Home /News /astrology /

Numerology: 'या' तारखेला जन्मलेले लोक आज ठरतील Lucky; अंकशास्त्रानुसार असा असेल तुमचा दिवस

Numerology: 'या' तारखेला जन्मलेले लोक आज ठरतील Lucky; अंकशास्त्रानुसार असा असेल तुमचा दिवस

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 4 ऑगस्ट 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 4 ऑगस्ट 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस अ‍ॅक्शन पॅक्ड असेल. त्यातून नवी रिलेशनशिप किंवा नवी बिझनेस पार्टनरशिप सुरू होऊ शकेल. शरीराच्या सौंदर्यासाठी खर्च करणं योग्य आहे. तुमच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि सुंदर राखायला विसरू नका. मशीन्स, शेतजमीन आदींची खरेदी उच्च परतावा देईल. फार्मास्युटिकल, मशिनरी, मॅन्युफॅक्चरिंग, कॉस्मेटिक्स, हँडिक्राफ्ट्स, बांधकाम, कृषिविषयक पुस्तकं, औषधं, फायनान्स आदी क्षेत्रांची कामगिरी प्रभावी असेल. मुलांचं शिक्षक आणि प्रशिक्षकांकडून कौतुक होईल. आज तुम्हा मृदू भाषेत संभाषण करणं अत्यंत आवश्यक आहे. शुभ रंग : Brown शुभ दिवस : शुक्रवार, मंगळवार शुभ अंक : 6 दान : गरिबांना ब्राउन राइस किंवा साखर दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस वादांचा आणि वाद सोडवण्याचा असू शकेल. तुम्हाला तुमच्या बॉसला काही महत्त्वाची किंवा गुप्त माहिती ई-मेलद्वारे पाठवायची असेल, तर ती पाठवा. परिणामांना घाबरू नका. लीगल कमिटमेंट्स उशिराने पूर्ण होतील. ताण कमी करण्यासाठी आज तुम्ही दुधाच्या पाण्याने आंघोळ करा. जुनी कर्जं फेडण्यासाठी आणि कायदेशीर वाद सोडवण्यासाठी आजचा दिवस वापरावा. धातू, लिक्विड्स, औषधं, इंजिनीअरिंग, एक्स्पोर्ट-इम्पोर्ट, केमिकल, बिल्डर्स, राजकीय नेते नवी उंची गाठतील. शुभ रंग : Sky Blue & Peach शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 6 दान : मंदिरात दही दान करावं. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) वैयक्तिक नातेसंबंधांत आज तुम्हाला स्पष्टता दिसेल. सरकारी नोकरी किंवा काँट्रॅक्टचा प्रवास सुरू करण्याचा दिवस. राजकीय नेत्यांना त्यांचं टॅलेंट, ज्ञान, कौशल्यं आदींच्या प्रदर्शनासाठी चांगला दिवस. कामाच्या ठिकाणी नवी रिक्रूटमेंट होईल. तुमचं ज्ञान आणि भाषण यांमुळे सर्व जण प्रभावित होतील. आज घेतलेले सर्व निर्णय अनुकूल ठरतील. खासकरून राजकीय नेते, संगीतकार, इलेक्ट्रॉनिक मीडिया, ऑटोमोबाइल बिझनेसमन, लेखक यांच्या बाबतीत हे खरं ठरेल. आज केलेल्या गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळेल. प्रेमात असलेल्यांनी त्यांच्या भावना खुल्या दिलाने व्यक्त कराव्यात. सरकारी अधिकाऱ्यांना सर्व व्यवहारांत नशिबाची साथ मिळेल. गुरूचं नामस्मरण करायला विसरू नका. नशिबाची साथ मिळण्यासाठी पिवळे कपडे घाला. शुभ रंग : Yellow & Orange शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3, 1 दान : महिला मदतनीसाला केशर दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज शक्य तितक्या लवकर आंघोळ करा आणि भगवान शिवशंकराला दुधाचा अभिषेक करून दिवसाची सुरुवात करा. शेती, मॅन्युफॅक्चरिंग, हँडीक्राफ्ट्स, डायरेक्शन, कोचिंग, स्पोर्ट्स आयटेम्स, बँकिंग, सौर ऊर्जा आदी क्षेत्रांत आज पैसे कमावण्याचा दिवस आहे. तुम्हाला शिस्त आणि पर्फेक्शन या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. भविष्याची गरज लक्षात घेऊन बीजारोपण करणं ही आजच्या दिवसातली महत्त्वाची कृती ठरेल. राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रातल्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अत्यंत व्यग्र असेल. वैद्यकीय आणि कृषी क्षेत्रात सकारात्मक बदल दिसतील. विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रगतीसाठी ग्रुप स्टडी करावा किंवा सहकाऱ्यांचं साह्य घ्यावं. आज नॉन-व्हेज आहार घेणं टाळावं. शुभ रंग : Blue शुभ दिवस : शनिवार शुभ अंक : 9 दान : भिकाऱ्यांना कच्ची केळी दान करावीत. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) श्री गणेशाच्या मंदिरात जाऊन हिरवं धान्य अर्पण करून आशीर्वाद मिळवावेत. आजचा दिवस स्मार्टपणे हार्ड वर्क करून नशिबाचा वापर करून घेण्याचा आहे. तुमच्या मॅग्नेटिक पर्सनॅलिटीचा प्रभाव सर्वत्र पडेल. पूर्वीच्या कामगिरीची दखल घेतली जाण्याचा आणि त्याचे लाभ मिळण्याचा दिवस. खेळाडू, डायरेक्टर्स, डिझायनर्स, इंजिनीअर्स, स्टॉकिस्ट, रिटेलर्स, बँकर्स आदींना नशिबाची विशेष साथ मिळेल. सेल्स आणि खासकरून क्रीडा क्षेत्रात असलेल्यांना वेगवान हालचाली अनुकूल ठरतील. विद्यार्थी आज त्यांचं शैक्षणिक यश साजरं करतील. शुभ रंग : Sea Green शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : गायींना हिरवी पानं दान करावीत. #नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) नशिबाचं चक्र आज संधी आणि आर्थिक बाबीच्या दृष्टीने साह्य करील. आजचा दिवस तुमचा आहे. तुम्ही अनेकांच्या प्रगतीचे शिल्पकार ठराल. प्रपोझ करण्यासाठी, कमिटमेंट करण्यासाठी, ऐशोआरामाचा आनंद घेण्यासाठी, समृद्धी मिळवण्यासाठी, प्रवासासाठी, प्रेझेंटेशनसाठी, मास मीडियाला सामोरं जाण्यासाठी, विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. नव्या संधी शोधण्यासाठी आणि कुटुंबासमवेत वेळ व्यतीत करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. व्हिसाची वाट पाहात असलात, तर सकारात्मक घडामोडीमुळे तुम्हाला सुरक्षित वाटेल. नवं मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभारण्यासाठी प्रॉपर्टीच्या शोधात असलेल्यांना चांगला पर्याय उपलब्ध होईल. अभिनेते आणि माध्यम क्षेत्रातल्या व्यक्ती यश साजरं करतील. शुभ रंग : Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : घरगुती मदतनीसाला भांडी दान करावीत. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज शांतता मिळवण्यासाठी ध्यानधारणा टाळू नये. आजचा दिवस बिझी असेल. कायदेशीर प्रकरणांमध्ये तुमचं ज्ञान वापरण्याची गरज आहे. खेळ, कोर्ट-कचेरीची प्रकरणं, बिझनेस डील्स, इंटरव्ह्यूज, स्पर्धा परीक्षा आदींमध्ये यश मिळवणं तुमचे ज्येष्ठ, तसंच पूर्वजांच्या आशीर्वादानेच शक्य आहे. गुरूमंत्राचं पठण करावं. रागावर नियंत्रण ठेवावं. मृदू भाषणामुळे आज सर्व काही जिंकता येईल. तंबाखू, मद्यपानापासून दूर राहून साधा शाकाहार घ्यायला हवा. शुभ रंग : Sea Green शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : मंदिरात तेल दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) मनःशांतीसाठी तुमचं घर, तसंच कामाचं ठिकाण स्वच्छ, नीटनेटकं असणं गरजेचं आहे. महत्त्वाचे निर्णय घेताना भविष्याचा विचार करा आणि लवचिक राहा. यश मिळवण्यासाठी कष्ट करावे लागतील; मात्र तुमचा ब्रँड आणि गुडविलमुळे संध्याकाळपर्यंत तुमचा गौरव होईल. दानधर्म आणि मृदू भाषण या गोष्टींच्या साह्याने आज तुम्हाला नफा होऊ शकतो. डॉक्टर्सना त्यांच्या सेवेबद्दल गौरवलं जाऊ शकतं. पब्लिक फिगर्सना संध्याकाळपर्यंत आर्थिक लाभ मिळतील. दानधर्म आणि व्यायामात वेळ व्यतीत करा. सकाळी उठल्यानंतर तुमच्या ब्लँकेटची घडी करायला विसरू नका. शुभ रंग : Sea Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : भिकाऱ्यांना केरसुणी आणि चपला दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) मास मीडिया आणि राजकीय क्षेत्रातल्या व्यक्तींना आज प्रसिद्धी आणि नशिबाची साथ मिळेल. आज तुमच्या मनात रोमान्स, तसंच कृतज्ञतेची भावना असेल. अचानक पैसे मिळण्याची किंवा यश मिळण्याची शक्यता आहे. सरकारी ऑर्डर्स मिळण्यासाठी प्रयत्न करण्याकरिता उत्तम दिवस. खेळाडू, विद्यार्थी यांनी डॉक्युमेंटेशनसाठी पुढाकार घ्यावा. आजचा दिवस चांगला आहे. हीलर्स, पब्लिक स्पीकर्स, शेफ, माध्यमकर्मी, अभिनेते, सीए, शिक्षक, खेळाडू आणि हॉटेलियर्स यांना नशिबाची मोठी साथ मिळेल. शुभ रंग : Purple शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 3, 9 दान : घरगुती महिला मदतनीसाला लाल बांगड्या दान करा. 4 ऑगस्ट रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : अरबाझ खान, किशोर कुमार, उदयपूर सिंह, शशिकला, विशाल भारद्वाज, श्रुती मर्चंट
First published:

Tags: Astrology and horoscope, Numerology

पुढील बातम्या