ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 24 मे 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.
#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
तुमचा स्वभाव आणि आयुष्यातल्या घटना यांचा मेळ आज बसणार नाही. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मनाविरुद्ध होऊ शकतील. तुमच्या हुशारीमुळे आज घेतले जाणारे सर्व निर्णय योग्यच ठरतील. एखादं सरकारी किंवा कायदेविषयक काम पूर्ण करण्यासाठी मध्यस्थ भेटेल. अभिनेत्यांना नव्या करारामध्ये फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज येणाऱ्या ऑफर्स टाळाव्यात. आजचा दिवस चामड्याच्या वस्तू वापरणं टाळा. तसंच सूर्यदेवाची पूजा करून आशीर्वाद घ्या.
शुभ रंग : निळा आणि पिवळा (Blue and Yellow)
शुभ दिवस : रविवार
शुभ अंक : 3
दान : कृपया आश्रमांमध्ये केशरयुक्त गोड पदार्थ दान करा.
#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
एखाद्या कायदेशीर प्रकरणात अडकले असाल, तर तुमच्याच बाजूने निकाल लागेल. तुमची ब्रँड व्हॅल्यू आणि पत याचा केसला फायदा होईल. आज घरातली मोठी जबाबदारी घेण्याचा दिवस आहे. बिझनेसविषयक बोलणी सुरळीत पार पडतील. एखाद्या मोठ्या कंपनीसोबत पार्टनरशिप करण्याचा विचार करत असाल, तर त्या दृष्टीने पाऊल उचलण्याची वेळ आहे. कृपया वाद टाळा. आजचा दिवस रोमँटिक राहू शकतो. राजकीय व्यक्ती, रिटेलर्स, शिक्षणतज्ज्ञ, डॉक्टर आणि ज्वेलर्स यांनी कागदपत्रांवर सही करताना खबरदारी घ्यावी.
शुभ रंग : आकाशी निळा (Sky Blue)
शुभ दिवस : सोमवार
शुभ अंक : 2 आणि 6
दान : कृपया मंदिरात वा गरजू व्यक्तीला चांदीचं नाणं दान करा.
#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आजचा दिवस तुमच्या सगळ्या योजना अमलात आणण्याचा आहे. आज तुम्ही काहीही कराल ते तुमच्या फायद्याचं ठरेल. नाट्य कलाकारांना कामाच्या ठिकाणी नवी संधी मिळेल. एखाद्या नव्या नात्याची सुरुवात होऊ शकते. नशीब तुमच्या बाजूने असेल; मात्र सध्या थोडी सबुरी दाखवणं गरजेचं आहे. संगीतकार, डिझायनर, विद्यार्थी, न्यूज अँकर्स, राजकारणी, अभिनेते, कलाकार, गृहिणी, हॉटेलियर्स आणि लेखकांना वैयक्तिक आयुष्यात एखादी खास बातमी मिळेल. महिलांनी दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी कपाळावर वा भांगात कुंकू लावावं.
शुभ रंग : लाल
शुभ दिवस : गुरुवार
शुभ अंक : 3 आणि 1
दान : कृपया गरजूंना कच्ची हळद दान करा.
#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
एखादी नवी संधी चालून येण्याची शक्यता आहे. तिचा खुल्या मनाने स्वीकार करा. आज चादर दान केल्यामुळे फायदा होईल. बांधकाम, मशिनरी, मेटल, सॉफ्टवेअर अशा व्यवसायांमध्ये असलेल्या व्यक्तींनी, तसंच ब्रोकर्सनी आज अॅग्रीमेंटवर सही करणं टाळावं. आज पालक असल्याचा अभिमान वाटेल. खेळाडूंनी आज नवं आव्हान स्वीकारावं. दिवसाच्या शेवटी यश नक्कीच मिळेल.
शुभ रंग : निळा (Blue)
शुभ दिवस : मंगळवार
शुभ अंक : 9
दान : कृपया अनाथाश्रमात कपडे दान करा.
#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज तुम्हाला कुटुंबीय, मित्र, सहकारी आणि अगदी बॉसचाही भरपूर पाठिंबा मिळेल. दिवसभरात द्विधा मनःस्थिती राहील. त्यामुळे प्रॉपर्टीसंबंधी मोठे निर्णय घेणं टाळा. खेळाडू आणि ट्रॅव्हलर्ससाठी उत्तम दिवस. महत्त्वाची मीटिंग वा मुलाखत असल्यास, हिरव्या रंगाचे कपडे घालून जा. आपल्या जोडीदारापासून काहीही लपवू नका, अन्यथा नातेसंबंध बिघडू शकतात.
शुभ रंग : Sea Green
शुभ दिवस : बुधवार
शुभ अंक : 5
दान : कृपया मदतनीसांना हिरव्या बिया दान करा.
# नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
एखाद्या गोष्टीत तुमच्यावर अन्याय झाला असेल, तर त्या बाबतीत तुम्हाला लवकरच न्याय मिळू शकतो. मनःशांती लाभण्यासाठी तुम्हाला स्वतःच प्रयत्न करायला हवेत हे लक्षात घ्या. तुमच्या खांद्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्या लवकरच कमी होतील. ज्वेलर्स, अभिनेते, जॉकी आणि डॉक्टर्सना आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. वडील आपल्या मुलांना भविष्यात उपयोगी येईल असा सल्ला देतील.
शुभ रंग : Blue and Sea Green
शुभ दिवस : शुक्रवार
शुभ अंक : 6
दान : कृपया आश्रमांमध्ये स्टीलचं भांडं दान करा.
#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
भूतकाळाचा विचार करणं थांबवा. तसंच सूड घेण्याचा विचारही सोडून द्या. तुम्हाला होत असणाऱ्या त्रासाचं मूळ नष्ट करण्याची वेळ आली आहे. कामाच्या ठिकाणी बॉस किंवा वरिष्ठांशी चर्चा टाळा. आज कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी विचार करा. हीलिंग, मोटिव्हेशन, ऑकल्ट सायन्स, स्पिरिच्युअॅलिटी स्कूल्स, शेती आणि धान्य अशा व्यवसायांमध्ये असणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्तम आहे. तुम्ही भावनिक न होता निर्णय घेतला, तर बिझनेस रिलेशन्स चांगली राहतील.
शुभ रंग : केशरी आणि निळा (Orange and Blue)
शुभ दिवस : सोमवार
शुभ अंक : 7
दान : कृपया मंदिरांमध्ये केशरयुक्त दूध दान करा.
#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज व्यवसायात अनेक संधी चालून येतील; मात्र तुम्हाला तुमचा हट्टी स्वभाव बाजूला ठेवावा लागेल. आज अगदी कमी मेहनतीत मोठं टार्गेट पूर्ण कराल. एखादी वरिष्ठ व्यक्ती तुम्हाला कामात मोलाचं मार्गदर्शन करू शकते. तिचं नक्कीच ऐका. बिझनेसमधले व्यवहार दुपारच्या जेवणापूर्वी केल्यास फायद्याचे ठरतील. आज प्रवास करणं टाळा. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास ठेवा आणि आध्यात्मिक विचार ठेवा. आज फायदा होईल.
शुभ रंग : Sea Blue
शुभ दिवस : शुक्रवार
शुभ अंक : 6
दान : कृपया गायींना हिरवा चारा खाऊ घाला.
#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज तुमची जवळची व्यक्ती तुमचा विश्वासघात करण्याची शक्यता आहे. तेव्हा सांभाळून राहा. एवढी एकच गोष्ट सोडली तर बाकी दिवस उत्तम आहे. शिक्षण, लॉ, कौन्सिलिंग आणि फायनान्स क्षेत्रांतल्या व्यक्तींना आज फायदा संभवतो. कलाकार व्यक्तींसाठी आज अगदी आशादायी दिवस आहे. जुन्या मित्रांना वा सहकाऱ्यांना भेटण्यासाठी आज उत्तम दिवस आहे. आज लाल रंगाचे कपडे घातल्यास फायदा होईल. आपल्या लग्नाविषयी कुटुंबाशी बोलणी करण्यासाठी चांगला दिवस आहे, आज तुम्ही म्हणाल त्याला ते पाठिंबा देतील. कृपया आज रागावर नियंत्रण ठेवा आणि आहारात पालेभाज्या आणि लिंबूवर्गीय भाज्यांचा समावेश करा.
शुभ रंग : लाल (Red)
शुभ दिवस : मंगळवार
शुभ अंक : 9 ते 6
दान : कृपया महिलांना केशरी कापड दान करा.
24 मे रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : राजेश रोशन, अनिता फादिया, आर्य बब्बर, शिरीष कुंदर, राजदीप सरदेसाई, काझी नजरुल इस्लाम
Keywords : Numerology
सुदेश
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.