• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • राशीभविष्य: या राशीला होऊ शकतो धनलाभ; पाहा तुमचं आजचं भविष्य

राशीभविष्य: या राशीला होऊ शकतो धनलाभ; पाहा तुमचं आजचं भविष्य

आज शुक्रवार दिनांक 06 ऑगस्ट 2021 आषाढ कृष्ण त्रयोदशी. कुठल्या राशीला होणार धनलाभ आणि कुठल्या राशीचा होणार खर्च.. पाहा दैनंदिन राशीभविष्य

  • Share this:
आज शुक्रवार दिनांक 06 ऑगस्ट 2021 आषाढ कृष्ण त्रयोदशी. चंद्र आज उत्तर रात्री पर्यंत मिथुन राशीत असेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष कामाच्या ठिकाणी सकारात्मक बदल होईल. रखडलेले काम मार्गी लागेल. तुमचा राशी स्वामी मंगळ सिंह राशीत स्थित असून जिद्द, चिकाटी वाढवेल. आर्थिक स्थिती ठीक राहील. दिवस चांगला आहे. वृषभ अचानक धनलाभ, साहित्य, संगीत यामधे रुची वाढवणारा काळ आहे. तृतीय स्थानातील सूर्य बुध बहीण भावंडाची  उत्तम प्रगती होईल. घरातील शांतता भंग होऊ देऊ नका. खर्च बेताने करा. दिवस  शुभ. मिथुन राशीतील चंद्र गुरूशी नवपंचम योग करीत आहे, त्यामुळे मानसिक स्थैर्य   मिळेल आणि आध्यात्मिक प्रगती होईल. भावंडाची गाठभेट होईल  वाद नको. दिवस उत्तम जाईल. कर्क शरीर प्रकृती थोडी नाजूक राहील. सर्दी पडसे इत्यादी तक्रारी असतील. कामाच्या ठिकाणी ताण वाढेल. खर्च होईल. धार्मिक गोष्टी मध्ये मन रमेल. दिवस मध्यम जाईल. सिंह मित्र मैत्रिणींना भेटणे शक्य होईल. प्रवास योग येतील.  महत्त्वाचा बदल  होईल. नवीन लोकांच्या गाठीभेटी होतील. आर्थिक स्थिती ठीक राहील. दिवस शुभ आहे. कन्या आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी ग्रह कार्यरत  आहेत. पण त्या  बरोबरच खर्चाचे प्रमाण वाढते राहील. सौंदर्य प्रसाधन  कपडे यावर खर्च होणार आहे. दिवस चांगला जाईल. तुला आज काहींना अचानक प्रवासाचे योग येतील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. आरोग्य ठीक असेल. मित्र मैत्रिणींना वेळ द्यावा लागेल. दिवस उत्तम. वृश्चिक आज  प्रकृती थोडी सांभाळा. अष्टमात चंद्र  मानसिक अणि शारीरिक त्रास दाखवत आहे.पण योग्य ती काळजी घ्या. शुभ काळ येणारच आहे. दिवस मध्यम. धनु वैवाहिक जीवनात काही संघर्षाचे प्रसंगी येतील. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलण्यात यावेत. प्रकृती सांभाळा. शुक्र शुभ फळ देणारा ठरेल. दिवस  मध्यम आहे. मकर षष्ठ चंद्र आज नातेवाईक, मित्रमंडळी यापासून जपा असे सुचवतो आहे. कुठलेही वाद नको. आर्थिक निर्णय उद्यावर ढकला. हाताखालच्या व्यक्तींकडून सहकार्य मिळेल. दिवस चांगला. कुंभ आज तुमची अडकलेली काम मार्गी लागतील. आर्थिक व्यवहार सांभाळून करा. संतती थोडी हट्टी  पणे वागेल. जोडीदाराला सांभाळून घ्या. पण जमेल तितकी काम उरकून घ्या. दिवस शुभ. मीन आज नवीन परिचय  होतील. आर्थिक खर्च खूप होतील. आर्थिक बाजु ठीक आहे. काही महत्त्वाचा पत्र व्यवहार होईल. घराकडे लक्ष देण्याची गरज आहे. दिवस चांगला जाईल. शुभम भवतु !!
First published: