मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Astrology: एकाच दिवशी दोन ग्रहांचं संक्रमण; 'या' राशींवर होईल परिणाम

Astrology: एकाच दिवशी दोन ग्रहांचं संक्रमण; 'या' राशींवर होईल परिणाम

 ग्रहांच्या हालचालीमध्ये (Shukra Transit)कायम बदल होत असतात. या बदलांमुळे अनेकांच्या जीवनात उलथापालथ सुरू होते. आता एकाच दिवशी दोन महत्त्वाच्या ग्रहांची हालचाल होणार आहे.

ग्रहांच्या हालचालीमध्ये (Shukra Transit)कायम बदल होत असतात. या बदलांमुळे अनेकांच्या जीवनात उलथापालथ सुरू होते. आता एकाच दिवशी दोन महत्त्वाच्या ग्रहांची हालचाल होणार आहे.

ग्रहांच्या हालचालीमध्ये (Shukra Transit)कायम बदल होत असतात. या बदलांमुळे अनेकांच्या जीवनात उलथापालथ सुरू होते. आता एकाच दिवशी दोन महत्त्वाच्या ग्रहांची हालचाल होणार आहे.

दिल्ली, 1 ऑक्टोबर: ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, एखाद्या व्यक्तीच्या राशीतल्या ग्रहांच्या (planets transition) स्थितीनुसार त्या व्यक्तीला फळं प्राप्त होत असतात. ग्रहांच्या हालचालीमध्ये (Shukra Transit)कायम बदल होत असतात. हा बदल काही राशींसाठी शुभ असतो. या बदलांमुळे अनेकांच्या जीवनात उलथापालथ सुरू होते. आता एकाच दिवशी दोन महत्त्वाच्या ग्रहांची हालचाल होणार आहे. म्हणजे ते एका राशीतून दुसऱ्या राशीत मार्गक्रमण करणार आहेत.

शनिवार, 2 ऑक्टोबर 2021 रोजी दोन महत्त्वाच्या ग्रहांच्या हालचालींमध्ये बदल होणार आहे. शुक्र ग्रह (Venus) वृश्चिक (Scorpio) राशीमध्ये प्रवेश करत आहे. वक्री बुध (Mercury) कन्या (Virgo) राशीत प्रवेश करेल. ग्रहांच्या या बदलाचा परिणाम सर्व 12 राशींवर होईल. याबाबतची माहिती 'आज तक'ने दिली आहे.

ज्योतिषी डॉ. अरविंद मिश्रा यांनी आज तकला सांगितलं, की एका दिवसात दोन महत्त्वाच्या ग्रहांच्या हालचालीतला हा बदल लोकांच्या जीवनावर मोठा परिणाम करेल. शुक्र ग्रह 2 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 9:35 वाजता वृश्चिक राशीत प्रवेश करेल. पौराणिक कथांमध्ये शुक्र ग्रहाचा उल्लेख दैत्यगुरू म्हणून केला गेला आहे. त्यांचं लोकप्रिय नाव शुक्राचार्य आहे. दैत्यगुरू शुक्राचार्य हे भगवान शिव यांचे महान भक्त होते. शुक्राचा संक्रमण कालावधी सुमारे 23 दिवसांचा असेल.

दुसरीकडे, बुध त्याच्या वक्री अवस्थेत 2 ऑक्टोबर 2021 रोजी पहाटे 3:23 वाजता कन्या राशीत संक्रमण करेल. 18 ऑक्टोबर 2021 पर्यंत बुध कन्या राशीमध्येच असेल. 2 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 9:43 वाजल्यानंतर बुध तूळ राशीत प्रवेश करेल. बुधाची आई तारा आणि वडील चंद्र आहेत. वक्री अवस्थेत असलेल्या बुधाच्या संक्रमणाचा सर्व 12 राशींवर वेगवेगळा परिणाम होईल. ज्योतिष शास्त्रानुसार, दुसरं घर, चौथं घर, सहावं घर, आठवं घर, दहावं घर आणि अकराव्या घरात बुध शुभ परिणाम देतो. याशिवाय इतर सर्व घरांमध्ये याचा परिणाम सामान्य किंवा नुकसानकारक असू शकतो.

दोन्ही ग्रहांच्या हालचालीतला हा बदल वृश्चिक, धनू आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल असेल. हा बदल मेष, वृषभ आणि मीन राशीच्या लोकांसाठी फार अनुकूल नसेल. दुसरीकडे या बदलाचा इतर राशीच्या लोकांवर फारसा परिणाम होणार नाही.

ज्योतिषांच्या मते, ग्रहांच्या स्थितीत दररोज छोटे-मोठे बदल घडत असतात. ग्रह-नक्षत्रांच्या बदलत्या हालचालींचा मनुष्याच्या जीवनावर सखोल प्रभाव पडतो. एखाद्याच्या जीवनात आनंद येतो, तर एखाद्याच्या आयुष्यात समस्या असल्यास या सर्वांच्या मागे ग्रहांची हालचाल मुख्य जबाबदार असते.

First published: