मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology: तुमची जन्मतारीख देते भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचे संकेत; अंकशास्त्रानुसार जाणून घ्या आजच भविष्य

Numerology: तुमची जन्मतारीख देते भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचे संकेत; अंकशास्त्रानुसार जाणून घ्या आजच भविष्य

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 29 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 29 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 29 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 29 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज एखाद्या मोठ्या ग्रुपसोबत असलेले व्यावसायिक संबंध फायद्याचे ठरतील. नवीन मार्गदर्शकाची भेट होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस शॉपिंग, काँट्रॅक्ट, कौटुंबिक कार्यक्रम, छोटीशी सहल किंवा मुलाखतीची तयारी यामध्ये जाईल. वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये काहीसा अविश्वास असेल. क्लायंट किंवा नातेवाईकाचा विश्वास जिंकून त्यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी चांगला दिवस. आज डिप्लोमॅटिक न राहता, मनातल्या गोष्टी स्पष्टपणे बोला. नवीन गुंतवणुकीमध्ये फायदा होईल. सोलर एनर्जी, इलेक्ट्रॉनिक्स, लिक्विड्स, शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातल्या व्यक्तींना चांगला परतावा मिळेल. आज जेवणात पिवळ्या गोड पदार्थांचा आवर्जून समावेश करा.

शुभ रंग : Creme

शुभ दिवस : रविवार

शुभ अंक : 3

दान : कृपया मंदिरात मोहरीचं तेल दान करा.

#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

लग्नासारख्या एखाद्या कायमस्वरूपी नात्याची सुरुवात करण्यासाठी, शॉपिंगसाठी किंवा प्रवास करण्यासाठी उत्तम दिवस. सरकारी कंत्राट मिळवण्यासाठी चांगला दिवस. वैयक्तिक आयुष्यात डिप्लोमॅटिक राहिल्याने फायदा होईल. जवळच्या व्यक्तींसोबत भावनिक वेळ व्यतीत कराल. तुमच्या भविष्याबाबतच्या काही योजना आता सत्यात उतरत आहेत. त्यामुळे आनंदी असाल. आज आकाशी रंगाचे कपडे घातल्याने मुलाखत, ऑडिशन, प्रेझेंटेशन, स्पर्धा आणि सेमिनार या ठिकाणी फायदा होईल. मित्र आणि बॉसच्या पाठिंब्यामुळे मोठं यश मिळेल.

शुभ रंग : Peach

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 2

दान : कृपया गायींना आणि भिक्षेकऱ्यांना अन्न दान करा.

#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज मौखिक संवादाच्या माध्यमातून व्यक्त होण्याचा दिवस आहे. तुमच्या प्रशिक्षकावर विश्वास ठेवा आणि त्याने दिलेला सल्ला पाळा. आज फापटपसारा टाळून केवळ सत्य आहे तेच बोलल्याने फायदा होईल. मित्रांवर छाप पाडण्यासाठी उत्तम दिवस. उच्च शिक्षण, डान्सिंग, कुकिंग, डिझायनिंग, अभिनय किंवा ऑडिटिंग क्षेत्रातल्या व्यक्तींना आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. फायनान्स क्षेत्रातल्या व्यक्ती, वैज्ञानिक, राजकीय व्यक्ती, लेखक, पेंटर यांना आर्थिक फायदा होईल.

शुभ रंग : Pink

शुभ दिवस : गुरुवार

शुभ अंक : 3 आणि 9

दान : कृपया मंदिरात कुंकू दान करा.

#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

बराचसा गोंधळ दूर झाल्यामुळे निश्चिंत वाटेल. आजचा दिवस नवीन योजना तयार करण्याचा आणि त्यावर अंमलबजावणी करण्याचा आहे. जास्त ताण घेणं टाळा. क्लायंटसमोर प्रेझेंटेशन उत्तम होईल. त्यासाठी कौतुकही होईल. आजचा दिवस समुपदेशन आणि मार्केटिंग करण्यामध्ये व्यग्र असाल. मशिनरीसोबत काम करत असाल, तर ती मशीन्स अद्ययावत करण्याची वेळ आली आहे. वैयक्तिक नातेसंबंध सुरळीत राहतील. आज मित्रांसोबत काही वेळ व्यतीत कराल. केशरयुक्त मिठाई खाल्ल्याने फायदा होईल.

शुभ रंग : Blue

शुभ दिवस : मंगळवार

शुभ अंक : 6

दान : कृपया गरिबांना हिरवं धान्य दान करा.

#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज अगदी भाग्याचा आणि स्थैर्याचा दिवस आहे. कोणताही निर्णय घेताना भावनिक होऊ नका. आज केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल. मीटिंगमध्ये अ‍ॅक्वा रंगाचे कपडे घातल्याने फायदा होईल. मुलाखत किंवा प्रपोझल दुपारच्या जेवणापूर्वी करणं फायद्याचं ठरेल. प्रॉपर्टीसंबंधी निर्णयदेखील तुमच्या पथ्यावर पडतील. प्रवासाची आवड असणाऱ्यांना विदेशात जाण्याची संधी मिळू शकते. खाण्या-पिण्याच्या बाबतीत आज खबरदारी घेणं गरजेचं आहे. एखाद्या जुन्या मित्राची किंवा मार्गदर्शकाची बेट होईल. याचा भविष्यात फायदा होईल.

शुभ रंग : Green

शुभ दिवस : बुधवार

शुभ अंक : 5

दान : कृपया अनाथांना हिरवी फळं दान करा.

#नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आजचा दिवस हा ऐशोआरामाचा, आनंदाचा आणि समाधानाचा आहे. शुक्र ग्रहाच्या कृपेमुळे भरपूर प्रसिद्धी आणि समाधान लाभेल. कुटुंबातले सदस्य, नातेवाईक, सहकारी, मित्र आणि प्रशंसक अशा सर्वांचा तुम्हाला पाठिंबा मिळेल. आज जोडीदारासोबत वेळ व्यतीत कराल. ऑफिसमध्ये प्रमोशन किंवा अप्रैझलबाबत सकारात्मक चर्चा होईल. बिझनेसमध्ये तुम्ही घेतलेले निर्णय फायद्याचे ठरतील. सौंदर्यप्रसाधनं, महागड्या वस्तू, वाहन, घर, मशिनरी किंवा दागिने खरेदीसाठी उत्तम दिवस. शेअर मार्केटमधली गुंतवणूक फायद्याची ठरेल. संध्याकाळी एखादी रोमँटिक डेट होईल, ज्यामुळे तुमचा संपूर्ण आठवडा आनंदी होईल.

शुभ रंग : Aqua

शुभ दिवस : शुक्रवार

शुभ अंक : 6

दान : कृपया अनाथाश्रमात किंवा गायींना दूध दान करा.

#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज तुमची सर्व कामं वेळेवर पूर्ण होतील. पैशांच्या आणि जमिनीच्या व्यवहारांबाबत वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला आवर्जून घ्या. आज जोडीदार किंवा क्लायंटसमोर कोणतीही तडजोड करू नका. स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहा. बिझनेस डील वेळेवर पूर्ण होतील. वकील आणि आयटी क्षेत्रातल्या व्यक्तींना मोठं यश मिळेल. विवाहासाठी अनुरुप प्रस्ताव येतील. आज भगवान शंकराच्या मंदिरात अभिषेक केल्याने फायदा होईल. तसंच, केतू पूजा आणि अभिषेक फायद्याचा ठरेल. सकाळच्या वेळी गुरुमंत्राचा जप करा.

शुभ रंग : Sea Green

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 7

दान : कृपया गरिबांना पिवळा भात दान करा.

#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

एखाद्या ठिकाणी अडकून राहिल्यासारखं वाटत असेल, तर तुमच्या ओळखीचा फायदा घेऊन त्या परिस्थितीतून बाहेर पडा. तुमचा उदार स्वभाव आणि हुशारी याची लोकांवर चांगली छाप पडते. बिझनेस डील सुरळीत पार पाडण्यासाठी कुटुंबाची ओळख आणि संवाद कौशल्य या दोन्हीचा फायदा होईल. डॉक्टर, वैज्ञानिक, सरकारी अधिकारी, मेटल उत्पादक आणि सॉफ्टवेअर इंजिनीअर असणाऱ्या व्यक्तींना गुंतवणुकीसाठी चांगली संधी आहे. विद्यार्थ्यांनी परदेशात शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करावा. यासाठी भरपूर फी असली, तरी भविष्यात होणारा फायदा आणि आपलं ध्येय हेदेखील विचारात घ्यावं. आज दिवसाच्या शेवटी आर्थिक फायदा होईल. प्रवासाचे बेत टाळावेत. वृद्धाश्रमात जाऊन दानधर्म किंवा सेवा करणं गरजेचं आहे.

शुभ रंग : Sea Blue

शुभ दिवस : शनिवार

शुभ अंक : 6

दान : कृपया गरजूंना चपला दान करा.

#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज तुमचा अहंकार किंवा राग बाजूला ठेवणं गरजेचं आहे. कामाच्या ठिकाणी सर्वांशी मिसळून राहिल्याने फायदा होईल. नवीन जागा, नवीन घर, नवीन नातेसंबंध, जमीनखरेदी किंवा उच्च शिक्षण या सर्व गोष्टींसाठी आज उत्तम दिवस आहे. प्रेमात असलेल्यांनी आपल्या जोडीदाराला प्रपोझ करावं. राजकारण, मीडिया, क्रीडा, फायनान्स किंवा शिक्षण क्षेत्रातल्या व्यक्तींना मोठं यश मिळेल. तरुण सरकारी अधिकाऱ्यांना लोकांसमोर बोलण्याची संधी मिळेल. डिझायनिंग क्षेत्रातल्या व्यक्तींनी आज मुलाखत किंवा स्पर्धा परीक्षा देणं फायद्याचं ठरेल. पालकांना आपल्या मुलांचा अभिमान वाटेल. आज मन शांत ठेवा. तुमचा बिझनेस पार्टनर किंवा टीममधला सदस्य भविष्यात तुमच्याविरोधात जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे विश्वास कायम ठेवा.

शुभ रंग : Orange

शुभ दिवस : मंगळवार

शुभ अंक : 9

दान : कृपया मंदिरात कुंकू दान करा.

29 जुलै रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : अनुप जलोटा, संजय दत्त, एली अवराम, मयूर मेहता, मनमीत सिंग

First published:

Tags: Astrology and horoscope, Numerology

पुढील बातम्या