मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

आजचे राशीभविष्य: वृषभ, कर्क, तुळा राशीच्या व्यक्तींनी सांभाळून राहा, वाचा तुमच्या राशीचं भविष्य

आजचे राशीभविष्य: वृषभ, कर्क, तुळा राशीच्या व्यक्तींनी सांभाळून राहा, वाचा तुमच्या राशीचं भविष्य

Horoscope: आज बुधवार दिनांक 9 june2021 वैशाख कृष्ण चतुर्दशी / अमावस्या. चंद्र आज वृषभ राशीतून भ्रमण करेल. त्याचा परिणाम तुमच्या राशीवर कसा होणार जाणून घ्या आजचं राशीभविष्य..

Horoscope: आज बुधवार दिनांक 9 june2021 वैशाख कृष्ण चतुर्दशी / अमावस्या. चंद्र आज वृषभ राशीतून भ्रमण करेल. त्याचा परिणाम तुमच्या राशीवर कसा होणार जाणून घ्या आजचं राशीभविष्य..

Horoscope: आज बुधवार दिनांक 9 june2021 वैशाख कृष्ण चतुर्दशी / अमावस्या. चंद्र आज वृषभ राशीतून भ्रमण करेल. त्याचा परिणाम तुमच्या राशीवर कसा होणार जाणून घ्या आजचं राशीभविष्य..

मेष

चटपटीत, आग्रही  आणि उतावीळ अशा मेष व्यक्तींना आजचा दिवस अनुकूल आहे. कौटुंबिक आणि आर्थिक व्यवहार याकडे  लक्ष पुरवावे लागेल. नवीन संधी मिळेल. अमावस्येच्या काळात नामजप, उपासना  करावी.

वृषभ

रसिक, सुंदर, कलाप्रेमी अश्या ह्या व्यक्ती  असतात. आज राशिस्थानी  होणार असलेली चंद्र सुर्य राहु  ही ग्रहस्थिती सांभाळून रहा असे सुचवते  आहे. मन उद्विग्न झाले  तर ओम  रं राहवे नम: ह्या मंत्राचा  जप करावा. निर्णय टाळा.

मिथुन

हजरजबाबी, प्रसन्न  मिथुन राशीच्या व्यक्तींना व्यय स्थानातील ग्रहांची  हजेरी थोडी  त्रास द्यायचा प्रयत्‍न करेल. दिवस  शांततेत घालवा. नामस्मरण करा.अमावास्या काळात शिधा दान  करणे  फार  फायद्याचे असते. दान करा.

कर्क

या राशीच्या  व्यक्ती  हळव्या, कुटुंबप्रेमी असतात. राशिस्थानी चंद्र  सूर्य व राहु सोबत आहे. मानसिक आंदोलने होतील. मंगळ शनी  प्रतियोग आहे. प्रकृती सांभाळा. आर्थिक स्थिती चांगली राहील.

सिंह

मानी, उदार आणि कर्तव्यनिष्ठ असे  सिंह राशीचे लोक  असतात. सध्या कामाच्या ठिकाणी  ताण  जाणवू शकतो. व्ययात असलेला मंगळ खर्चात वाढ करणारा आहे. दिवस चांगला आहे.

कन्या

चिकित्सक, स्वाभिमानी, हुशार  असे  या व्यक्तींचे वर्णन करता येईल.  भाग्य स्थानातील ग्रहांची  उपस्थिती  नवीन संधी  मिळवून देईल. अमावास्या काळात  ईश्वरी उपासना करावी.

तुला

न्यायप्रिय, सडेतोड  आणि आनंदी व्यक्ती. अष्टम स्थानातील ग्रहाची गर्दी   प्रकृतीची काळजी  घेण्याचे सुचवते आहे. आर्थिक स्थिती  चांगली राहील.  अन्नदान आणि  उपासना  करावी

वृश्चिक

अत्यंत ऊर्जावान, रागीट, कार्य कुशल  अश्या या व्यक्ती सध्या  अमावस्येच्या प्रभाव  क्षेत्रात  आहेत.

जपून रहा. राशीतील  केतू हा आध्यात्मिक उन्नतीसाठी  अनुकूल आहे. जोडीदाराची काळजी घ्या.

धनु

मुद्देसूद, हुशार  आणि कामाचा उरक असणार्‍या व्यक्ती. आरोग्याची  काळजी घ्या.  कोणाला उधारी  देऊ नका, घेऊ नका. कुटुंबातील व्यक्ती  भेटू शकतात.

मकर

या राशीचे लोक अत्यंत  चिकाटीने काम करणारे ,शांत,  स्थिर बुद्धी  असे असतात. शनी मंगळ प्रतियोग आहे. सांभाळून रहा. दिवस  काही वाचन, अध्ययन करण्यात घालवा. शनी  देवांची उपासना  करा.

कुंभ

काटेकोर, अभ्यासूवृत्ती, तार्किक बाजू उत्तम. कुंभ व्यक्ती आज घरात वेळ  घालवतील. जास्तीचे काम उरकून घ्या.  घरातील व्यक्तींच्या सोबत रहा. दिवस चांगला  आहे.

मीन

संकोची  शांत, मन मिळावु  आणि समाधानी व्यक्ती असतात. आज ज्यांना फोन करायचा राहिला असेल त्यांच्या शी संपर्क साधा. बहिण भावंड भेट  .छोटासा प्रवास घडेल .दिवस  समाधान कारक आहे.

हे होते आजचे  बारा राशींचे  भविष्य. शुभम भवतु!

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya