मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

धनत्रयोदशीच्या आधीच शुक्राचं राशी परिवर्तन; या 5 राशींसाठी ठरणार लाभदायक

धनत्रयोदशीच्या आधीच शुक्राचं राशी परिवर्तन; या 5 राशींसाठी ठरणार लाभदायक

कर्कच्या लोकांना कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. मानसिक तणाव असू शकतो. तसेच, मुलाची चिंता राहील. आरोग्याबाबतही काळजी घ्यावी लागेल. विशेषतः पैशाच्या बाबतीत खूप सावधगिरी बाळगावी लागेल.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

कर्कच्या लोकांना कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. मानसिक तणाव असू शकतो. तसेच, मुलाची चिंता राहील. आरोग्याबाबतही काळजी घ्यावी लागेल. विशेषतः पैशाच्या बाबतीत खूप सावधगिरी बाळगावी लागेल. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

एका विशिष्ट कालावधीत ग्रह राशी परिवर्तन करत असतात. धनत्रयोदशीआधी (Dhanteras) होणाऱ्या राश्यांतराचा तुमच्यावर काय होणार

नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : जीवनात सुख-समृद्धी यावी, यशप्राप्ती व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. प्रत्येकजण त्यादृष्टीनं कार्यरत असतो. भारतीय संस्कृती अध्यात्माला जसं महत्त्वं आहे, तसंच महत्त्व ज्योतिष शास्त्राला दिलं गेलं आहे. एखाद्या महत्त्वाच्या कामात अपयश आल्यास, कोणत्याही प्रकारे वृद्धी झाली नाही तर काहीजण ज्योतिषांचा सल्ला घेतात. ज्योतिषशास्त्रात नवग्रह (Horoscope on Diwali) हा महत्त्वाचा घटक मानला गेला आहे. या ग्रहांचा मानवी जीवनावर बरा वाईट परिणाम होतो, असं ज्योतिषशास्त्रात मानलं जातं. एका विशिष्ट कालावधीत ग्रह राशी परिवर्तन करत असतात. ग्रहांचं राशी परिवर्तन (venus Transit) हा देखील औत्सुक्याचा विषय असतो. दिवाळी आता अगदी काही दिवसांवर आली आहे. वसुबारसेपासून दिवाळीला (Diwali) प्रारंभ होत आहे. धनत्रयोदशीच्या 3 दिवस अगोदर म्हणजेच 30 ऑक्टोबर 2021 रोजी शुक्र (Venus) धनु (Sagittarius) राशीत प्रवेश करत आहे. शुक्र हा ग्रह सौंदर्य, आनंद आणि सुसंस्कतपणाचा कारक मानला जातो. शुक्राचं राशी परिवर्तन 12 पैकी 5 राशींना विशेष लाभदायी ठरणार आहे. याविषयीची माहिती `आज तक`ने दिली आहे.

30 ऑक्टोबरला 3 वाजून 56 मिनिटांनी शुक्र धनु राशीत प्रवेश करत असून, 8 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 12.56 मिनिटांपर्यंत शुक्र धनु राशीत असेल, त्यानंतर तो मकर राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राच्या धनु राशीतील प्रवेशामुळे 12 राशींना होणारी फलप्राप्ती पुढील प्रमाणे....

मेष ( Aries) : मेष राशीच्या व्यक्तींच्या दुसऱ्या आणि सातव्या स्थानाचा स्वामी असलेला शुक्र ग्रह 9 व्या स्थानात प्रवेश करत आहे. जर तुम्ही दागिन्यांशी संबंधित व्यवसाय करत असाल तर या कालावधीत तुम्हाला विशेष यश मिळेल. व्यापार वृध्दी आणि नवे सौदे होतील. या कालावधीत खर्च वाढू शकतो. भौतिक गरजांवर खर्च करण्याचा विचार करत असाल तर त्याचा आर्थिक नियोजनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे याबाबत काळजी घ्यावी.

Diwali 2021: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीसह विष्णूची पूजा का केली जात नाही?

वृषभ (Taurus) : शुक्र हा ग्रह तुमचा राशीस्वामी आहे. हा ग्रह 6 व्या स्थानाचा स्वामी आहे. आता ग्रह कुंडलीतील 8 व्या स्थानात प्रवेश करत आहे. हे गोचर वृषभ राशीसाठी संमिश्र असेल. या कालावधीत आरोग्याविषयी समस्या उदभवू शकतात. दुर्घटना घडण्याचीही शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल. मात्र वरिष्ठ तुमच्या कामाचं कौतुक करतील. या कालावधीत तुम्ही जुन्या कर्जाची परतफेड कराल. वडिलोपार्जित मालमत्ता किंवा सासरकडून लाभ होण्याची शक्यता आहे.

Vastu tips : घरात मुंग्याची रांग लागली आहे? यातून वास्तू देत असते विशिष्ट संकेत

मिथुन (Gemini) : शुक्र हा बुध ग्रहाचा मित्र समजला जातो. मिथुन राशीच्या 5 व्या आणि 12 व्या स्थानाचा स्वामी असलेला शुक्र आता 7 व्या स्थानातून गोचर करणार आहे. जे लोक गांभिर्यानं नवं नातं जोडू इच्छितात त्यांच्यासाठी हा कालावधी चांगला असेल. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असाल तर हा कालावधी प्रेम व्यक्त करण्यासाठी चांगला आहे. या कालावधीत दूरच्या प्रवासाचे योग आहेत. तसेच जोडीदारासमवेत तुम्ही चांगला वेळ घालवू शकाल.

कर्क (Cancer) : शुक्र तुमच्या चौथ्या आणि अकराव्या स्थानाचा स्वामी आहे. आता तो 6 व्या स्थानात प्रवेश करत आहे. या कालावधीत तुमचा कुटुंबातील सदस्यांशी वाद-विवाद होऊ शकतो. यामुळे कुटुंबातील शांती आणि आनंदाला तडा जाऊ शकतो. या गोचर कालावधीत तुम्हाला आर्थिकदृष्ट्या असुरक्षितता जाणवेल. त्यामुळे तुम्हाला खर्चासाठी कदाचित कुटुंबातील सदस्यांकडून पैसे उधार घ्यावे लागू शकतात.

सिंह (Leo) : शुक्र हा ग्रह तुमच्या तिसऱ्या आणि 10 व्या स्थानाचा स्वामी असून, तो 5 व्या स्थानातून गोचर करणार आहे. जे लोक डिझाईनिंग किंवा रचनात्मक उद्योग क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्यासाठी हा कालावधी अनुकूल असेल. उत्पादन विक्री आणि सेवा पुरवण्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तसेच चांगल्या कामामुळं पगारवाढ मिळण्याची देखील शक्यता आहे. हा कालावधी तुमच्या प्रेम जीवनासाठी अधिक चांगला ठरेल.

कन्या (Virgo) : कन्या राशीच्या जातकांसाठी शुक्र हा दुसऱ्या आणि नवव्या स्थानाचा स्वामी असतो. आता तो चौथ्या स्थानातून भ्रमण करणार आहे. या कालावधीत तुम्ही कुटुंबियांसमवेत चांगला वेळ व्यतीत कराल. या कालावधीत प्रॉपर्टी खरेदी करू शकता. वाहन खरेदीचे योगही चांगले आहेत. जे लोक वर्क फ्रॉम होम करत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ विशेष अनुकूल आहे. तुम्हाला मेहनतीचं फळ नक्की मिळेल.

तुळ (Libra) : शुक्र हा तुमचा राशी स्वामी असून तो आठव्या स्थानाचा स्वामी देखील आहे. शुक्राचं हे गोचर तुमच्या तिसऱ्या स्थानातून असेल. या कालावधीत तुम्ही कुटुंबाला आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न कराल. दिर्घकालीन गुंतवणूकीसाठी हा कालावधी योग्य नाही. या कालावधीत नोकरदारांसाठी बदलीचे योग आहेत. जर तुम्ही नोकरी बदलली तर तुम्हाला चांगलं पददेखील मिळू शकतं.

वृश्चिक (Scorpio) : शुक्राचं तुमच्या बाराव्या आणि सातव्या स्थानावर नियंत्रण असतं. शुक्राचं हे गोचर दुसऱ्या स्थानातून होत आहे. या कालावधीत खर्च प्रमाणापेक्षा अधिक होऊ शकतो. घरात काही वस्तु खरेदीवर खर्च होऊ शकतो. या कालावधीत तुमच्या बोलण्यात गोडवा राहील आणि यामुळे आसपासचे लोक तुमचं विशेष कौतुक करतील. जे लोक ललितकला किंवा संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्यासाठी हा कालावधी विशेष अनुकूल असेल. तुमचे विचार कौतुकास पात्र ठरतील आणि त्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल.

दिवाळीच्या रात्री हे प्राणी-पक्षी दिसणं म्हणजे लक्ष्मीच्या आगमनाचे आहेत संकेत

धनु (Sagittarius) : शुक्र धनु राशीच्या 6 व्या आणि 11 व्या स्थानाचा स्वामी असतो. शुक्राचं गोचर आता पहिल्या स्थानातून होत आहे. धनु राशीच्या लोकांसाठी हा कालावधी विशेष अनुकूल नसेल. शत्रु प्रबळ झाल्यानं सतर्क राहावं लागेल. व्यावसायिकांना मोठ्या स्पर्धेला आणि अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. नोकरदार वर्गासाठी हा कालावधी चांगला असेल. कार्यस्थळी चांगले वातावरण असेल. सहकारी प्रोजेक्टसमध्ये मदत करतील.

मकर (Capricorn) : शुक्र हा ग्रह मकरेच्या 5 व्या आणि 10 व्या स्थानाचा स्वामी असतो. आता शुक्राचं गोचर 12 व्या स्थानातून होणार आहे. या कालावधीत खर्च वाढू शकतो. यामुळे आर्थिक नियोजनावर परिणाम होऊ शकतो. परंतु, आर्थिक तरतुद करण्यात यश मिळेल. या कालावधीत आळशी वृत्ती वाढेल. त्यामुळे दैनंदिन व्यायामावर भर द्यावा.

कुंभ (Aquarius) : शुक्र हा ग्रह कुंभ राशीसाठी अनुकूल मानला जातो. तो चौथ्या आणि नवव्या स्थानाचा स्वामी असतो. आता शुक्राचं गोचर अकराव्या स्थानात होणार आहे. हा कालावधी तुमच्यासाठी अनुकूल असले. भाग्याची साथ मिळेल. आईकडून विशेष सहयोग मिळेल. जमीन किंवा प्रॉपर्टीत गुंतवणूक करण्यासाठी हा कालावधी चांगला आहे. या गोचर कालावधीत तुमचा कल अध्यात्माकडे असेल.

मीन (Pisces) : शुक्र मीन राशीच्या तिसऱ्या आणि आठव्या स्थानाचा स्वामी असतो. आता शुक्राचं गोचर दहाव्या स्थानातून होणार आहे. या कालावधीत बहिण-भावांकडून चांगले सहकार्य मिळेल. आई-वडिलांशी संबंध चांगले राहतील. जमीन किंवा अन्य प्रॉपर्टीत गुंतवणूक करण्यासाठी योजना आखाल. जर तुम्ही शिक्षक असाल तर हा कालावधी तुमच्यासाठी चांगला आहे.

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya