Home /News /astrology /

Numerology: जन्मतारखेनुसार तुमची रास देते भविष्याचे संकेत; आजचा दिवस कसा असेल? जाणून घ्या

Numerology: जन्मतारखेनुसार तुमची रास देते भविष्याचे संकेत; आजचा दिवस कसा असेल? जाणून घ्या

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 3 ऑगस्ट 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 3 ऑगस्ट 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमची ऊर्जा आणि ज्ञान याकडे आज अनेक जण आकर्षित होतील. तुम्ही तुमचे शिक्षक किंवा प्रशिक्षकांचा सल्ला घ्यायला हवा आणि स्पर्धेत उतरताना त्यांच्यावर अगदी पूर्णतः विश्वास ठेवायला हवा. प्रॉपर्टी विकत घेणं आणि मालमत्तेची विक्री करणं या दोन्ही गोष्टींमध्ये गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता आहे. खेळात विजय मिळण्याची मोठी शक्यता आहे. तंत्रज्ञान, मार्केटिंग, धान्य, बांधकाम, कृषिविषयक पुस्तकं, औषधं आणि फायनान्स या क्षेत्रांतल्या बिझनेसमध्ये चांगली कमाई होईल. कॉस्मेटिक्स, फर्निचर, कपडे, अ‍ॅक्सेसरीज, डेकॉर आदी क्षेत्रांतल्या बिझनेसमध्ये संथ गतीने वाढ होईल. मुलांचं शिक्षक आणि प्रशिक्षकांकडून कौतुक होईल. आज गुरूची प्रार्थना करणं गरजेचं आहे. सकाळी गुरूचं नाव घ्यावं. आज पिवळ्या रंगाचे पदार्थ आहारात ठेवावेत. शुभ रंग : Beige शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3 दान : शाळा किंवा आश्रमात पुस्तकं आणि स्टेशनरीच्या वस्तू दान कराव्यात. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) कागदावरच्या ज्ञानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी चांगला दिवस. स्पर्धेत नक्की उतरा. लीगल कमिटमेंट्स अगदी सहज पूर्ण केल्या जातील. तुमची एखाद्या अशा व्यक्तीशी भेट होऊ शकेल, की जी तुमच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचवू शकेल. त्यामुळे सावधगिरी बाळगा. महिलांनी वरिष्ठ सदस्यांना सहकार्य करावं. तुमच्या जुन्या ओळखींचा उपयोग करून सरकारी काँट्रॅक्ट मिळवण्याचा आजचा दिवस आहे. सायंटिस्ट्स, लेखक, फोटोग्राफर्स, डॉक्टर्स, एक्स्पोर्ट-इम्पोर्ट बिझनेस आणि राजकीय क्षेत्रात असलेल्या व्यक्ती नवी उंची गाठतील. शुभ रंग : Sky Blue शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 6 दान : मंदिरात दूध किंवा तेल दान करावं. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुम्हाला शक्य असेल तितकं सोशलायझेशन करा आणि मोठं नेटवर्क उभं करा. ते तुम्हाला इंडस्ट्रीत चांगला ब्रँड म्हणून उभं करण्यासाठी जादूसारखं काम करील. नवी रिक्रूटमेंट होण्याची शक्यता आहे. तुमचं ज्ञान आणि संभाषण यांमुळे लोक प्रभावित होतील. आज घेतलेले आर्थिक क्षेत्राशी संबंधित असलेले निर्णय सुधारण्याची गरज भासेल. शांतता मिळवायची असेल, तर खरेपणा सोडू नका. प्रेमात असलेल्यांनी आपल्या भावना खुल्या दिलाने व्यक्त कराव्यात. सरकारी अधिकाऱ्यांना सर्व व्यवहारांमध्ये नशिबाची साथ मिळेल. दिवसाची सुरुवात करताना गुरूचं नाव घ्यायला आणि कपाळावर चंदन लावायला विसरू नका. शुभ रंग : Orange शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3, 1 दान : महिला मदतनीसाला लाल धागा दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) दुःख, वेदनेचं कारण आज दूर करणं आणि पुढे जाणं गरजेचं आहे. आज टाइम मॅनेजमेंटमध्ये पर्फेक्शन असणं गरजेचं आहे. त्यामुळे अपॉइंटमेंट्ससाठी तयारी करा. भविष्यासाठी आज बीजारोपण करणं गरजेचं आहे. खासकरून राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रात असलेल्यांसाठी आजचा दिवस प्रवासासाठी अनुकूल नाही. बांधकाम किंवा स्टॉक मार्केट बिझनेसमध्ये संथ हालचाली दिसतील; मात्र मॅन्युफॅक्चरर्स, मीडिया, प्रिंटिंग, मेडिकल आणि कृषी क्षेत्रात सकारात्मक बदल दिसतील. विद्यार्थ्यांनी त्यांची धोरणं कागदावर लिहून काढावीत. कारण त्याचा त्यांना ध्येयनिश्चितीसाठी उपयोग होईल. मार्केटिंग क्षेत्रातल्या व्यक्ती त्यांचं महिनाअखेरीचं टार्गेट पूर्ण करू शकतील. आज मांसाहार करणं टाळा. शुभ रंग : Blue शुभ दिवस : शनिवार शुभ अंक : 9 दान : भिकाऱ्यांना गहू दान करणं आवश्यक आहे. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस मित्र आणि कुटुंबीयांना मदत देऊ करण्याचा आहे. जुन्या कामगिरीची दखल घेतली जाण्याचा आणि त्याचे फायदे मिळण्याचा आजचा दिवस आहे. गॅदरिंगसाठी बाहेर जाणं किंवा ऑडिशनला उपस्थित राहण्याची खूप मोठी शक्यता आहे. बँकर्स, डिफेन्स ऑफिसर्सना नशिबाची खास साथ मिळेल. सेल्स आणि खासकरून क्रीडा क्षेत्रात असलेल्यांना वेगवान हालचाली अनुकूल असतील. विद्यार्थी त्यांचं शैक्षणिक यश साजरं करतील. शुभ रंग : Sea Green शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : हिरव्या पालेभाज्या दान कराव्यात. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) सध्याच्या परिस्थितीबद्दल अति विचार करणं आज टाळा. कारण नजीकच्या भविष्यात गिफ्ट्स आणि रिवॉर्ड्स मिळणार आहेत. तुमच्या आयुष्यात भरपूर पैसा आहे. त्यामुळे आनंदी राहा. तुमच्या खांद्यावर अनेक जबाबदाऱ्या असल्या, तर अन्य सदस्यांशी त्या वाटून घ्यायला हव्यात. गृहिणी, स्टॉकिस्ट्स, सरकारी अधिकारी, डिफेन्स ऑफिसर्स, पायलट्स, ज्वेलर्स, अभिनेते, जॉकी, डॉक्टर्स आदींसाठी आजचा दिवस लकी आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या कौशल्यांचं प्रदर्शन करावं. तुमच्या मूळ गावी गॅदरिंग किंवा सोहळ्याला उपस्थित राहाल. मित्र, कुटुंबीयांना भेटून आनंद होईल. शुभ रंग : Blue & Sea Green शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : आश्रमात पांढरं पीठ किंवा मीठ दान करावं. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज घेतलेले सर्व निर्णय पर्फेक्ट आणि भविष्यासाठी लकी ठरतील. तोट्यासाठी कारणीभूत असलेल्या कारणांचं निवारण करणं गरजेचं आहे. कामाच्या ठिकाणी ज्येष्ठ व्यक्ती किंवा बॉसशी चर्चा करणं टाळा. कपल्समधल्या रिलेशनशिपला ज्येष्ठांचे आशीर्वाद मिळतील, ती रिलेशनशिप बहरेल. मध्यस्थांवर आज आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. हीलिंग, मोटिव्हेशन, ऑकल्ट सायन्स, आध्यात्मिक स्कूल्स, शेती, धान्य आदी क्षेत्रांतल्या व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्तम आहे. तुम्ही भावनिक नसाल, तोपर्यंत बिझनेस रिलेशन्स हेल्दी असतील. शुभ रंग : Orange & Blue शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : घरगुती मदतनीसाला धातूचं भांडं भेट द्या. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) सकारात्मक कर्मांचं मूल्य वाढण्यासाठी आश्रमात आणि प्राण्यांसाठी नियमितपणे दानधर्म करत राहणं गरजेचं आहे. अ‍ॅटिट्यूडमधला ताठरपणा विसरून आज प्रमोशन किंवा अप्रैझलसाठी वरिष्ठांकडे जाण्याचा दिवस आहे. तुमच्यासोबत काम करणारा एक वरिष्ठ तुमच्यासाठी मार्गदर्शकासारखा आहे. त्याच्या सूचना ऐकल्या पाहिजेत. बिझनेसमधले व्यवहार यशस्वी होतील, पण दुपारच्या जेवणानंतर. करार किंवा इंटरव्ह्यू आज यशस्वी होतील. कुटुंबीयांसोबत वेळ व्यतीत केल्यास आज समृद्धी येईल. आज आध्यात्मिक भावना वाढवावी आणि प्रेमसंबंधांत विश्वास ठेवावा. शुभ रंग : Blue & Brown शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : गायींना हिरवे पदार्थ खाऊ घाला. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) क्रिएटिव्ह आर्टिस्ट्सना आज नशिबाची उत्तम साथ मिळेल आणि संधीही मिळेल. क्रिएटिव्ह आर्ट, टीचिंग, कायदा, समुपदेशन आणि फायनान्स क्षेत्रातल्या व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्तम असेल. प्रॉपर्टी डीलर्स आणि कलाकारांसाठी आजचा दिवस खूप आशादायी आहे. जुने मित्र किंवा सहकाऱ्यांना भेटल्यास बिझनेस किंवा जॉबमध्ये अधिकारपद मिळू शकतं. चांगला प्रतिसाद वाट पाहतो आहे. दिवसाची सुरुवात करताना लाल रंगाचे कपडे घालावेत. तुमच्या लग्नाचा प्लॅन कुटुंबीयांशी शेअर करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. त्यांचा पाठिंबा मिळाल्यास भविष्यातली वाटचाल सुकर होईल. रागावर नियंत्रण मिळवा आणि आहारात पालेभाज्या, तसंच आंबट भाज्यांचा समावेश करा. शुभ रंग : Orange शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9, 6 दान : गरिबांना कलिंगड दान करा. 3 ऑगस्ट रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : भारती सिंग, हरभजन सिंग, अमित कुमार, तिग्मांशू धुलिया, हंसराज हंस
First published:

Tags: Astrology and horoscope, Numerology

पुढील बातम्या