मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology : असा लावा आजचा दिवस सार्थकी; जन्मतारखेनुसार 20 सप्टेंबर तुमच्यासाठी कसा असेल?

Numerology : असा लावा आजचा दिवस सार्थकी; जन्मतारखेनुसार 20 सप्टेंबर तुमच्यासाठी कसा असेल?

न्यूमरॉलॉजी क्षेत्रात आहेत करिअरच्या उत्तम संधी; प्रशिक्षणासाठी आहेत अनेक पर्याय

न्यूमरॉलॉजी क्षेत्रात आहेत करिअरच्या उत्तम संधी; प्रशिक्षणासाठी आहेत अनेक पर्याय

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 20 सप्टेंबर 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 20 सप्टेंबर 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज आकड्यांचं असं कॉम्बिनेशन आहे, की ज्यामुळे अचूकता, स्थिरता, ज्ञान, एक्स्प्रेशन, कौशल्यं, स्पर्धेला तोंड देणं किंवा इंटरव्ह्यूची तयारी करणं आदींना साह्य मिळेल. प्लॅन्सची अंमलबजावणी करताना अन्य व्यक्तींची मदत घ्यायला विसरू नका. आज तुम्ही सर्व प्रकारची बक्षिसं आणि प्रसिद्धीचा आनंद घ्याल. कंपनीचं मोठं टार्गेटही सहजपणे गाठल्याने बाकीच्यांना असूया वाटेल. ते टाळण्यासाठी संध्याकाळी चंद्राला दुधाचं पाणी अर्पण करा. आज वैयक्तिक आयुष्यात दुखावले न जाण्यासाठी तुम्हाला डिप्लोमॅटिक असण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी लीडरशिप घ्या आणि चार्मचा आनंद घ्या. शुभ रंग : Off White & Blue शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 2 दान : आज गरिबांना सूर्यफूल तेल दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) दुधाची आंघोळ करून दिवसाची सुरुवात करा. पार्टनरशी संवाद राखा. अन्यथा वाद वाढतील. आजचा दिवस काँट्रॅक्ट, करार करण्यासाठी, टेंडरसाठी, पार्टनरशिप करण्यासाठी, तसंच सोहळा आयोजित करण्यासाठी चांगला आहे. आज खेळाडूंनी प्रशिक्षकांसमवेत, तर विद्यार्थ्यांनी शिक्षकांसमवेत वेळ व्यतीत करण्यासाठी चांगला दिवस आहे. पार्टनरवर डॉमिनेशन करू नका. त्यामुळे भविष्यात तुमच्यात अंतर पडू शकेल. आज पांढऱ्या रंगाचे कपडे घालणं जादुई ठरेल. आज भगवान चंद्रदेवासाठी खास विधी करावा. मेडिकल प्रॉडक्ट्स, हिरे, रबर, स्पोर्ट्स प्रॉडक्ट्स, लिक्विड्स, पुस्तकं, स्टेशनरी, शाळा आदी बिझनेसेसना आर्थिक लाभ आणि यश मिळेल. शुभ रंग : White & Sky Blue शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 दान : आज भिकाऱ्यांना किंवा गायींना पिण्यासाठी दूध दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमचं टॅलेंट आणि स्किल्सचं प्रदर्शन केल्यास तुम्हाला विजय आणि प्रसिद्धी मिळेल. आजूबाजूच्या वातावरणातून ज्ञान घेण्याचा आणि त्याची परतफेड करण्याचा आजचा दिवस आहे. लेखी संवादातून स्वतःला व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे. मागचे सगळे वाद विसरा आणि स्वतःच्या मनाशी संवाद साधून आजचा दिवस सार्थकी लावा. सोशलायझेशन करून मित्रांवर इम्प्रेशन पाडण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही शिक्षक, गायक, अकाउंटंट, नर्तक, शेफ, डिझायनर, अभिनेते/अभिनेत्री किंवा ऑडिटर असलात, तर तुमचं टॅलेंट दर्शवण्याचा आजचा दिवस आहे. इन्डोअर गेम्स, फायनान्स आणि सरकारी परीक्षा आदींमधले विद्यार्थी आज त्यांच्या मार्क्सचा आनंद घेऊ शकतात. शुभ रंग : Peach शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3, 9 दान : मंदिरात चंदनाचं खोड दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजच्या दिवसाच्या पूर्वार्ध संथ आणि उद्दिष्टहीन वाटेल; मात्र दुपारच्या जेवणानंतर हालचालींना वेग येईल आणि नशिबाचं काम सुरू होईल. क्लायंट प्रेझेंटेशन्स छान असतील आणि त्यांचं कौतुक होईल. कौन्सेलिंग आणि मार्केटिंग यांमध्ये बहुतांश वेळ व्यतीत करण्याची गरज आहे. मशीन्स, बांधकाम, कौन्सेलिंग, अभिनय, मीडिया आदी क्षेत्रांतल्या व्यक्तींनी लेखी संवादात सावधगिरी बाळगावी. वैयक्तिक नातेसंबंध कोणत्याही गोंधळाविना सुरळीत असतील. केशरी मिठाई आणि लिंबूवर्गीय पदार्थ खाणं आरोग्यपूर्ण मनासाठी आवश्यक आहे. हिरवाई असलेल्या भागात काही काळ व्यतीत करणं समृद्धीसाठी आवश्यक आहे. शुभ रंग : Sky Blue शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : गरिबांना किंवा प्राण्यांना अन्नदान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) पैसे मिळवण्यासाठी आणि रोमँटिक नातेसंबंध वृद्धिंगत करण्यासाठी आजचा दिवस सुदैवी आहे. तुमच्या धाडसी स्वभावामुळे तुम्ही रिस्क घेता, ती यशस्वी ठरते आणि तुम्ही नशीबवान ठरता. गुंतवणुकीचे प्लॅन्स नफा देणारे ठरतील. मीटिंग किंवा इंटरव्ह्यूमध्ये Aqua आणि पांढऱ्या रंगाचे कपडे घालणं लाभदायक ठरेल. इंटरव्ह्यूज आणि प्रपोझल्ससाठी आनंदाने बाहेर जा. प्रवासाचे बेत आखा आणि एंजॉय करा. आज घेतलेले प्रॉपर्टीशी संबंधित निर्णय अचूक ठरतील. प्रवास आवडणाऱ्या व्यक्ती लाँग ड्राइव्हला जाऊ शकतील. खाण्या-पिण्यातली शिस्त आज आवर्जून पाळा. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबतचं वागणं मृदू आणि सर्वसमावेशक असू द्या. त्याचा भविष्यात खूप उपयोग होईल. शुभ रंग : Aqua शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : अनाथांना हिरव्या पालेभाज्या दान करा. #नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमचं आकर्षक व्यक्तिमत्त्व सर्वांवर प्रभाव टाकतं. त्यामुळे उच्च पदासाठी जरूर इंटरव्ह्यू द्या. आजचा दिवस ऐशोआरामात व्यतीत कराल. तसंच, आज संधी शोधा, वचनं पूर्ण करा आणि पार्टनरला प्रपोझ करा. आजचा दिवस आनंद आणि समृद्धीसाठी देवाचे आभार मानण्याचा आहे. कुटुंबीय, मित्र, सहकारी यांचा पाठिंबा असल्याने तुम्हाला आशीर्वाद असल्यासारखं वाटेल. अभिनेते, डॉक्टर्स, ट्रेनर्स, एक्स्पोर्ट-इम्पोर्ट व्यावसायिक, कापड व्यावसायिक, रिअल इस्टेट व्यावसायिक, तसंच लक्झरी वस्तूंशी संबंधित बिझनेस असलेल्या व्यक्तींना नशिबाची खास साथ मिळेल. वाहन, घर, मशिनरी किंवा ज्वेलरी आदींच्या खरेदीसाठी चांगला दिवस. शेअर बाजारातली गुंतवणूक अनुकूल ठरेल. संध्याकाळची रोमँटिक डेट आनंदी स्वप्नं दाखवील. शुभ रंग : Aqua शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : गरिबांना दही दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुमच्या बिझनेस सिस्टीमचं ऑडिट करून उणिवा सुधारण्याची गरज आहे. आज घेतलेले वस्तुनिष्ठ निर्णय बिझनेसमधली लायाबिलिटी कमी करतील. आज पार्टनर किंवा क्लायंटसोबत तडजोड किंवा त्याग नको. एक्स्पोर्ट-इम्पोर्ट बिझनेस, स्टॉक मार्केट, ट्रॅव्हल एजन्सी, मीडिया एजन्सी, अभिनय आदी क्षेत्रांतल्या व्यक्ती आज नशिबवान ठरतील. विरुद्धलिंगी व्यक्तीच्या सूचना स्वीकारण्याचा प्रयत्न करा. त्या तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. अकाउंट्सचं योग्य व्यवस्थापन करण्यासाठी सीएची मदत घेणं उपयुक्त ठरेल. लग्नाची प्रपोझल्स प्रत्यक्षात येण्याची शक्यता. श्री गणेशाच्या मंदिरात जाऊन अभिषेक केल्यास यशासाठी आवश्यक असलेली बळकटी नेपच्यून ग्रहाला मिळेल. शुभ रंग : Sea Green शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : मंदिरात तांबं किंवा पितळ धातू दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस सोपा आणि वेगवान असेल, खासकरून स्टॉक मार्केट, सेल्स, मेडिकल, राजकारण आणि बेटिंग या क्षेत्रात असलेल्यांसाठी. वस्तुनिष्ठ विचार आणि मृदू वाणी हा आज यशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे. पैसे आणि ओळखी यांच्या जोरावर लीगल केसेस सोडवल्या जाऊ शकतात. बिझनेस डील्स क्रॅक करण्यासाठी आज संवाद हे महत्त्वाचं साधन आहे. तिथे फॅमिली कनेक्शन्सचा उपयोग होईल. परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोठी फी भरण्याची तयारी करावी. कारण त्यामुळे त्यांच्या स्वप्नपूर्तीला हातभार लागणार आहे. प्लॅन्सची अंमलबजावणी, तसंच पैसे आणि समाधान यात संतुलन साधण्यात तुम्ही दिवसभर बिझी राहाल. प्रवासाचे बेत अनुकूल ठरतील. आज गायी-गुरांसाठी दानधर्म करणं अत्यावश्यक आहे. शुभ रंग : Sea Blue शुभ दिवस : शनिवार शुभ अंक : 6 दान : गरजूंना चपला दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमची विश्वासार्हता जोडीदार किंवा जवळच्या मित्रासमोर सिद्ध करण्याची मागणी आजचा दिवस करतो. परस्पर विश्वास ही आजच्या दिवसाच्या यशाची किल्ली आहे. प्रेमात असलेल्या व्यक्तींनी पुढाकार घेऊन आपल्या जोडीदाराला प्रपोझ करावं. बिझनेस रिलेशन्स, काँट्रॅक्ट्स, डॉक्युमेंट्सवर सह्या करणं, इव्हेंट्स आयोजित करणं, सर्जरी, डील्स आदी बाबींना उशीर होईल/पुढे ढकलल्या जातील. राजकीय नेते, लिक्विड्स, मेडिसिन्स, डिझायनिंग, मीडिया, फायनान्स, शिक्षण आदी क्षेत्रांतल्या व्यक्तींना यश मिळेल. प्रेमात असलेल्या व्यक्ती बोलून वाद मिटवतील. खेळाडूंच्या आई-वडिलांना आपल्या मुलांचा अभिमान वाटेल. शुभ रंग : Orange शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : घरगुती मदतनीसाला लाल हातरुमाल दान करावा. 20 सप्टेंबर रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : अक्किनेनी नागेश्वर राव, महेश भट्ट, सौंदर्या रजनीकांत, मार्कंडेय काटजू, ब्रँडॉन फर्नांडिस, अभिमन्यू सिंह
First published:

Tags: Numerology

पुढील बातम्या