Home /News /astrology /

Numerology : जन्मतारखेनुसार 8 मेचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल? जाणून घ्या भविष्य

Numerology : जन्मतारखेनुसार 8 मेचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल? जाणून घ्या भविष्य

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 8 मे 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

    ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 8 मे 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्या व्यक्तिमत्त्वाच्या विरुद्ध गोष्टी घडत असल्यानं आजचा दिवस तुमच्यासाठी आव्हानात्मक असेल. राजकीय नेते आणि टीम लीडर यांनी ऑफरकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. कारण ही डील कठीण ठरू शकते. मालमत्तेची प्रकरणं उशिरा सुटतील. कुठल्याही वादविवादाशिवाय मध्यम स्वरुपात धनलाभ होईल. मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आज उशिरापर्यंत काम करू नका, हे लक्षात ठेवा. मेडिकल सेक्टरमधील व्यक्ती, स्पोर्ट्स कॅप्टन, सोलर बिझनेसमधील व्यक्ती, इंजिनीअर आणि सरकारी अधिकारी यांना आज एक खास नवीन ऑफर मिळू शकते. शेती आणि शिक्षण क्षेत्रात आज फायदा होईल. शुभ रंग : निळा आणि पिवळा (Blue and Yellow) शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 9 दान : आश्रमामध्ये गहू दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 12, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) निष्ठा आणि प्रामाणिकपणा हेच गुण तुमला विजयश्री मिळवून देतील. हुशारीनं निर्णय घ्या नाहीतर लोक तुमच्या साधेपणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतील. एक्सपोर्ट-इम्पोर्ट, डॉक्टर, इंजिनीअर, ब्रोकर्स, ट्रॅव्हल एजन्सी, शेअर मार्केट आणि पार्टनरशीप फर्ममधील लोकांना आज यश साजरं करण्याची संधी मिळेल. पार्टनर किंवा समवयस्कांकडून भावना दुखावल्या जातील. शुभ रंग: निळा (Blue) शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 दान : प्राण्यांना पाणी पाजा किंवा त्यांच्यासाठी पाणी दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) अनलिमिटेड एनर्जी आणि असीम क्षमतेमुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये टॉपला जाता येईल. सर्जनशील विचार आणि वक्तृत्वामुळे कामाच्या ठिकाणी बॉस आणि घरातील सदस्यांना आकर्षित करता येईल. तुम्ही कुठल्याही परिस्थितींमध्ये काम करण्याची तयारी दाखवल्यास नक्की यश मिळेल. आज पैसे आणि मौल्यवान वस्तू काळजीपूर्वक हाताळाव्यात. क्रिएटिव्ह लोक आणि पब्लिक फिगर्सना आज प्रसिद्धी मिळेल. स्पोर्ट्स कोचेसना आज विजय आणि बक्षीसं मिळतील. कन्स्ट्रक्शन आणि अॅग्रीकल्चर सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. सकाळी कपाळाला चंदनाचा टिळा लावा. शुभ रंग : नारंगी आणि निळा (Orange and Blue) शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3 आणि 9 दान : गरिबांना सूर्यफुलाचं तेल दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) जुनं काम संपवून नवीन असाइनमेंट हाती घ्या. हाय पोझिशनवर असलेले लोक आणखी प्रगती करतील. पैशांच्या बाबतीतील प्लॅन्स कुणासोबत शेअर करू नका. विद्यार्थ्यांना सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. हिरव्या पालेभाज्या दान करणं शुभ ठरेल. स्पोर्ट्समन आणि सर्जन्सना आर्थिक नफा मिळेल आणि त्यांच्या कामगिरीचं कौतुकही होईल. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. शांतपणे त्यांच्या तक्रारी ऐका. आज दानधर्म करणं गरजेचं आहे. शुभ रंग : निळा (Blue) शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 9 दान : गरजूंना चपला दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुम्ही जिथं कुठं नेतृत्व करताय त्या क्षेत्रातले प्रश्न सोडवण्यातच तुमचा आजचा दिवस जाईल. जोडीदाराला तुमच्या फीलिंग्ज सांगण्यासाठी आजचा दिवस फार चांगला आहे. मशिनरी खरेदी करण्यासाठी, मालमत्ता विकण्यासाठी, अधिकृत कागदपत्रांवर सह्या करण्यासाठी तसंच सहलीसाठी बाहेर जाण्यासाठीदेखील आजचा दिवस उत्तम आहे. न्यूज अँकर, अॅक्टर्स, हँडिक्राफ्ट आर्टिस्ट, इंजिनीअर्सच्या कामाचं कौतुक होईल. आमिषांना बळी पडू नका कारण हा तुम्हाला अडकवण्याचा तुमच्या शत्रूचा प्रयत्न असू शकतो. शुभ रंग : अॅक्वा (Aqua) शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : अनाथाश्रमातील मुलांना हिरवी फळं दान करा. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज नवीन संधीचा फायदा घेता येईल. जर तुम्ही ध्येया गाठण्यासाठी भरपूर कष्ट केले तर शेवटी समाधान आणि आनंद मिळेल. आज तुमच्या कृतीला यश मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमची स्वप्नं पूर्ण होऊ शकतात. या सर्व प्रकारच्या लक्झरी गोष्टींचा आनंद घेता येईल. कौटुंबिक स्नेह आणि पाठिंब्यामुळे समृद्धी मिळेल. आजचा दिवस जबाबदाऱ्या पार पाडण्यात जाईल. रिटेलर्स, टीचर्स, ज्वेलर्स, कॉस्मेटिक बिझनेसमधील व्यक्ती, डिझायनर्स, लॉयर्स, टेकीज, पॉलिटिशियन्स आणि अॅक्टर्सना स्पेशल अप्ररायझल आणि स्टॅबिलिटीचा आनंद घेता येईल. शुभ रंग : स्काय ब्ल्यू (Sky Blue) शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 आणि 9 दान : गरिबांना पांढरा तांदूळ दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) जवळची माणसं निवडताना हुशारीचा वापर करा. तुमची जबाबदारी इतरांवर सोपवण्याचं टाळा. रिलेशनशीप्स, परफॉर्मन्स आणि आर्थिक प्रगतीचा आनंद घेण्याची संधी मिळेल. आज बिझनेसमध्ये नातेवाईक आणि मित्रांपासून सावध राहा. खेळाडूंनी वाद टाळण्यासाठी प्रतिस्पर्ध्यांपासून दूर राहावं. विरुद्धलिंगी व्यक्तीमुळे तुम्हाला फायदा होईल. आशीर्वाद मिळविण्यासाठी श्रीशंकराची पूजा केली पाहिजे. शुभ रंग : हिरवा (Green) शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 3 दान : शिजवलेला पिवळा भात किंवा डाळी दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) एकामागून एक घडत असलेल्या अनेक घडामोडींमध्ये तुमचा आजचा दिवस जाईल. आजूबाजूच्या सर्व लोकांचा तुमच्यावर विश्वास असल्यानं लीडरशीपचा आनंद मिळेल. आरोग्याची काळजी घेणं आणि कुटुंबासोबत वेळ घालवणं गरजेचं आहे. दानधर्म फारच उपयुक्त ठरेल. आज गार्डनमध्ये आणि पाण्याच्या स्रोतांजवळ थोडा वेळ घालवा. करिअरशी संबंधित निर्णय भविष्यासाठी योग्य असतील. त्यासाठी तुमच्या मेंटॉरचा सल्ला घ्या आणि त्याचं पालन करा. शुभ रंग : जांभळा (Purple) शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : गरिबांना छत्री दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) बँकर्स, शेफ, हॉटेलियर्स, डॉक्टर्स, हीलर्स, फार्मासिस्ट, सर्जन, पॉलिटिशियन्स आणि स्पोर्ट्समनना आज बक्षिसं आणि प्रसिद्धी मिळेल. हा दिवस प्रसिद्धी, मौजमजा, एनर्जी आणि उत्साहानं भरलेला असेल. तुमच्या उद्दिष्टांच्या जवळ जाण्यासाठी या गोष्टींचा वापर करा. आज आर्थिक लाभ आणि मालमत्तेची नोंदणी सुरळीतपणे होण्याची शक्यता आहे. परस्पर विश्वासामुळे रिलेशनशीप अधिक घट्ट होईल आणि समृद्धी मिळेल. शुभ रंग : लाल (Red) शुभ दिवस: मंगळवार शुभ अंक : 9 दान : गरिबांना लाल मसूर दान करा. 8 मे रोजी जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती: चिन्मयानंद सरस्वती (Chinmayananda Saraswati), रेमो फर्नांडिस (Remo Fernandes), साई किरण (Sai Kiran), पी. आर. श्रीजेश (P. R Srijeesh).
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Numerology, Rashibhavishya

    पुढील बातम्या