Home /News /astrology /

पावसाच्या पाण्यामुळे सुटू शकतील आर्थिक समस्या; ज्योतिषशास्त्रातले 'हे' उपाय ठरतील फायदेशीर

पावसाच्या पाण्यामुळे सुटू शकतील आर्थिक समस्या; ज्योतिषशास्त्रातले 'हे' उपाय ठरतील फायदेशीर

पावसाच्या पाण्याचा वापर करून काही उपाययोजना केल्या तर पैशाची टंचाई दूर होते. सध्या पावसाळी हंगाम सुरू आहे. या पावसाच्या पाण्यामुळे आर्थिक समस्या दूर व्हायला मदत होऊ शकेल.

मुंबई, 02 जुलै: जीवनात यश, सुख-समृद्धी, पैसा मिळावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्या दृष्टीने प्रत्येक जण परिश्रम घेत असतो. परंतु, काही जणांना कायम पैशांची कमतरता जाणवते. तसंच, अनेक कारणांमुळे काही जण कर्जबाजारी होतात. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी लोक ज्योतिषशास्त्र (Jyotish shastra) अभ्यासकांचा सल्ला घेतात. पैशांची कमतरता, तसंच कर्जाचा भार दूर होण्यासाठी ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सांगितले गेले आहेत. ज्योतिष आणि वास्तुशास्त्राच्या अभ्यासकांच्या मते, आर्थिक समस्या (Financial Crisis) दूर करण्यासाठी पावसाचं पाणी (Rain Water) उपयुक्त ठरू शकतं. पावसाच्या पाण्याचा वापर करून काही उपाययोजना केल्या तर पैशाची टंचाई दूर होते. सध्या पावसाळी हंगाम सुरू आहे. या पावसाच्या पाण्यामुळे आर्थिक समस्या दूर व्हायला मदत होऊ शकेल. `झी न्यूज हिंदी`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. वास्तुशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्ती कर्जामुळे (Loan) त्रस्त असेल तर त्याने एका बादलीत पावसाचं पडणारं पाणी भरून घ्यावं. या पाण्यात दूध घालून देवाचं स्मरण करावं. त्यानंतर महिनाभर या पाण्यानं स्नान करावं. हा उपाय केल्यास डोक्यावरचा कर्जाचा भार कमी होऊ शकतो. तसंच आर्थिक स्थिती सुधारू शकते. एखाद्या व्यक्तीला व्यवसायात तोटा (Loss) होत असेल, तर पावसाचं पडणारं पाणी एका पितळी भांड्यात घ्यावं. त्यानंतर एकादशीला लक्ष्मी माता आणि भगवान श्री विष्णूंना (Lord Vishnu) या पाण्याने अभिषेक करावा. यामुळे व्यवसायात तोटा होणार नाही. तसंच आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल होईल, असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे. हेही वाचा - खूपच रोमँटिक असतात या तारखेला जन्मलेले लोक; कुणालाही करू शकतात आकर्षित
 ज्योतिषशास्त्रानुसार, पैशांची कमतरता दूर करण्यासाठी एका भांड्यात पावसाचं पाणी भरून घ्या. हे पाणी सूर्यप्रकाशात ठेवा. नंतर इष्टदेवतंचं नामस्मरण करून ते आंब्याच्या पानांवर शिंपडा. यामुळे लक्ष्मीमाता प्रसन्न होईल. आर्थिक समस्या दूर होऊन घरात सुबत्ता येईल, असं अभ्यासकांचं मत आहे.
नकारात्मक शक्तींमुळे (Negative Energy) एखाद्या व्यक्तीचं कर्ज वाढत असेल, तर त्याच्यासाठी पावसाचं पाणी खूपच फलदायी ठरतं. पावसाचं पाणी जमा करून ते श्री हनुमानाला अर्पण करावं. तसंच संपूर्ण श्रावण महिन्यात 52 वेळा हनुमान चालिसाचे पाठ करावेत. घरातल्या सर्व कोपऱ्यांमध्ये हे पाणी शिंपडावं. यामुळे घरात पैशांची कमतरता जाणवणार नाही. एखादी व्यक्ती आर्थिक समस्यांमुळे त्रस्त असेल, तर त्यानं मातीच्या भांड्यात पावसाचं पाणी घ्यावं आणि हे भांडं उत्तर दिशेला ठेवावं. यामुळे आर्थिक समस्या दूर होतील, असं ज्योतिष अभ्यासकांनी सांगितलं. एकूणच आर्थिक प्रश्न सुटण्यासाठी पावसाचं पाणी वापरून उपाय केल्यास निश्चितच फायदा होईल.
First published:

Tags: Astrology and horoscope

पुढील बातम्या