• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • राशीभविष्य: मिथुन, कर्क, मकर, कुंभ राशीला आजचा दिवस चांगला

राशीभविष्य: मिथुन, कर्क, मकर, कुंभ राशीला आजचा दिवस चांगला

आज शुक्रवार दिनांक 30 जुलै 2021 तिथी आषाढ कृष्ण सप्तमी. आज चंद्र दुपार नंतर मेष राशीत प्रवेश करणार आहे. पाहा तुमच्या राशीवर याचा काय परिणाम असेल?

  • Share this:
आज शुक्रवार दिनांक 30 जुलै 2021 तिथी आषाढ कृष्ण सप्तमी. आज चंद्र दुपार नंतर मेष राशीत प्रवेश करणार आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष दुपार पर्यंत व्ययस्थानातील चंद्र प्रकृतीची  काळजी घ्यावी असे सुचवतो आहे  मानसिक स्वास्थ्य कमी राहील. उत्तरार्ध जरा बरा राहील. दिवस मध्यम जाईल. वृषभ आर्थिक, शारीरिक व्यय दाखवणारा दिवस आहे. आर्थिक व्यवहार जपून करा. अचानक येणारे खर्च, घरात काही वाद विवाद होऊ नये यासाठी प्रयत्‍न करा. दिवस बरा. मिथुन आज दिवस  सर्व सामान्य पणे जाईल. मनोबल चांगले राहील. ऑफिस मध्ये अतिशय बिझी दिवस. तुमचा उत्तम प्रभाव राहील. आर्थिक बाजू ठीक आहे. दिवस चांगला. कर्क कर्क  व्यक्ती कार्यक्षेत्रात मोठी भरारी घेणार आहेत. राशीतील सूर्य अधिकारी व्यक्तीशी भेट घडेल. कौटुंबिक सुख मिळेल. नातेवाईक भेट देतील. दिवस चांगला आहे. सिंह आरोग्य अणि नकारात्मक मानसिकता या पासून जपा. काहींना अस्वस्थता वाटेल. दुपारनंतर मात्र  सुधारणा होईल. आर्थिक स्थिती सांभाळा. दिवस मध्यम. कन्या इतरांवर प्रभाव वाढेल. पण अचानक काहीतरी  हुरहुर, अस्वस्थता जाणवेल. आर्थिक, शारीरिक कष्ट होतील  कुठलेही धाडस करू नका. खर्च बेताने करा  दिवस मध्यम जाईल . तुला आज व्यवसाय पूरक दिवस असून काहो चांगले  लाभ होतील. नवीन खरेदी, फेरफटका आणि  चैनी साठी खर्च असा दिवस आहे. आर्थिक व्यवहार होतील. दिवस चांगला आहे. वृश्चिक आज संतती चे प्रश्न मार्गी लागतील. गुरुकृपा राहील. पण उत्तरार्ध  शारीरिक कष्ट दाखवत आहे.कार्यक्षेत्रातील प्रगती सुरू राहील. एकुण दिवस शुभ जाईल. धनु आज कुटुंब ,नातेवाईक, संतती  याला प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रॉपर्टीची काम मार्गी लागतील. नोकरीमध्ये तुमच्या कष्टांची कदर राहणार नाही. एकूण दिवस मध्यम जाईल. मकर धाडस आणि चिकाटी या दोन गुणांनी आजचा दिवस सफल होईल. बहीण भावंड भेट, प्रवासी, असा दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल. दिवस चांगला जाईल. कुंभ जुन येणं वसुल होईल. आर्थिक घडामोडी घडतील. दुपार नंतर कुठेतरी जावे लागेल.त्यासाठी आज योग्य दिवस आहे जोडीदाराला खुश ठेवाल. दिवस चांगला जाईल. मीन उत्तम प्रकृती, प्रवास आणि आर्थिक लाभ  असा हा दिवस आहे. मानसिक ताण तणाव कमी होतील. शत्रूंचा पाडाव होईल. संतती सुख चांगले मिळेल. दिवस शुभ. शुभम भवतु!!
First published: