वाचा 12 राशींचं भविष्य. कुठल्या राशीला आजचा दिवस जाईल चांगला?
मेष
दुपारनंतर दिनमान अनुकूल होईल.आर्थिक व्यवहार जपून करा. अचानक पैसा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबाला वेळ द्यावा. दिवस चांगला आहे .
वृषभ
आज दुपारनंतर मानसिक अशांती वाढेल. राशीत येणारा चंद्र राहू व सूर्या सोबत असून येणारे दोन दिवस काळजी घ्या असे सुचवतो आहे. मोठे निर्णय टाळा. उपासना करा.
मिथुन
राशीच्या व्ययस्थानातील चंद्र भ्रमण राहू, आणि सूर्य असं ग्रहमान फारसे अनुकूल नाही. पण गुरु महाराज साथ देतील. प्रकृती ला जपावे. आर्थिक व्यवहार टाळावे.
कर्क
उद्याचा दिवस शुभ संकेत देतो आहे. लाभ होतील. मित्र मैत्रिणीशी संवाद साधा. वृषभ राशीतील चंद्र, चांगले फळ देईल. राशीतील मंगळाचा जप करा. ओम अं.अंगारकाय नम: प्रकृतीची काळजी घ्या.
सिंह
आज दुपारनंतर कार्यालयीन घडामोडी अचानक वाढतील. दिवस चांगला आहे. व्यय स्थानातील मंगल प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी निर्माण करेल. दिवस अनुकूल.
कन्या
अचानक दोन दिवसानंतर मन शांत व स्थिर होईल. कामात मन रमेल. दिवस भाग्यकारक आहे. कुठूनतरी शुभ वार्ता कळतील. गुरु स्मरण करावे.
तुला
मंगळवारचा दिवस तुला राशीच्या व्यक्तींसाठी सांभाळून राहण्याचा आहे. ग्रहांचे सहकार्य मिळणे कठीण आहे. दिवस शांततेत घालवा. मोठे निर्णय लांबणीवर टाका. ओम सोम सोमाय नम: जप करणे फायद्याचे ठरेल.
हे वाचा - चांगल्या कामासाठी जाताना खा दही-साखर? हे आहे त्यामागचं शास्त्रीय कारण
वृश्चिक
आज जोडीदाराला वेळ द्यावा लागेल. दुपारनंतर कामांना वेग येईल. दिवस अनुकूल आहे राशीत असलेला केतू आध्यात्मिक रुची निर्माण करेल. शारीरिक व्याधी कडे लक्ष द्या. ओम रं.राहवे नमः जप करा.
धनु
राशीच्या धनस्थानातील शनी, साडेसाती इत्यादींनी धनु व्यक्ती बेजार आहेत. मंगळवार फारसा अनुकूल नाही. अष्टम मंगळ आहे. दुखापती पासून जपावे. मंगळाची उपासना करावी.
मकर
मकर रास साडेसातीमुळे उदास आहे. उद्या दुपारनंतर थोडी अनुकूलता मिळेल. मुलांकडे लक्ष द्या. त्यांच्यासोबत वेळ घालवा. विद्यार्थ्यांना चांगला दिवस आहे. शनी उपासना करावी.
कुंभ
आजचे ग्रहमान अनुकूल असून साडेसाती असली तरी गुरुकृपेने निभावून जाल. घरासंबंधित काही कामे असतील तर दुपारनंतर करा. दिवस बरा आहे.
मीन
आपल्या राशीला सध्या गुरू व्ययात आहे. गुरु जप सुरू ठेवावा. दुपारनंतर फोन, भेटी गाठी ,छोटे प्रवास संभवतात. महत्त्वाचा कामे आज उरकून घ्या. मुलांची काळजी घ्या. दिवस चांगला आहे.
शुभम भवतु !
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rashibhavishya