मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology: तुमच्या जन्मतारखेनुसार नक्की कसा असेल येणार आठवडा? अंकशास्त्र देईल संपूर्ण माहिती

Numerology: तुमच्या जन्मतारखेनुसार नक्की कसा असेल येणार आठवडा? अंकशास्त्र देईल संपूर्ण माहिती

4: 4, 13, 22 आणि 31 तारखेला जन्मलेले पुरुष आणि स्त्रिया उत्साही, बंडखोर, आवेगपूर्ण, सक्रिय, सतर्क, स्वाभिमानी, आशावादी, बुद्धिमान आणि धोकादायक स्वभावाचे असतात.

4: 4, 13, 22 आणि 31 तारखेला जन्मलेले पुरुष आणि स्त्रिया उत्साही, बंडखोर, आवेगपूर्ण, सक्रिय, सतर्क, स्वाभिमानी, आशावादी, बुद्धिमान आणि धोकादायक स्वभावाचे असतात.

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 4 डिसेंबर 2022नंतरचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 4 डिसेंबर 2022नंतरचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

हा आठवडा तुमच्यासाठी कठीण असेल. आठवडाभर तुम्ही खूप व्यस्त आणि अस्वस्थ असाल. पैशांच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. जोडप्यांनी प्रवासाच्या योजना आणि क्षुल्लक गोष्टींवरून वाद टाळले पाहिजेत. सरकारी कर्मचारी आणि मध्यस्थांशी संवाद साधण्यात अडचण येईल. तुमच्या उंचावलेल्या आत्मविश्वासामुळे यश मिळेल. नफा आणि ब्रँड व्हॅल्यू मिळवण्यासाठी हार्डवेअर उत्पादनं, नागरी बांधकाम, दागिने निर्मिती, निर्यात क्षेत्र, सौर उत्पादनांची विक्री, सरकारी असाइनमेंट, वैद्यकीय शिक्षण आणि मीडिया उद्योगात गुंतवणूक करणं योग्य ठरेल.

शुभ रंग: निळा आणि बेज (beige)

शुभ दिवस: रविवार

शुभ अंक: 1

दान: गरजूंना किंवा गुरांना केळी दान करा.

#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

हा आठवडा संथ आणि रटाळ घडामोडींचा असल्यानं सध्या दीर्घकालीन नियोजनावर करणं टाळा. ब्रँड प्रस्थापित करण्यासाठी कौटुंबिक सद्भावनेचा आधार घ्या. सोमवारी शंकराला दुधाचा अभिषेक घाला. चांगले आशीर्वाद मिळावेत यासाठी नीटनेटकं राहण्याचं लक्षात ठेवा. प्रेमभावनेमुळं तुमचं मन बदलेल. गोष्टी शेअर करणं मानसिकदृष्ट्या सर्वात योग्य ठरेल. कुटुंब आणि नातेवाईकांसाठी पैसा आणि वेळ खर्च करा. या आठवड्यात कौटुंबिक कार्यक्रमांना उपस्थित राहा, छोट्या ट्रिपची योजना करा, स्टॉकमध्ये गुंतवणूक करा आणि तुमच्या जोडीदाराला सरप्राईज गिफ्ट द्या.

शुभ रंग: अॅक्वा

शुभ दिवस: सोमवार

शुभ अंक: 2

दान: गरजूंना साखर दान करा.

#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

या आठवड्यात महिन्यातील कामाचं आणि खर्चाचं नियोजन करावं लागेल. विद्यार्थ्यांनी शिस्त पाळावी आणि लक्ष विचलित होऊ देऊ नये. वैयक्तिक जीवनात भावनिक असंतुलन राहिल त्यामुळे भूतकाळातील घटनांकडे दुर्लक्ष करा. हा आठवडा आध्यात्मिक गोष्टींचं पालन करण्याचा आणि घरगुती जबाबदाऱ्या पार पाडण्याचा आहे. मोठ्या ब्रँड्सशी संलग्न होण्याचा विचार करत असल्यास, 5 किंवा 6 डिसेंबरपर्यंत होऊ शकता. सल्लागार, शिक्षक, गायक, प्रशिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी आणि वकील यांच्यासाठी हा आठवडा प्रभावी असेल. वाद मिटवण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. पुस्तकं, सजावटीचं साहित्य, धान्य किंवा संगीत वाद्ये विक्रीच्या व्यवसायात चांगली वाढ होईल. संगीतकार, हॉटेलिअर्स, जॉकी, लाइफ कोचेस, फायनान्सर्स आणि संगीतकारांना पुन्हा नफा मिळवण्यासाठी आणि प्रगती साध्य करण्यासाठी चांगला आठवडा आहे.

शुभ रंग: व्हॉयलेट

शुभ दिवस: गुरुवार

शुभ अंक: 3

दान: गुरांना कच्ची केळी खायला घाला.

#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

या आठवड्यात तुम्हाला कमाई करायची असेल तर शिस्त पाळा आणि सहकार्य ठेवा. आर्थिक व्यवहार, ऑडिशन, ऑडिटिंग, नोकरीचा शोध, कमिशनिंग मिळवणं असो किंवा लग्नाचे प्रस्ताव असोत सर्व गोष्टी मनापासून केल्या तरच त्या सत्यात उतरतील. आठवडाभर तुम्हाला तुमच्या मुलांचा अभिमान वाटेल. कृषी क्षेत्र आणि व्यावसायिक मालमत्तेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी अनुकूल दिवस आहेत. बँक कर्मचारी, आयटी कर्मचारी, कलाकार किंवा अभिनेते, न्यूज अँकर आणि डान्सर्स गुंतवणूक करू शकतात. त्यांना उच्चप्रतीचे लाभ मिळण्याचे योग आहेत. हार्डवेअर, बांधकाम साहित्य, धातू आणि कपडे निर्मात्यांना व्यवसायात नवीन ऑफर मिळण्याची शक्यता आहे. कृपया घरात तुळशीचं रोप ठेवा आणि त्याला रोज पाणी घाला.

शुभ रंग: निळा

शुभ दिवस: मंगळवार

शुभ अंक: 5 आणि 6

दान: मित्राला तुळशीचं रोप दान करा.

#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

जेव्हा तुम्ही द्विधा मनस्थितीमध्ये अडकाल तेव्हा डोळे बंद करून प्रार्थना करा. असं केल्यास तुम्हाला तुमच्या नशीबाची योग्य वेळी साथ मिळेल. गणपतीची पूजा करून आशीर्वाद घ्या. खेळाडू आणि वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती मोठ्या गर्दीचा यशस्वीपणे सामना करतील. मोठ्या प्रमाणात आर्थिक नफा मिळण्याची शक्यता आहे. आयात-निर्यात गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. मॉडेलिंग, वैद्यकीय, क्रीडा, इव्हेंट्स क्षेत्रातील व्यक्तींनी ऑडिशन आणि मुलाखतींमध्ये नशीब आजमवलं पाहिजे.

शुभ रंग: हिरवा

शुभ दिवस: बुधवार

शुभ अंक: 5

दान: प्राण्यांना दूध द्या.

#नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

या आठवड्यात लव्ह पार्टनर, मित्र, पालक, मुलं किंवा नातेवाईक यांच्याशी चांगल्या वैयक्तिक संबंधांचा आनंद घेता येईल. जर तुम्ही सेवा क्षेत्रात असाल तर तुम्हाला नशीबाची साथ आणि स्थिरता मिळेल. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तुम्ही खूप कष्ट घेतले आहेत म्हणून तुमच्या प्रयत्नांना ओळख मिळेल. तुमची प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी मास कम्युनिकेशनचा वापर करणं सर्वोत्तम पर्याय ठरेल. संधी मिळण्यासाठी वेळ लागेल. या आठवड्यात कौटुंबिक आनंद आणि जीवनात पूर्णत्व मिळेल. लग्नाचे प्रस्ताव गांभीर्याने घेतले पाहिजेत कारण सध्याची स्थिती अनुकूल आहे. व्यावसायिक क्लायंटच्या समस्या सोडवण्याची, रात्रीच्या जेवणासाठी किंवा खरेदीसाठी बाहेर जाण्यासाठी योग्य वेळ आहे. या आठवड्यात गृहिणी, खेळाडू, प्रॉपर्टी डीलर्स, त्वचारोग तज्ज्ञ, गायक, डिझायनर, इव्हेंट मॅनेजरर्स, ब्रोकर्स, शेफ आणि विद्यार्थ्यांना यश मिळवण्याची शक्यता आहे.

शुभ रंग: गुलाबी आणि ग्रे

शुभ दिवस: शुक्रवार

शुभ अंक: 6

दान: गरजूंना कपडे दान करा.

#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

या आठवड्यात केतू पूजा करा आणि ग्रहाची शुद्ध ऊर्जा मिळवा. तुम्ही फार व्यस्त असाल, त्यामुळे दैनंदिन गोष्टींसाठी आणि मित्रांसोबत कमी खर्च करा. राजकारण्यांसाठी नव्या कल्पना सत्यात आणण्यासाठी अनुकूल वेळ आहे. नेहमी फॅब्रिक किंवा लेदरऐवजी धातूच्या वस्तूंचा वापर करा. नेहमी शंकराचा आशीर्वाद घेतला पाहिजे. मोठे निर्णय काही काळ स्थगित करा. आईच्या सूचना लक्षपूर्वक ऐका. प्रवास टाळा आणि व्यायामाला सुरुवात करा. संरक्षण क्षेत्रातील व्यक्ती, वकील, शास्त्रज्ञ, पायलट, राजकारणी, थिएटर कलाकार, सीए आणि मीडिया क्षेत्रातील व्यक्तींना नशिबाची विशेष साथ मिळेल.

शुभ रंग: नारंगी

शुभ दिवस: सोमवार

शुभ अंक: 7 आणि 9

दान: मंदिरा कुंकू दान करा.

#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

दिवसभर उत्साही राहण्यासाठी उठल्यानंतर लगेच तुमचं ब्लँकेट फोल्ड करण्याची सवय लावा. वाटप आणि दानधर्मानं आठवड्याची सुरुवात करा. प्रभावी स्थान मिळवण्यासाठी तुमच्या स्वभावामध्ये लवचिकता येणं आवश्यक आहे. आर्थिक लाभ जास्त होतील. मालमत्ता आणि यंत्रसामग्री खरेदीशी संबंधित निर्णय तुमच्या बाजूने होतील. या आठवड्यात अनेक जबरदस्त घडामोडी घडण्याची शक्यता असल्यानं तणाव जास्त असेल. डॉक्टर आणि उत्पादकांना मिळालेल्या यशाबद्दल धन्य वाटेल. मुलांसोबत वेळ घालवा कारण त्यांना तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. धान्य दान करणं आणि लिंबूवर्गीय फळं खाणं आवश्यक आहे.

शुभ रंग: पर्पल

शुभ दिवस: शुक्रवार

शुभ अंक: 6

दान: गरजूंना कपडे दान करा.

#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

नवीन ऑफर होल्डवर ठेवा. परदेशवारी लाभदायक ठरेल. आरामाशी तडजोड करावी लागेल. आळशीपणा येईल. परदेशातील व्यवसाय आणि प्रशिक्षण व्यवसायात चढ-उतार येतील. कमिटमेंट्समुळे रोमँटिक जोडपी आनंदी राहतील. प्रेमात असलेल्यांसाठी त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी अतिशय विलक्षण वेळ आहे. व्यावसायिक संबंध आणि डील्स प्रत्यक्षात येण्यासाठी अधिक वेळ लागेल. धातू उद्योग आणि माध्यम क्षेत्रातील व्यक्ती प्रगतीचा आनंद घेतील आणि राजकारणी मोठ्या संधींची पूर्तता करतील. खेळाडू आणि विद्यार्थ्यांनी या दिवसांचा उपयोग सहकार्यासाठी आणि प्रगती साधण्यासाठी केला पाहिजे. विद्यार्थी, प्रशिक्षक, संगीतकार, लेखक, डिझायनर, डॉक्टर, वकील, अभियंते आणि अभिनेत्यांना लोकप्रियतेचा आनंद घेता येईल.

शुभ रंग: ब्राऊन

शुभ दिवस: मंगळवार

शुभ अंक: 9

दान: आश्रमात किंवा अनाथ आश्रमात गहू दान करा.

First published:

Tags: Numerology