Home /News /astrology /

साप्ताहिक राशीभविष्य: येता सप्ताह पौर्णिमेच्या प्रभावाखाली,कुठल्या राशीला ठरणार फलदायी?

साप्ताहिक राशीभविष्य: येता सप्ताह पौर्णिमेच्या प्रभावाखाली,कुठल्या राशीला ठरणार फलदायी?

आज दिनांक 19 डिसेंबर 2021 वार रविवार. हा सप्ताहात पौर्णिमेच्या प्रभावाखाली असून ग्रहमान अनुकूल आहे. पाहूया या सप्ताहात होणार्‍या घडामोडी. साप्ताहिक राशी भविष्य...

आज दिनांक 19 डिसेंबर 2021 वार रविवार. पौर्णिमा सकाळी 10 वाजून पाच मिनिटांपर्यंत आहे. त्यानंतर मार्गशीर्ष कृष्ण प्रतिपदा सुरू होईल. दिवस भर  चंद्र मिथुन राशीत भ्रमण करेल. या आठवड्यात गुरू कुंभ राशीत भ्रमण करीत असून शनि शुक्र मकर राशीत आहे. सूर्य बुध धनु राशीत तर मंगळ केतू वृश्चिक राशीत आहेत. राहू वृषभ राशीत असेल. हा सप्ताहात पौर्णिमेच्या प्रभावाखाली असून ग्रहमान अनुकूल आहे. पाहूया या सप्ताहात होणार्‍या घडामोडी. साप्ताहिक राशी भविष्य.(लग्ना नुसार) मेष हा आठवडा भाग्य स्थानातील ग्रह जोरदार फळ देतील. समारंभात सहभाग, प्रवास, नातेवाईकांच्या गाठी भेटी  असा हा आठवडा अतिशय गडबडीचा जाईल .तुमच्या अनेक दुखण्याचे समस्यांचे मूळ हे मानसिक ताण आहे. तो कमी करण्याचे प्रयत्‍न करा.  अनावश्यक  दगदग करू नका. आर्थिक स्थिती ठीक राहील .अष्टम मंगळ  केतू  हे गैरसमज निर्माण करण्यास कारणीभूत ठरतील. काळजी घ्या. सप्ताह अनुकूल आहे. वृषभ राशीच्या अष्टमात  ग्रह कष्ट देतील. काही जुनी दुखणी ,स्त्रियांच्या समस्या डोक वर काढतील.  भाग्यात शनि शुक्र मात्र अनुकूल आहे.कौटुंबिक सामाजिक जबाबदाऱ्या, धार्मिक कार्य  तसेच काही समारंभ यात सहभाग घ्याल. जोडीदाराची  साथ  लाभेल. वैवाहिक समस्या वेळीच सोडवा. कार्यक्षेत्रातील प्रगती मात्र आनंद देईल. अनावश्यक खर्च टाळा. सप्ताह शुभ. पौर्णिमा अनुकूल राहील. मिथुन पौर्णिमेच्या  पार्श्वभूमीवर प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी सुरू राहतील. वृश्चिक राशीतील मंगळ केतू अकस्मात घटना घडण्याची शक्यता निर्माण करतील. वैवाहिक जीवनात पदार्पण करावेसे वाटेल. त्यानुसार योग येतील. भाग्य स्थानातील गुरू संतती कारक आहे. नवीन जोडप्यांना संतान प्राप्तीचे योग आहेत. कामाच्या  ठिकाणी थोडा आराम आहे. अष्टमात शुक्र शनि काही स्त्री रोग संबंधी त्रास निर्माण करतील. अचानक घडणार्‍या घटना चकित करतील. सप्ताह मिश्र फळ देईल. कर्क राशी स्वामी चंद्र सप्ताहाच्या सुरवातीला व्यय स्थानात आहे. पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर मानसिक आंदोलने दर्शवतो. मनाला जपा. नैराश्य वादी विचार नको. अष्टमात गुरू आहे आध्यात्मिक प्रगती होईल .प्रकृती कडे दुर्लक्ष नको. वैवाहिक सुखाच्या दृष्टीने आठवडा मिश्र फळ देणारा ठरेल. मंगल केतू कधीतरी स्फोटक परिस्थिती निर्माण करतात. संतती चिंता लागून राहील. मात्र एकूण सप्ताहात गडबडीत तरीही आनंदात जाईल. उत्तरार्ध अनुकूल. सिंह राशी स्वामी रवि गुरूच्या राशीत आहे. एकूण बौद्धिक प्रगती करणारा सप्ताह आहे. बुध त्यात रवि ची  साथ देईल. तुमच्या चांगल्या कामाची प्रशंसा होईल. विवाहाचे नवीन प्रस्ताव येतील. आणि षष्ठ स्थानात शनि शुक्र मधुमेही व्यक्तीनी जपून राहावे ,ताण घेऊ नये असे सुचवत आहे. जोडीदाराला शुभ फळ देणारा काळ आहे. आईवडील तुमच्यावर खुश होणार आहेत. उत्तरार्ध अनुकूल. कन्या अष्टमेष मंगळ तृतीय स्थानात केतू सोबत काही गैरसमज होतील. भावंडाशी सांभाळून राहावे. प्रवास योग येतील. त्यात दगदग करू नका. प्रकृती कडे दुर्लक्ष नको. काना संबंधी समस्या निर्माण होतील. चतुर्थ सुर्य  कार्य क्षेत्रात अधिकारी व्यक्तीशी भेट घडवून देईल. बदली,वास्तु संबंधी निर्णय  यात हा आठवडा चांगले फळ देणार आहे. परिश्रमाचे फळ नक्की मिळेल. तुला राशी स्वामी शुक्र चतुर्थ स्थानात भ्रमण करणार असुन घर आणि वाहन प्राप्तीचे योग येतील. घरांमधे समारंभ, नातेवाईकांच्या भेटी होतील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. मात्र अवाजवी खर्च वाढेल. शैक्षणिकदृष्टय़ा शुभ काळ आहे. आईवडील तुमच्यावर प्रसन्न आहेत. तसेच संतान संबंधी समस्या सुटणार आहेत. राहू मात्र जपून राहण्याचे संकेत देत आहे. सप्ताह अनुकूल आहे. वृश्चिक राशीतील मंगळ केतू अकस्मात घटना घडण्याची शक्यता निर्माण करतात. प्रकृतीची काळजी घ्या. रक्त दाब, पोटाची दुखणी, उष्णतेचे विकार या पासून सावध रहा. स्वभावधर्म रागीट आणि चिडचिडा होईल. काळजी घ्या. आर्थिक नियोजन नीट करा. मात्र घर,वाहन खरेदी होणार आहे. घरात समारंभ घडतील. आत्मविश्वास वाढेल. सप्ताहात अनुकूल आहे. धनु राशीतील सुर्य  अधिकारी व्यक्तीशी भेट घडवून देईल. अकस्मात लाभ होतील. नवीन ओळखी होतील. अतिशय फायदा करून देणारा हा आठवडा आहे. व्ययस्थानातील मंगळ केतू प्रकृती संबंधी तक्रारी कडे दुर्लक्ष करू नका असे सुचवत आहे.खर्च, प्रवास होतील. कायदा पाळा. शुक्राचे पाठबळ आणि गुरुकृपा यामुळे सप्ताहात अनुकूल फळ मिळेल. मकर राशीच्या धनस्थानातील गुरू आर्थिक स्थिती मध्ये मजबूती आणेल. पैतृक संपत्ती संबंधी निर्णय होईल. परिवारातील सदस्य प्रेमानी वागतील. राशीच्या व्ययस्थानातील  सूर्य बुध कायदेशीर बाबी, दवाखान्याची वारी दाखवत आहे. मंगळ केतू भ्रमण मित्र मैत्रिणींसोबत संबंध बिघडण्याची शक्यता आहे. कुटुंबाला वेळ द्यावा लागेल. समारंभाचे आयोजन केले जाईल. राशीतील शनि शुक्र मन थोडे अस्वस्थ करतील. आर्थिक बाजु ठीक राहील. अचानक घडणार्‍या घटना चकित करतील. सप्ताह मध्यम आहे. कुंभ नोकरी व्यवसाय करणार्‍या व्यक्तीनी अत्यंत सांभाळून काम करावे. कामाच्या ठिकाणी अचानक काही नवीन संधी मिळतील. मुलाखत यशस्वी होईल. प्रकृती साथ देईल. व्यय स्थानात शुक्र शनी खर्चाचे नवीन मार्ग उघडणार आहेत. परदेशी प्रवासासाठी अनुकूल काळ आहे. आईवडील, कुटुंबिय यांसाठी वेळ काढा. आर्थिक बाजु ठीक राहील. पौर्णिमा शुभ प्रभावाची . मीन जरी बारावा गुरू असला तरी तो काही कामा करता चांगले फळ देणार असून आर्थिक लाभ होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मंगल कार्याची नांदी होईल. धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात  यश मिळेल. घरांमधे समारंभ होईल. पौर्णिमा भाग्यशाली ठरेल. संतती सुख मिळेल. शैक्षणिक दृष्ट्या मध्यम जाईल.सप्ताहात मिश्र फळ मिळेल. शुभम भवतु!!
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या