• Home
 • »
 • News
 • »
 • astrology
 • »
 • पुढचे 15 दिवस भाग्याचे ठरवणारा काळ; पाहा कोणाच्या आयुष्यात येणार सोनेरी दिवस

पुढचे 15 दिवस भाग्याचे ठरवणारा काळ; पाहा कोणाच्या आयुष्यात येणार सोनेरी दिवस

अंकशास्त्रानुसार मुलांकानुसार व्यक्तीची माहिती मिळवता येऊ शकते.

अंकशास्त्रानुसार मुलांकानुसार व्यक्तीची माहिती मिळवता येऊ शकते.

अंकशास्त्रानुसार (According to Numerology) पुढच्या काही दिवसांमध्ये काही व्यक्तींसाठी अनुकूल काळ सुरू होणार आहे. नोकरी,व्यापार आणि कौटुंबिक सुख प्राप्त होईल.

 • Share this:
  नवी दिल्ली, 17 ऑगस्ट :  ज्याप्रकारे ज्योतिष शास्त्रानुसार (According to Astrology) व्यक्तीचा स्वभाव आणि भाग्य कळू शकतं. त्याप्रकारे अंकशास्त्रानुसार व्यक्तीचा स्वभाव, त्याच्या आयुष्यात घडणारे प्रसंग भविष्य यांची माहिती मिळू शकते. अंकशास्त्रानुसार (Numerology) आपला क्रमांक काढण्यासाठी जन्म तारीख, महिना आणि वर्ष याची बेरीज करावी लागते. त्यालाच मुलांक म्हटलं जातं. ज्यांची जन्मतारीख 26,8,17 आहे. त्यांचा भाग्यांक 8 होऊ शकतो. अंकशास्त्रानुसार पुढचे 15 दिवस काही लोकांसाठी अतिशय शुभ ठरणार आहेत. पाहुयात कोणत्या मुलांकासाठी आहे चांगला काळ मूलांक 3 – या मुलांकाच्या व्यक्तींना त्यांच कार्यक्षेत्र आणि व्यापारात यश मिळणार आहे. सहकाऱ्यांच्या मदतीने कार्यक्षेत्रातल्या अडचणी कमी होतील. पुढच्या काही दिवासांपासून व्यापारात लाभाचे संकेत आहेत. नवीन इन्व्हेस्टमेन्टसाठी हा काळ उत्तम आहे. व्यवसायासंबंधी कामासाठी प्रवास करावा लागेल. मनावर ताबा ठेवावा लागेल. सावधपणे निर्णय घ्यावेत. शेवटच्या 5 दिवसात अडकलेली कामं मार्गी लागतील. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. आरोग्याची काळजी घ्यावी. (जेवणासाठी रोज वापरता पण, ‘या’ पद्धतीने उपयोगात आणली आहे का मोहरी ?) मूलांक 5 - पुढचे पंधरा दिवस सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असतील. कार्यक्षेत्र आणि व्यापारामध्ये अनुकूल वातावरण असेल. सहकाऱ्यांची मदत मिळेल. अधिकार्‍यांच्या सहवासात राहण्याची संधी मिळेल. ठरवलेल्या योजना मार्गी लागतील. या महिन्यांमध्ये कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील. व्यवसायामध्ये अचानक धनलाभ होऊ शकतो. जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होण्याची शक्यता आहे. (अशी बदलंली परिस्थिती की,डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या ऋषिता गुप्ता झाल्या IAS) इन्वेस्टमेंटमध्ये फायदा होईल. कुटुंबामध्ये जवळच्या व्यक्ती आजारी होण्याची शक्यता आहे. शेवटच्या टप्प्यात वातावणातील बदलामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मूलांक 6 - या महिन्यामध्ये कार्यक्षेत्र आणि व्यापारामध्ये अतिशय अनुकूल वातावरणाचा फायदा होणार आहे. प्रगतीच्या नवीन वाटा मिळतील. अडकलेल्या कामांना गती मिळेल. सहकारी आणि अधिकारी यांचं सहाय्य मिळेल. व्यापारामध्ये फायद्याच्या संधी मिळतील. प्रवासाचे योग आहेत. नवीन योजना मार्गी लागतील. कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण राहील. (आठवड्याचं राशीभविष्य : कसा जाईल हा आठवडा, तुमचं राशीभविष्य जाणून करा प्लानिंग) मूलांक 9 - या लोकांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी आणि व्यापारामध्ये नशिबाची साथ मिळणार आहे. नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडतील. व्यापारामध्ये अचानक धनलाभ होऊ शकतो. महिन्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये कार्यक्षेत्रामध्ये बदलाच्या शक्यता आहेत. कामानिमित्ताने प्रवास होऊ शकतो. शत्रुंपासून सावध राहावं. वादविवाद, भांडण-तंटे या मुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. वातावरणातील बदलामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
  Published by:News18 Desk
  First published: