मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Rashi Parivartan 2022: रक्षाबंधनापूर्वी 'या' ग्रहाने बदलली आपली दिशा; कोणत्या राशीवर कसा होणार परिणाम?

Rashi Parivartan 2022: रक्षाबंधनापूर्वी 'या' ग्रहाने बदलली आपली दिशा; कोणत्या राशीवर कसा होणार परिणाम?

विशिष्ट ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचे चांगले-वाईट परिणाम होत असतात, असं ज्योतिषशास्र मानतं.

विशिष्ट ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचे चांगले-वाईट परिणाम होत असतात, असं ज्योतिषशास्र मानतं.

विशिष्ट ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचे चांगले-वाईट परिणाम होत असतात, असं ज्योतिषशास्र मानतं.

    मुंबई, 8 ऑगस्ट-   विशिष्ट ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचे चांगले-वाईट परिणाम होत असतात, असं ज्योतिषशास्र मानतं. ग्रहांच्या राशी प्रवेशाने आयुष्यात नेमके काय बदल होऊ शकतात, हे जाणून घेण्याची आपल्यापैकी अनेकांची इच्छा असते. रविवारी, 7 ऑगस्ट 2022 रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास शुक्र ग्रहाने मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश केला आहे. 31 ऑगस्टपर्यंत तो याच राशीत राहील. रक्षाबंधनच्या आधी शुक्राचं हे गोचर चार राशींसाठी अत्यंत लाभदायी ठरणार असल्याचा दावा ज्योतिष्यांनी केला आहे. ‘आज तक हिंदी’ने या संदर्भात वृत्त दिलं आहे. वृषभ : नोकरीत पद, प्रतिष्ठा वाढणार शुक्राच्या गोचरनंतर दाम्पत्यांच्या जीवनात सुधारणा होणार आहे. नोकरीत पद व प्रतिष्ठा चांगलीच वाढणार आहे. मानसिक समस्यांपासून सुटका होणार आहे. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या आर्थिक अडचणींपासून मुक्तता मिळणार आहे. अनेक वर्षांपासून कर्जात बुडालेली रक्कम परत मिळू शकते. या राशीतील व्यक्तींनी सूर्यदेवाला अर्घ्य द्यावं. या राशीतीला लोकांचा शुभ रंग गुलाबी हा आहे. सिंह : नोकरी, व्यवसायासाठी काळ उत्तम सिंह राशी असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कार्यामध्ये यश प्राप्त होणार आहे. नोकरी-व्यापारासाठी हा काळ अत्यंत शुभ असणार आहे. व्यावसायिक जीवनात तुम्ही केलेल्या कामांचे खूप कौतुक होईल. आर्थिक आघाडीवर पैसे कमावण्याच्या चांगल्या संधी मिळतील. नोकरी-व्यवसायात हा काळ लाभदायी असणार आहे. या राशीतील व्यक्तींसाठी शुभ रंग हिरवा आहे. कन्या : वाहन खरेदी लाभदायी शुक्राच्या राशी बदलाने विशेषत: कन्या राशी असलेल्या व्यक्तींची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. व्यवसायामध्ये वृद्धी नोंदवली जाईल. जमीन किंवा वाहन खरेदी करण्यासाठी ही वेळ अत्यंत लाभदायी मानली गेली आहे. या राशीच्या व्यक्तींनी नात्यांना प्राधान्य देणं अत्यंत आवश्यक आहे. भाऊ-बहिणीचं नातं अधिक दृढ होण्यास मदत मिळणार आहे. हे गोचर सुरू झाल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य देण्यास सुरूवात करायला हवी. तर या राशीतील व्यक्तींचा शुभरंग निळा असणार आहे. (हे वाचा: Daily Horoscope : सकाळी उठल्यावर अनिश्चितता; अस्वस्थतेची भावना असेल, मात्र...) मीन : पैसा कमावण्याची संधी मिळणार मीन राशीच्या मुलांची प्रगती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या राशीतील व्यक्तींना पैसा कमावण्याची उत्तम संधी प्राप्त होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी ही वेळ अनुकूल राहणार आहे. परीक्षेत उत्तम गुण प्राप्त होतील. शुक्राच्या गोचरानंतर अन्नदान करायला हवं. या राशीतील व्यक्तींसाठी शुभ रंग जांभळा हा आहे.ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवावा अथवा नाही, हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण ज्योतिषशास्त्राप्रमाणे ग्रहाने राशी बदलली की, विविध राशी असणाऱ्या व्यक्तींच्या जीवनातही काही बदल होत असतात, असं मानलं जातं. ज्योतिषशास्त्रावर अनेक लोकांचा विश्वासही असतो. भविष्यात आपल्या बाबतीत काय घडू शकतं किंवा कुठल्या बाबतीत आपण सतर्क राहायला हवं, हे जाणून घेण्याचा हा उत्तम मार्ग असल्याचा दावाही अनेकांकडून केला जातो.
    First published:

    Tags: Astrology and horoscope

    पुढील बातम्या