मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

मंगळ, शुक्राचं गोचर `या` राशींसाठी ठरणार फायदेशीर; राश्यंतराचे शुभ-अशुभ परिणाम तुमच्यावर होणार का?

मंगळ, शुक्राचं गोचर `या` राशींसाठी ठरणार फायदेशीर; राश्यंतराचे शुभ-अशुभ परिणाम तुमच्यावर होणार का?

6 सप्टेंबरला मंगळ (Mars) आणि शुक्र (Venus) हे 2 महत्त्वाचे ग्रह राश्यंतर करत आहेत. या परिवर्तनाचे सर्वच राशींवर शुभ-अशुभ परिणाम दिसून येणार आहेत.

6 सप्टेंबरला मंगळ (Mars) आणि शुक्र (Venus) हे 2 महत्त्वाचे ग्रह राश्यंतर करत आहेत. या परिवर्तनाचे सर्वच राशींवर शुभ-अशुभ परिणाम दिसून येणार आहेत.

6 सप्टेंबरला मंगळ (Mars) आणि शुक्र (Venus) हे 2 महत्त्वाचे ग्रह राश्यंतर करत आहेत. या परिवर्तनाचे सर्वच राशींवर शुभ-अशुभ परिणाम दिसून येणार आहेत.

नवी दिल्ली, 4 सप्टेंबर: आपल्या भविष्यकाळातल्या संभाव्य घटनांविषयी जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाला असते. यासाठी अनेक जण ज्योतिषशास्त्राची (Astrology) मदत घेतात. अवकाशातल्या ग्रह-ताऱ्यांचा मानवी जीवनावर परिणाम होतो, असं ज्योतिषशास्त्र (Rashi Bhavishya) सांगतं. त्या पार्श्वभूमीवर ग्रहांची राश्यांतरं आणि सूर्य किंवा चंद्रग्रहणं यांना विशेष महत्त्व असतं. सध्याचा कोरोनाकाळ आणि निर्माण झालेली परिस्थिती पाहता प्रत्येकाला ग्रहांचं राशीपरिवर्तन (Planet Transit) आणि भविष्यातल्या संभाव्य घटनांबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाल्याचं चित्र दिसून येतं. सप्टेंबरमध्ये काही महत्त्वाच्या ग्रहांचा राशीपालट होत असल्यानं हा महिना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची चर्चा आहे. ग्रहांच्या राशीपालटाबाबतची सविस्तर माहिती `आज तक`ने दिली आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राशीपालट ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे; मात्र या स्थितीचा राशींवर परिणाम होतो. 6 सप्टेंबरला मंगळ (Mars) आणि शुक्र (Venus) हे 2 महत्त्वाचे ग्रह राश्यंतर करत आहेत. या परिवर्तनाचे सर्वच राशींवर शुभ-अशुभ परिणाम दिसून येणार आहेत. ऊर्जा, अहंकार आणि आत्मविश्वास हे गुण, तसंच तामसी वृत्ती मंगळाच्या आधिपत्याखाली येते. लाल रंग (Red color) मंगळ ग्रहाचं प्रतीक मानलं जातं. आठवड्यातल्या मंगळवारावर मंगळाचं शासन असतं. मंगळाच्या गोचर काळात व्यक्तीच्या जीवनात शारीरिक आणि भावनिक पातळीवर परिवर्तन झाल्याचं दिसून येतं.

अंकज्योतिष: तुमची जन्मतारीख सांगेल तुमच्या आरोग्याचं भविष्य

कालपुरुषाच्या कुंडलीत शुक्र हा ग्रह तूळ (Libra) आणि वृषभ (Taurus) राशीचा, तसंच, दुसऱ्या आणि सातव्या स्थानाचा स्वामी मानला गेला आहे. ज्योतिषशास्त्रात शुक्र हा स्त्री ग्रह मानला जातो. कुंडलीतला शुक्र संबंधित व्यक्तीचा जोडीदार, वैवाहिक आयुष्य, सुख आणि भागीदारी यांचं प्रतिनिधित्व करतो. शुक्राच्या गोचराचा परिणाम व्यक्तीचे प्रेमसंबंध, व्यावसायिक जीवनावर झाल्याचा दिसून येतो.

सप्टेंबर महिन्यात अनेक राशींमध्ये होणार ग्रहबदल; काय होतील याचे परिणाम?

6 सप्टेंबरला शुक्र आपल्या स्व राशीत म्हणजेच तूळ (Libra) राशीत प्रवेश करत आहे. याच वेळी मंगळ कन्या (Virgo) राशीतून गोचर भ्रमण सुरू करेल. कन्या राशीतलं मंगळाचं गोचर 6 सप्टेंबरला पहाटे 3 वाजून 21 मिनिटांनी सुरू होईल. ते 22 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजून 13 मिनिटांपर्यंत असेल. त्यानंतर मंगळ तूळ राशीत प्रवेश करेल. याच दिवशी शुक्राचं तूळ राशीतलं गोचर 12 वाजून 39 मिनिटांनी सुरू होईल. ते 2 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजून 35 मिनिटांपर्यंत असेल. त्यानंतर शुक्र वृश्चिक राशीत प्रवेश करील.

6 सप्टेंबरला होत असलेल्या मंगळ आणि शुक्राच्या राश्यंतराचा परिणाम मेष, कर्क, वृश्चिक राशींसाठी अनुकूल असेल. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना चिंता करण्याचं कारण नाही; मात्र या ग्रहांच्या गोचरामुळे वृषभ, सिंह आणि मीन राशीच्या व्यक्तींना सावध राहावं लागेल. या कालावधीत या राशीच्या व्यक्तींना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. शेवट गोड होणार असला तरी काही काळ दक्षता घेणं गरजेचं आहे.

Vastu Tips : या 5 उपायांनी संपतील सगळ्या अडचणी; धनधान्यात होईल वृद्धी

शुक्र ग्रहामुळे त्रास होऊ नये, हा ग्रह प्रसन्न राहावा यासाठी पांढऱ्या आणि गुलाबी रंगाचा जास्तीत जास्त वापर करावा. चुकूनही महिलांचा अनादर करू नये. देवी लक्ष्मी आणि जगंदबेची पूजा करावी. शुक्रवारी व्रत करावं आणि श्रीसूक्ताचं पठण करावं. दही, खीर, ज्वारी, सुगंधी द्रव्यं गरजू किंवा ब्राह्मणास दान करावीत.

मंगळ ग्रहाला प्रसन्न करून घेण्यासाठी लाल आणि तांबूस रंगाचा वापर करावा. मंगळवारी कोणाकडूनही पैसे उधार घेऊ नयेत. भगवान हनुमान आणि कार्तिकेयाची पूजा करावी. मंगळवारी उपावास करावा. व्रत करणं शक्य नसेल तर सुंदरकांडाचं पठण करावं. लाल मसूर, गूळ, बडीशेप, मूग, गहू, लाल कण्हेरीचं फूल, तांब्याची भांडी गरजूंना दान करावीत.

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya