Home /News /astrology /

Daily Horoscope: कसा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस, वाचा आजचं राशीभविष्य

Daily Horoscope: कसा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस, वाचा आजचं राशीभविष्य

सोमवारी नवा आठवडा सुरू होतो आहे. आठवड्याची सुरुवात कशी होईल याची प्रत्येकालाच उत्सुकता असते. Daily Horoscope 17 January 2022: तुमचा आजचा सोमवारचा दिवस कसा असेल? वाचा तुमचं दैनंदिन राशीभविष्य

नवी दिल्ली, 17 जानेवारी : सोमवारी नवा आठवडा सुरू होतो आहे. आठवड्याची सुरुवात कशी होईल याची प्रत्येकालाच उत्सुकता असते. तुमचा 17 जानेवारी 2022, सोमवार हा दिवस कसा जाईल, याबद्दल आम्ही सांगणार आहोत. सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा ( Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.com) या सुप्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ आहेत त्यांनी आपल्या ओरॅकल स्पिक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं भविष्य वर्तवलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) - 17 जानेवारीचा तुमचा संपूर्ण दिवस अगदी घडामोडींनी भरलेला असेल. त्यामुळे तयारीतच राहा. तुमचा उत्साहही दांडगा असेल आणि तुम्हीही नव्या कामासाठी तयारी दाखवाल. मानसिक ताण असल्यास तो कमी करा. LUCKY SIGN – A metallic vase (लोखंडाची फुलदाणी) वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) - मनातल्या खऱ्या भावना आता लपून राहणार नाहीत. तुम्ही मनातल्या गोष्टी कोणाकडे तरी व्यक्त करण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही आधी केलेल्या चांगल्या गोष्टींचा फायदा आता तुम्हाला नक्कीच होईल. LUCKY SIGN – Marigold flowers. मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) - जर तुम्हाला कोणासोबत पार्टनरशिपची किंवा एकत्र काम करण्याची संधी मिळत असेल, नक्की विचार करा. तुमची सकाळ थोडी तणावपूर्ण गेली तरी संध्याकाळ मात्र छान आरामदायी जाईल. नव्या कल्पना डोक्यात असल्यास साकार व्हायला थोडा वेळ घेतील. LUCKY SIGN – A gift box. कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) - तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. ज्यामुळे तुम्हाला भविष्यात नवीन कामाची संधी उपलब्ध होईल किंवा व्यापाराच्या नव्या कल्पना सुचतील. जर एखादी बोलणी किंवा संपर्काचं काम राहीलं असेल तर ते लगेच पूर्ण करा. LUCKY SIGN – A parrot. सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) - तुमची भेट एका चांगल्या गुरू किंवा प्रभावी व्यक्तिमत्वाशी होईल, जे तुम्हाला प्रभावित करतील. घरातील घटनांचा विचार करण्यात तुमच्या दिवस व्यस्त राहील. दिवसभराच्या वेळाचं गणित जमवणं कठीण जाईल. LUCKY SIGN – A fenced garden. कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) - काही दिवस हे इतर दिवसांपेक्षा जरा आव्हानात्मक असतात. आजचा दिवस तुम्हाला तसाच वाटेल. तुमच्या आसपासच्या शक्ती जास्त प्रभावी असतील. पण हे वातावरण दुपारनंतर सुधारेल. LUCKY SIGN – A fengshui symbol. तुळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) - छोट्या छोट्या गोष्टींचा तणाव न घेतल्यास आज योग्य ठरेल. महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देण्याची जास्त गरज आहे. तुमच्या पती किंवा पत्नीने दिलेला सल्ला आज तुमच्यासाठी नक्कीच विचारपूर्ण ठरेल. LUCKY SIGN – A multicolored carpet. वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) - तुमच्याकडे आकर्षित झालेल्या एखाद्या व्यक्तीशी तुमची भेट होण्याची शक्यता आहे. येणारे काही दिवस तुमच्या कामांमध्ये तुम्ही अजून व्यस्त रहाल. दैवी अनुभवामुळे दिवस चांगला जाईल. LUCKY SIGN – An alarm clock. धनु (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) - आळस वेळीच न झटकल्यास येणाऱ्या काळावर परिणाम करणारा ठरू शकतो. तुमच्या कंफर्ट झोनतून बाहेर पडण्याचा आजचा दिवस आहे. तुमच्या दिवसभरातील बराच वेळ एखादा सहकारी घेतील. LUCKY SIGN – A floral print. मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) - कामाला उशीर होणे किंवा काम पुढे ढकलले जाणाचा आजचा दिवस असेल. आजच्या दिवसातील काही महत्त्वाच्या गोष्टींचे वेळापत्रक तुम्हाला पुन्हा बसवावे लागेल. नवीन नियम किंवा गोष्टी पाळणे तुम्हाला तेवढेसे रूचणार नाही. LUCKY SIGN – A fruit basket. कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) - दिवसाची सुरूवात थोडी रटाळ असेल परंतु, दुपारनंतर दिवस चांगला जाईल. नातेवाईकांकडून एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीसाठी तगादा लावला जाईल. तुम्ही एखाद्या खास समारंभासाठी जागा ठरवायच्या बेतात असल्यास ही वेळ योग्य आहे. LUCKY SIGN – A glass bowl. मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20मार्च) - जुन्या आठवणी किंवा घटनांमुळे तुम्ही आज भावूक व्हाल. मित्रांसोबत लवकरच फिरायला जाण्याची तीव्र इच्छा निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी तुमचं बोलणं नेमकं ठेवा. LUCKY SIGN – An old photograph.
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या