नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर : चुका माणसांकडून होत असतात. पण काही जण त्यांच्या चुकांमधून शिकतात आणि पुढे जातात. काही लोक इतरांच्या चुकांमधून बोध घेतात. त्याचबरोबर काही लोक असेही असतात जे चुका करूनही सुधारत नाहीत. लोकांची ही वैशिष्ट्यं ज्योतिषशास्त्रातही सांगितली आहेत. आज आपण अशा राशींबद्दल जाणून आहोत, ज्या राशींचे लोक चुकांमधून शिकतात खरे; परंतु, तेव्हाच जेव्हा त्यांनी त्यांचं मोठं नुकसान करून घेतलेलं असतं.
या राशींवर जन्मलेले लोक मोठा फटका बसल्यावरच घेतात धडा
या 5 राशीच्या लोकांना चुकांमधून धडा घेणं कठीण जातं. ते इतरांचं सहजासहजी ऐकत नाहीत आणि नंतर मोठ्या चुका करतात. त्यामुळं त्यांना मोठं नुकसान सहन करावं लागतं. झी न्यूजनं याविषयी माहिती दिली आहे.
मेष : मेष राशीचे लोक कोणतंही काम करण्यापूर्वी विचार करत नाहीत. यामुळं ते अनेकदा गडबड-गोंधळ, चुका केरून ठेवतात. ते असं वारंवार करतात आणि तरीही त्यांची चूक सुधारत नाहीत.
मिथुन: मिथुन राशीचे लोक नेहमी द्विधा मनस्थितीत असतात. यामुळं ते अनेक गोष्टींमध्ये हात आजमावत राहतात आणि अनेकदा अपयशी ठरतात. यश मिळेपर्यंत ते चुका करत राहतात.
हे वाचा - देशाची राजधानी पुन्हा हादरली! अख्ख्या कुटुंबाची राहत्या घरात आत्महत्या
कर्क : कर्क राशीचे लोक इतर लोकांची परीक्षा करण्यात चुकतात आणि नंतर त्यांचं मोठं नुकसान होतं. ते सर्वांवर विश्वास ठेवतात आणि फसवणूक झाल्यावर त्यांना माफही करतात. ते आयुष्यभर हीच चूक करत राहतात. पण परीक्षा न घेता दुसऱ्यांवर विश्वास ठेवण्याची सवय ते बदलत नाहीत.
कुंभ: कुंभ राशीचे लोक खूप गर्विष्ठ असतात. त्यांना इतरांचं ऐकणं किंवा मान्य करणं अजिबात आवडत नाही. यामुळं त्यांचं अनेकदा मोठं नुकसान होतं. इतकंच नाही तर, ते एकच काम करताना अनेक चुका करत राहतात. पण अहंकारापोटी ते कोणाचीही मदत घेत नाहीत.
हे वाचा - नवी Car घेताय? Zero Down payment मध्ये खरेदी करता येईल 4 लाखांची Maruti Swift
मीन : मीन राशीचे लोक प्रेमाच्या बाबतीत सर्वाधिक चुका करतात. यामुळं त्यांच्या प्रेम-जीवनामध्ये (love life) चढ-उतार येतच राहतात. चिंतेची बाब अशी आहे की, ते अशा अव्यावहारिक गोष्टी करण्याचा विचार करतात, ज्या शक्यच नाहीत.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rashibhavishya, Rashichark