Home /News /astrology /

Numerology: जन्मतारखेनुसार 23 मेचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? अंकशास्त्रानुसार जाणून घ्या भविष्य

Numerology: जन्मतारखेनुसार 23 मेचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? अंकशास्त्रानुसार जाणून घ्या भविष्य

अंकशास्त्रानुसार 23 मे 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 23 मे 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) सध्या जर तुम्हाला एकटं-एकटं वाटत असेल, तर याबाबतची तक्रार आज दूर होईल. आज बरेच जण तुमची आठवण काढतील, तसेच कित्येक जणांची सोबत लाभेल. आज अगदी एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे तुम्हाला भाव मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रमोशन होण्याची शक्यता आहे. तसेच, खासगी आयुष्यातही नशीब जोरावर राहील. जोडीदार तुमच्यावर खूश असेल. आवडत्या व्यक्तीकडून भरपूर प्रेम आणि आधार मिळेल. अभिनय, सोलर एनर्जी, आर्टवर्क, कॉस्मेटिक्स, शेती आणि प्रॉपर्टीसंबंधी व्यवसायांतील व्यक्तींना फायदा संभवतो. एकूण उत्तम दिवस. शुभ रंग : हिरवा आणि पिवळा (Green and Yellow) शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 1 आणि 5 दान : कृपया मंदिरात पिवळी फळं दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) महिलांना आज घरी वा कामाच्या ठिकाणी आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. यामुळे मोठ्या प्रमाणात प्रशंसा होईल. लहान मुलांना भरपूर आत्मविश्वास वाटेल, तसंच त्यांचं नशीबही चांगले राहील. आपल्या मुलांची शैक्षणिक प्रगती पाहून पालकांना अभिमान वाटेल. जोडप्यांमध्ये प्रेम अधिक फुलून येईल, त्यामुळे नातेसंबंध बळकट होतील. महत्त्वाच्या बैठकीसाठी किंवा मुलाखतीसाठी सी ग्रीन रंगाचे कपडे घालणे लकी ठरेल. एखाद्या अध्यात्मिक गुरूंसोबत वेळ व्यतीत करा, भविष्यात त्यांची मदत घेण्याची वेळ येऊ शकते. माध्यमं, राजकारण, डिझायनिंग, मेडिकल आणि अभिनय क्षेत्रांतील व्यक्तींना विशेष यश मिळेल. शुभ रंग : समुद्री हिरवा (Sea Green) शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 आणि 6 दान : कृपया गरीबांना साखर दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज समोरून चालून आलेली ऑफर किंवा एखादा बदल नक्की स्वीकारा. यामुळे तुमचं नशीब फळफळू शकतं. नातेसंबंध टिकवण्यासाठी संवाद अगदी महत्त्वाचा असतो. त्यामुळे आज एखाद्या गोष्टीवर मौन बाळगणं टाळा. क्रिएटिव्ह व्यक्तींना आज खर्च केलेल्या वेळेचा चांगला मोबदला मिळेल. एखादी नवी गोष्ट सुरू करण्याचा विचार करत असाल तर आज त्यासाठी उत्तम दिवस आहे. खेळाडू, स्टॉक ब्रोकर्स, विमान कर्मचारी, डिफेन्स कर्मचारी, शिक्षणतज्ज्ञ, हॉटेलियर्स, संगीतकार आणि राजकारणी व्यक्तींना भरपूर प्रसिद्धी मिळेल. आज क्लायंटला भेटण्यासाठी दुपारच्या जेवणानंतरची वेळ निवडा. शुभ रंग : तपकिरी (Brown) शुभ दिवस : गुरूवार शुभ अंक : 3 आणि 1 दान : कृपया आश्रमांमध्ये तपकिरी रंगाची साखर दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्या मागे असलेला कामाचा व्याप आज अगदी कमी होईल. त्यामुळे इतर काही प्लॅन्स असतील तर आज ते अमलात आणले जातील. मार्केटिंग स्ट्रॅटर्जींना नशीबाची साथ मिळेल. आजचा दिवस थोडासा निरर्थक वाटेल, मात्र दिवसाच्या शेवटी सर्व काही तुमच्या कलाने होत असल्याचं कळेल. तरुणांनी आपल्या मनातील प्रेमभावना व्यक्त कराव्यात. मात्र, मैत्रीचा वा प्रेमाचा गैरफायदा घेणं टाळावे. आज मांसाहार आणि मद्यपान टाळा. शुभ रंग : शेवाळी (Teal) शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया गरिबांना कपडे दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुमचं नशीब अगदी जोरावर राहील. यामुळे करिअरमध्ये अचानक भरपूर प्रगती होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही जे काही कराल त्यात नशीब तुमची साथ देईल. त्यामुळे रिस्क घेण्यासाठी, खेळात सहभागी होण्यासाठी, शेअर्स खरेदी करण्यासाठी किंवा एखाद्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत एखाद्या छोट्याशा सहलीला जाल. नातेसंबंध सुधारतील. आज कोणतीही वस्तू खरेदी करताना मागे-पुढे पाहू नका. त्या वस्तूचा भविष्यात फायदाच होईल. शेअर बाजारात किंवा प्रॉपर्टीमध्ये आवर्जून गुंतवणूक करा. आज एखादी विशिष्ट व्यक्ती, मित्र वा मार्गदर्शक भेटेल. शुभ रंग : समुद्री हिरवा (Sea green) शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : कृपया हिरवी रोपं दान करा. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) सोप्या शब्दांमध्ये सांगायचं तर आजचा दिवस तुमचाच आहे! नवे घर, नवी नोकरी, नवी नाती, आर्थिक फायदे, ऐशोआराम, प्रवासाचा योग, पार्टी करण्याचे कारण अशा कित्येक गोष्टी आज तुमच्या नशीबात लिहिल्या आहेत. आनंदाच्या भरात मोठी कमिटमेंट कराल, मात्र ती पूर्णही कराल. आज सर्व टार्गेट पूर्ण होतील, आणि तुम्हाला एकदम चॅम्पियन असल्यासारखं वाटेल. राजकारणी, खेळाडू, रिटेल व्यावसायिक, हॉटेलियर आणि विद्यार्थ्यांना आपापल्या क्षेत्रात यश मिळेल. गृहिणी आणि शिक्षकांना कुटुंबाचे प्रेम आणि आदर मिळेल. सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रमोशन होण्याची शक्यता आहे. आर्टिस्ट असणाऱ्या व्यक्ती भरपूर लोकांवर छाप पाडतील. लग्नाच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांना स्थळं येतील. शुभ रंग : आकाशी निळा (Sky Blue) शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 आणि 2 दान : कृपया लहान मुलांना निळं पेन किंवा पेन्सिल दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज सहसा कोणावरही विश्वास ठेवणं टाळा. या बाबतीत आजचा दिवस चांगला नाही. आपल्या मनात काय आहे याबाबत कोणाशीही, विशेषतः ऑफिसमधील सहकाऱ्यांशी बोलणं टाळा. आज कागदपत्रांसंबंधी व्यवहार करताना खबरदारी घ्या. दिवसाच्या सुरूवातीला गुरू मंत्राचा जप करा. तसंच, थोरामोठ्यांचे आशीर्वाद घ्या. महिलांना बिझनेस डील्समध्ये मोठ्या प्रमाणात फायदा संभवतो. लहान ब्रँड्सना आज मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. वकील आणि सॉफ्टवेअर इंजिनीअर असणाऱ्या व्यक्तींनी आज वर्क फ्रॉम होम करणं टाळा. आज घरातून बाहेर पडणं फायद्याचं ठरू शकतं. दिवसभरात कधीही पिवळ्या डाळी दान करा. शुभ रंग : केशरी (Orange) शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : कृपया तांब्याचे भांडे दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) इतरांविषयी कोणतेही मत बनवण्यापूर्वी हे लक्षात घ्या की या जगात कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नाही. भूतकाळात तुम्ही केलेल्या काही चांगल्या कामांमुळे आज कोणत्याही अडचणीवर मात करू शकाल. गायींसाठी दानपुण्य करण्याची आज चांगली संधी आहे. जोडप्यांना एकमेकांसोबत खास क्षण व्यतीत करता येतील, यामुळे प्रेम आणखी फुलेल. डॉक्टर, बिल्डर, नाट्य कलाकार, फार्मासिस्ट, इंजिनियर, आणि उत्पादक व्यक्तींना धनलाभ होईल. आजचा दिवस मेटलमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि मशीनरी खरेदी करण्यासाठी उत्तम आहे. हलक्याशा तणावामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे झोपण्यापूर्वी एखादा योगप्रकार करा. शुभ रंग : निळा (Blue) शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया अनाथाश्रमात मोहरीचं तेल दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) दुसऱ्या लोकांचे प्रश्न सोडवायला पुढे जाण्यापूर्वी आपल्या घरचे प्रश्न सोडवण्यावर लक्ष द्या. अभिनेते, गायक, डिझायनरर्स, राजकारणी, लेखक, मीडिया पर्सन्स अशा समाजमाध्यमांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना भरपूर प्रसिद्धी, नाव आणि समृद्धी मिळेल. डॉक्टर आणि इतिहासकारांचे नशीबही जोरावर असेल. जमीन आणि शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी आज अगदी आदर्श दिवस आहे. तरुणांना आज आपल्या जोडीदारावर छाप पाडण्याची संधी मिळेल. हॉटेलमध्ये खाणे, इव्हेंटला जाणे, पार्टी होस्ट करणे, ज्वेलरी विकत घेणे, काऊन्सलिंग किंवा खेळामध्ये सहभागी होण्यासाठी आजचा दिवस साधारण असा आहे. शुभ रंग : तपकिरी (Brown) शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 आणि 6 दान : कृपया एखाद्या लहान मुलीला लाल रूमाल दान करा. 23 मे रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : गायत्री देवी, विनोद राय, समीर कोच्चर, रहमान, सुगंधा मिश्रा
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या