Home /News /astrology /

Numerology: मीडिया क्षेत्रातल्या व्यक्तींना आज मिळेल मोठं यश; अंकशास्त्रानुसार असा जाईल तुमचा दिवस

Numerology: मीडिया क्षेत्रातल्या व्यक्तींना आज मिळेल मोठं यश; अंकशास्त्रानुसार असा जाईल तुमचा दिवस

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 31 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 31 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतःलाच मेहनत करावी लागेल. तुमच्या विरोधात काही गोष्टी घडतील; मात्र त्यांकडे दुर्लक्ष करा. प्रॉपर्टी खरेदीसाठी काही अडचणी येतील. तेल, शेतीची अवजारं, मशीन, ट्रॅव्हल एजन्सी, फर्निचर, साहित्य, औषध, ग्लॅमर आणि कापड अशा व्यवसायातल्या व्यक्तींना चांगला परतावा मिळेल. राजकीय व्यक्ती आणि खेळाडूंना करिअरमध्ये नव्या संधी मिळतील. मुलांचं शिक्षक किंवा प्रशिक्षकांकडून कौतुक होईल. शुभ रंग : Sea Green शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 1 दान : कृपया भिक्षेकऱ्यांना गहू दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) दिवस शांततेत जावा यासाठी रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. महिलांनी घरगुती राजकारण टाळण्यासाठी इतर महिलांशी वाद टाळावा. इतर व्यक्ती तुमच्या इच्छा-आकांक्षा दाबण्याचा प्रयत्न करतील. कायदेशीर कमिटमेंट पूर्ण होतील; मात्र तुमच्या प्रतिमेला धक्का पोहोचेल. दुपारच्या जेवणानंतरचा दिवस भाग्याचा असेल. महिलांनी जोडीदाराच्या अति काळजीच्या स्वभावाकडे दुर्लक्ष करणं उत्तम. सरकारी कंत्राट मिळवण्यासाठी जुने संबंध वापराल. एक्सपोर्ट-इम्पोर्ट व्यावसायिक आणि राजकारणी व्यक्तींना मोठं यश मिळेल. शुभ रंग : Sky Blue शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 6 दान : कृपया मंदिरात दोन नारळ दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस हा बाहेर पडून एंजॉय करण्याचा आहे. यामुळे ताण दूर होईल. तुमचं कौशल्य एकाच गोष्टीसाठी वापरून मोठं यश मिळवू शकता. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळेल. तुमचं अभिनय कौशल्य दाखवण्यासाठी उत्तम दिवस. गृहिणी आणि शिक्षक आपल्या संवादकौशल्याच्या माध्यमातून इतरांवर छाप पाडतील. दिग्दर्शक, प्रॉपर्टी ब्रोकर, वकील, संगीतकार आणि लेखकांनी आज घेतलेले सर्व निर्णय त्यांच्या पथ्यावर पडतील. प्रेमात असलेल्यांनी आपल्या मनातल्या भावना बोलून दाखवाव्यात. सरकारी अधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी. आज दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी कपाळावर चंदनाचा टिळा लावायला विसरू नका. तसंच गुरूचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. शुभ रंग : Brown शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3 आणि 1 दान : कृपया गरिबांना ब्राउन राइस दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुम्ही आपल्या निर्णयावर ठाम राहणं गरजेचं आहे. त्याचा भविष्यात फायदा होईल. वारंवार आपलं मत बदलणं टाळा. उत्पादक आणि शेतकऱ्यांनी प्रॉपर्टी खरेदीचा विचार सध्या टाळणं योग्य ठरेल. राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रातल्या व्यक्तींसाठी आज प्रवास करणं फायद्याचं ठरेल. मेडिकल, सॉफ्टवेअर, हस्तकला, मेटल, जाहिरात या क्षेत्रांमध्ये चांगले बदल घडतील. विद्यार्थ्यांना आरामात लक्ष्य साधता येईल. मार्केटिंग क्षेत्रातल्या व्यक्तींचं मासिक टार्गेट पूर्ण होईल. आज कृपया मांसाहार टाळा आणि मेडिटेशन करा. शुभ रंग : Blue शुभ दिवस : शनिवार शुभ अंक : 9 दान : कृपया भिक्षेकऱ्यांना लिंबूवर्गीय फळं दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस सुरुवातीला काहीसा संथ वाटेल; मात्र दुपारनंतर गोष्टी वेगाने घडतील. ग्लॅमर आणि मीडिया क्षेत्रामध्ये आज चांगली प्रगती होईल. वैयक्तिक आयुष्यात रोमान्स आणि कमिटमेंटसाठी भरपूर वाव असेल. भूतकाळात केलेल्या कामाबद्दल कौतुक आणि फायदे मिळवण्याचा आजचा दिवस आहे. एखादी वरिष्ठ व्यक्ती तुम्हाला मदत करण्यासाठी पुढे येईल, ती स्वीकारा. डिझायनर, ब्रोकर, प्रॉपर्टी डीलर, बँकर, खेळाडू आणि राजकीय व्यक्तींसाठी आज भाग्याचा दिवस. सेल्स आणि खेळातल्या व्यक्तींनी आज वेगाने हालचाल करणं फायद्याचं ठरेल. विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळेल. शुभ रंग : Sea Green शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : कृपया अनाथाश्रमात दूध दान करा. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) प्रवास करणाऱ्यांसाठी आज थोडा कठीण दिवस असणार आहे. इतरांसाठी मात्र अगदी ऐशोआरामाचा दिवस असेल. कुटुंबाचं भरपूर प्रेम मिळेल. मुलांसोबत वेळ व्यतीत करण्यासाठी चांगला दिवस. व्हिसा मिळण्याची वाट पाहत असाल, तर आणखी थोडं थांबावं लागेल. नवीन घर किंवा नवीन नोकरीच्या शोधात असाल तर काही चांगले पर्याय समोर येतील; मात्र अंतिम निर्णय ठरण्यास वेळ लागेल. अभिनेते आणि मीडिया क्षेत्रातल्या व्यक्तींना मोठं यश मिळेल. दिवसाच्या उत्तरार्धात तुमच्या मनातल्या किती तरी गोष्टी स्पष्ट होतील. त्यामुळे समाधान वाटेल. शुभ रंग : Blue and Pink शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया गरिबांना दुधाची मिठाई दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्या कम्फर्ट झोनमधून शक्य तेवढ्या लवकर बाहेर पडण्याची गरज आहे. नवीन संधी तुमची वाट पाहत आहे. वकील आणि सीए असणाऱ्या व्यक्ती करिअरमध्ये मोठी झेप घेतील. शिक्षणात आणि खेळात यश मिळवण्यासाठी वडिलधाऱ्या व्यक्तींचे आशीर्वाद कामी येतील. विरुद्धलिंगी व्यक्ती आज तुमच्यासाठी नशीबवान ठरेल. नातेसंबंध अधिक बळकट होतील. आज वाणी मृदू ठेवल्याने भरपूर फायदा होईल. दिवसभरात गुरूमंत्राचा जप करायला विसरू नका. राजकीय व्यक्तींना सभा घेण्यासाठी आणि पक्षातल्या वरिष्ठांवर छाप पाडण्यासाठी उत्तम दिवस. महिलांना शेअर मार्केटमध्ये फायदा होईल. शुभ रंग : Orange शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : कृपया अनाथाश्रमात स्टेशनरी वस्तू दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज मन शांत आणि लवचिक ठेवा. तसंच चांगल्या आरोग्यासाठी व्यायाम करा. भूतकाळातली तुमची मेहनत आता पैशांच्या रूपाने परतावा देईल. आजचा दिवस कामात गुंतलेले असाल. मोठे निर्णय घेताना दोन्ही बाजूंनी विचार करा. तुमचं चांगलं काम आणि भरपूर ओळख यामुळे दिवसाच्या शेवटी भरपूर फायदा होईल. ज्ञानार्जनात आजचा बराचसा वेळ व्यतीत कराल. डॉक्टर्सना सेमिनारमध्ये पुरस्कार मिळतील. पब्लिक फिगर असणाऱ्या व्यक्तींना संध्याकाळपर्यंत भरपूर प्रसिद्धी मिळेल. शुभ रंग : Sea Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया घरातल्या मदतनीसाला तुळशीचं रोप दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) करिअरमध्ये स्वतःची ओळख आणि निर्णयक्षमता मिळवण्यासाठी कठीण दिवस. आज जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होऊ शकतात. प्रॉपर्टी डीलर्स आणि डॉक्टर्सना प्रसिद्धी किंवा अप्रैझल मिळेल. प्रेमात असलेल्यांनी मध्यस्थांपासून सावध राहावं. आजचा दिवस भरपूर वृद्धीचा आणि कौतुक मिळवण्याचा आहे. अचानक धनलाभ संभवतो. प्रमोशनची बोलणी करण्यासाठी, मुलाखत वा ऑडिशन देण्यासाठी, तसंच सरकारी टेंडरचा अर्ज दाखल करण्यासाठी उत्तम दिवस. खेळाडू आणि विद्यार्थ्यांनी आज कागदपत्रांशी संबंधित कामं टाळावीत. गृहिणी, शिक्षक, अभिनेते, सीए, खेळाडू आणि हॉटेल व्यावसायिकांसाठी अत्यंत भाग्याचा दिवस. शुभ रंग : Red and Orange शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 3 आणि 9 दान : कृपया घरगुती कामगारांना किंवा भिक्षेकऱ्यांना डाळिंब दान करा. 31 जुलै रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : कियारा अडवाणी, मुन्शी प्रेमचंद, पी. सी. सरकार ज्युनियर, अराता इजुमी, मुमताज
First published:

Tags: Astrology and horoscope, Numerology

पुढील बातम्या