राशीभविष्य: कन्या आणि वृषभेसाठी शुभसंकेत; पाहा आजचा दिवस कसा असेल?

राशीभविष्य: कन्या आणि वृषभेसाठी शुभसंकेत; पाहा आजचा दिवस कसा असेल?

दैनंदिन राशीभविष्याबरोबर या सदरातून सध्या दररोज एका राशीविषयी, स्वभावदोषांविषयी माहिती देत आहोत. आज कर्क राशीविषयी..

  • Share this:

आज शुक्रवार दिनांक 18 जून 2021 तिथी ज्येष्ठ शुद्ध अष्टमी. दैनंदिन राशीभविष्याकडे वळण्यापूर्वी आज कर्क  राशीबद्दल  जाणून घेऊ या. राशीचक्रातील ही चौथी रास. चर, जल तत्त्व. चिन्ह खेदैनंदिन राशीभविष्याकडेकडा आणि राशी स्वामी चंद्र असून  पुष्य  हे शुभ नक्षत्र यात येते. चंद्र  व गुरू उच्च असून मंगळ या राशीत  नीच होतो. अत्यंत प्रेमळ, हळवे,  कुटुंबवत्सल असे लोक असतात. या राशीचा अंमल छातीवर असतो. बांधा मध्यम, चेहरा  गोल, डोळे थोडे बारीक असतात. सरकारी किंवा बँक जॉब मिळू शकतात. ओम सोम सोमाय नम: हा जप आणि  शिव उपासना फल देणारी ठरू शकते.

आता आजचे  बारा राशींचे भविष्य असे आहे.

मेष

आज चंद्र  कन्या राशीतून  भ्रमण करणार असून सूर्य मिथुन या बुधाच्या राशीत आहे. आज दिवस जरा आळसा मध्ये जाईल. काम काज करण्याची इच्छा नसेल. शरीर शिथिल, मन अस्वस्थ. शांततेत दिवस घालवणे योग्य.

वृषभ

आजचा दिवस शुभ संकेत देतो आहे. मुले, मुली तुम्हाला कामाला लावणार असे दिसते. वाचन लिखाण, छोटे प्रवास संभवतात. दिवस  उत्तम जाईल. आर्थिक घडामोडी घडतील. जपुन व्यवहार करा.

मिथुन

राशि च्या  व्यय स्थानातील  राहू बुध व द्वितीयात असलेला मंगळ  अश्या कात्रीत सापडले आहात. चंद्र आज चतुर्थ स्थानात भ्रमण करेल. घरासाठी काही खरेदी करणे गरजेचे वाटेल. खर्च करावा लागेल. घरी अत्यावश्यक कामे  आवरून टाका. दिवस बरा.

कर्क

प्रवास, भेटीगाठी, फोन कॉल्स असा हा दिवस  आहे.  भाऊबहिणी  संपर्क करतील. राशीतील मंगळ  स्वभाव तेज करेल. कामे वाढतील. पण काळजी नको.  जोडीदाराला वेळ  द्या. उपासना करा.

सिंह

आज पैसा  मिळण्याची शक्यता आहे. पण येण्या आधीच दुसरे खर्च  तयार असतील. कुटुंबासाठी  खर्च करावा लागेल. प्रकृती  सांभाळून दगदग करा. दशमातील राहू  बुध कार्य क्षेत्रात नवीन संधी मिळवून देईल. रवी लाभ  मिळवून देईल. कायदा पाळा.

कन्या

आज राशीतून होणारे  चंद्र भ्रमण शुभ आहे  दोन दिवसा पासून वाटणारी अस्वस्थता कमी होईल .सूर्य अणि शुक्र कार्य क्षेत्रात यश मिळवून देणार हे नक्की. गुरु जप करा. दिवस चांगला आहे  .

तुला

आज घाई गडबड ना करता  शांततेत काम करा. व्यय  होऊ शकतो  पैसा , वेळ अथवा आरोग्य  जपुन असा. कामाच्या ठिकाणी नवीन अडचणी आल्या तरी  घाबरू नका. निवारण होतील. संतती सहकार्य करेल. दिवस मध्यम .

वृश्चिक

उत्तम लाभ ,प्रवास, मित्रमैत्रिणी जमवून  छोटी  पिकनिक असा दिवस आहे. पण सध्या थोडी सावधगिरी बाळगावी लागेल. राशिस्थानी मंगळ सध्या नीच आहे. प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी सुरू राहतील. काळजी घ्या .

धनु

आज भरपूर काम करावे लागेल. लागोपाठ  मीटिंग्स, फोन, भेटी यामुळे  थकून जाल. दिवसाची नीट आखणी करा. कामानिमित्त प्रवास संभवतात. मौल्यवान वस्तू  सांभाळा. दिवस चांगला आहे.

मकर

दोन दिवसापासून वाटणारा तणाव आज नक्की  कमी  होईल. अडचण आली असली तरी मार्ग सापडेल. जोडीदाराची साथ लाभेल. पण वाद नको. संतती चिंता आता जरा कमी होईल. दिवस  अनुकूल .

कुंभ

अष्टमात चंद्र, राशी च्या व्यय स्थानात शनी ही ग्रहस्थिती फारशी बरी नाही. जपुन चालावे. सांधे व हाडाची दुखणी डोकं वर काढतील .घरातली काही आवश्यक कामे  करावी लागतील. शनी जप करावा.

मीन

आज काही खरेदी असेल तर  जोडीने करून घ्यावी. पंचमातील मंगळ मुलांबद्दल काही चिंता  निर्माण करेल .गुरूची  उपासना, जप  व दान  करीत असावे. हिम्मत  वाढेल. दिवस  शुभ आहे. ओम शांती.

शुभम भवतु!!

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: June 18, 2021, 7:30 AM IST

ताज्या बातम्या