्यास सर्व मार्ग सुचती सुभट " असे  म्हटले आहे. पत्रिकेत बुध, बुद्धी,शिक्षण, समज,वाणी आत्मविश्वास ,बहिण , व्यवसाय, इत्यादी  गोष्टीचा कारक आहे . बुधाची उच्च राशी  मिथुन  व कन्या आहे. तर मीन ही नीच रास आहे. उन्माद, फिट  येणे  तोतरेपणा  ,मेंदू विकार ,व्यवसायात  अपयश इत्यादी  नीच व बिघडलेल्या बुधाची लक्षणे आहेत. तर अतिशय हजरजबाब ,बुद्धिमान , बोलक्या,  यशस्वी अश्या व्यक्ती उच्च  बुधाची देणगी  आहे. बुधाचा रंग हिरवा असून पाचू किंवा पन्ना हे रत्न आहे. वाणिज्य  शाखा, अर्थकारण  ,  प्रिंटिंग प्रेस  , प्रकाशन  असा कुठलाही व्यवसाय  बुध  व्यक्तीनी करावा. ओम बुं बुधाय नम : हा जप करावा. आजचे बारा राशींचे राशी भविष्य मेष व्ययस्थानातील चंद्र  आज दिवस अनुकूल नाही हे सांगतो आहे. मीन  चंद्र, मंगळ  शुभ योगात असून  आर्थिक  बाबतीत यश मिळवून देतील. प्रकृती  जरा  नरम राहील. दिवस मध्यम . वृषभ आज मित्र मैत्रिणींसोबत आनंदने दिवस घालवा. लाभ होतील. तुमच्या बुद्धी  व धैर्याने परिस्थितीत बदल होईल. नवीन परिचय  होतील.  दिवस  उत्तम  आहे. मिथुन आज एखादी महत्त्वाची मीटिंग होईल. त्यात  तुम्ही  सर्वांच्या  नजरेस याल. तुमचे काम  आणि  बुद्धी   सर्वाना  चकित करेल. राशीतील सूर्य  तेज  देईल. प्रसन्न दिवस. कर्क महत्त्वाची बातमी, भाग्यकारक  घटना असा हा आनंदी दिवस आहे. आर्थिक दृष्टय़ा दिवस उत्तम  आहे. राशीतील  मंगळ शुक्राचे प्रभावक्षेत्र स्त्री वर्गाकडून  लाभ  दर्शवतो. दिवस  उत्तम . सिंह आज अष्टमात चंद्र ,व्ययात मंगळ शुक्राचे भ्रमण सांभाळून रहा असे सुचवत आहे. कोणाशीही वाद करू नका. व्यवसायधंद्यात आज काही  बदल नको.  महत्त्वाचा निर्णय  टाळा. दिवस मध्यम. कन्या आज जरा बाहेर  फिरून येण्याचा  मूड होईल. दोघे मिळून काही  खरेदी कराल. नोकरीमध्ये तुमच्या कष्टांची कदर केली जाईल. व्यवसाय  उत्तम  राहील. शुक्र लाभ देण्यास अनुकूल आहे. तुला षष्ठ चंद्र, आराम, मनोरंजन, नातेवाईकांना भेट किंवा  फोन असे दर्शवतो आहे. दशमातील मंगळ चंद्र नवपंचम योग  करीत आहेत. दिवस शुभ  आर्थिक बाजू चांगली राहील. वृश्चिक महत्त्वाचा पत्र व्यवहार, जन संपर्क होईल. संतती ला वेळ द्यावा लागेल. जरा प्रकृतीला  जपावे. मित्र मैत्रिणींसोबत दिवस आनंदात घालवा. आर्थिक  बाजू ठीक राहील. दिवस शुभ. धनु आज गृहसौख्य भरपूर लाभणार आहे. घरासाठी काही नवीन खरेदी  होईल. प्रकृती थोडी नरम राहील. काळजी घ्या. घरीच  आराम करावा असे वाटेल. दिवस  उत्तम. मकर तुम्ही आज जे काम हाती घ्याल त्यात यश  मिळेल. तृतीय चंद्र आज प्रवास, मौजमजेसाठी खर्च असे दर्शवतो. बहीण भावंंडं भेट देतील. तुमचा दिवस उत्तम जाईल. कुंभ आज चा दिवस  आर्थिक भरभराट, कुटुंबाचे भक्कम  पाठबळ असा आहे. व्यावसायिक निर्णय घ्यायचे असतील तर दिवस शुभ. शत्रू  टिकाव धरणार  नाहीत  उत्तम  दिवस. मीन आज राशीतून होणारे  चंद्राचे भ्रमण मंगळ शुक्र नवपंचम योग करीत आहे.कधीतरी स्वतःचा  विचार करणे  गरजेचे  असते. आज स्वतः साठी वेळ काढा. काही मित्र मैत्रिणींना भेटा.धार्मिक कार्य  होईल. शुभम भवतु !!
First published: