मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology : जन्मतारखेनुसार 28 जुलैचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? अंकशास्त्रानुसार जाणून घ्या भविष्य

Numerology : जन्मतारखेनुसार 28 जुलैचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? अंकशास्त्रानुसार जाणून घ्या भविष्य

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 28 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 28 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 28 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 28 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आजचा दिवस तुमचाच आहे. आज तुमचं तेज अगदी सूर्याप्रमाणे राहील. नेतृत्वगुण दाखवण्याची संधी चांगली संधी मिळेल. इतर ब्रँडसोबत कोलॅबरेट करण्यासाठी, भाषणासाठी, संपत्तीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि जवळच्या एखाद्या व्यक्तीजवळ आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी चांगला दिवस. टार्गेट पूर्ण करण्यासाठी आणि पैसे कमावण्यासाठी तुमचे आधी प्रस्थापित केलेले संबंध उपयोगी होतील. आज यश मिळवण्यासाठी गणपती आणि सूर्यदेवाचे आशीर्वाद घेणं गरजेचं आहे. खेळाडूंना मोठं यश मिळेल. महिला आपली मृदू वाणी आणि स्वयंपाक कौशल्यातून इतरांवर छाप पाडतील. सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने फायदा होईल.

शुभ रंग : Yellow and Blue

शुभ दिवस : रविवार आणि सोमवार

शुभ अंक : 1

दान : कृपया मंदिरात तांब्याचा ग्लास किंवा कलश दान करा.

#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

मेडिटेशन किंवा हीलिंग क्षेत्रातल्या व्यक्तींसाठी उत्तम दिवस. आज दिवसाच्या सुरुवातीला भगवान शंकराला दुधाचा अभिषेक केल्याने फायदा होईल. कामाच्या ठिकाणी डिप्लोमॅटिक बोलणी कामी येतील. मुलांसोबत आणि नातेवाईकांसोबत वेळ व्यतीत करण्यासाठी उत्तम दिवस. आज केलेल्या गुंतवणुकीवर सर्वसाधारण परतावा मिळेल. लिक्विड्स, इलेक्ट्रॉनिक्स, मेडिसिन, एक्स्पोर्ट-इम्पोर्ट, सोलर एनर्जी, शेती, केमिकल्स अशा क्षेत्रांमध्ये असलेल्या व्यक्तींना नफ्यासंबंधी एखादी खास बातमी मिळेल.

शुभ रंग : Blue and White

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 2

दान : कृपया गरिबांना गोड दही दान करा.

#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुमच्यात भरपूर आत्मविश्वास भरलेला आहे, त्यामुळे तुम्हाला लवकरच मोठं यश मिळेल. दिवसाची सुरुवात आईचा आणि गुरूचा आशीर्वाद घेऊन करा. विद्यार्थ्यांना आज मोठं यश मिळेल. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल; मात्र तुमच्या मार्गदर्शकाचे त्यासाठी नक्की आभार माना. लेखी संवादाच्या माध्यमातून जोडीदारावर छाप पाडाल. तुमचा प्रियकर वा प्रेयसीला लग्नाची मागणी घालण्यासाठी उत्तम दिवस. खेळाडूंना जुन्या प्रशिक्षकाच्या मदतीने स्पर्धेत यश मिळेल. राजकीय व्यक्ती किंवा सरकारी अधिकारी लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतील. महिलांनी पिवळ्या रंगाचे पदार्थ बनवून ते कुटुंबीयांना खायला द्यावेत. यामुळे गुरू ग्रहाची शक्ती वाढेल.

शुभ रंग : Orange

शुभ दिवस : गुरुवार

शुभ अंक : 3 आणि 1

दान : कृपया मंदिरात चंदनाचं खोड दान करा.

#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज नशीब तुमच्या बाजूने असेल. मनातले संभ्रम दूर होतील. आज अगदी योग्य नियोजनामुळे कामं चांगल्या रीतीने पार पडतील. आज केलेली आर्थिक गुंतवणूक स्वतःपुरती मर्यादित ठेवा. त्याबाबत कोणालाही माहिती देऊ नका. आजचा बराचसा वेळ कागदपत्रांची पडताळणी करण्यात व्यतीत करणं उत्तम. एक्स्पोर्ट-इम्पोर्ट व्यवसायात असलेल्या व्यक्तींनी विशेष खबरदारी घ्यावी. तसंच इतरांचे सल्ले ऐकणं टाळावं. वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये संवादावर लक्ष द्या. तुमच्यामुळे एखादी जवळची व्यक्ती दुखावली जाण्याची शक्यता आहे. आज लिंबूवर्गीय पदार्थ खाल्ल्याने फायदा होईल. तसंच व्यायाम करणंही गरजेचं आहे.

शुभ रंग : Blue

शुभ दिवस : मंगळवार

शुभ अंक : 9

दान : कृपया प्राण्यांना खारवलेले पदार्थ दान करा.

#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज ऐशोआरामासाठी पैसे खर्च कराल. वैयक्तिक आयुष्य आणि कामाच्या ठिकाणी वृद्धी आणि विकास होईल. तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वामुळे इतरांवर चांगली छाप पाडाल. तुमच्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेणं टाळा. मित्रांसोबत किंवा नातेवाईकांसोबत असताना व्यावहारिक आणि उदार राहा. ग्लॅमर, बांधकाम, मीडिया, फॉरीन कमोडिटी आणि क्रीडा क्षेत्रातल्या व्यक्तींना विशेष अप्रेझल मिळेल. मीटिंगमध्ये शेवाळी रंगाचे कपडे घातल्याने फायदा होईल. प्रॉपर्टी संबंधी निर्णय तुमच्या बाजूने लागतील. खेळात मोठं यश मिळेल. आज कृपया मांसाहार आणि मद्यपान टाळा.

शुभ रंग : Green

शुभ दिवस : बुधवार

शुभ अंक : 5

दान : कृपया अनाथाश्रमात तुळशीचं रोप दान करा.

#नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

खासगी नातेसंबंधांमध्ये काही तणावाचं वातावरण आहे; मात्र वेळ जाईल तशी परिस्थिती सुधारेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. पालकांनी आपल्या पाल्यांप्रति असणारा पझेसिव्हनेस सोडायला हवा. तुम्हाला तुमच्या मुलांचा अभिमान वाटेल. कुटुंबातले सदस्य, नातेवाईक, मित्र आणि सहकाऱ्यांची साथ मिळेल. ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन देणं, डीलिंग, मार्केटिंग, मीटिंग आणि होस्टिंग अशा विविध गोष्टींमध्ये आजचा वेळ जाईल. सरकारी टेंडरमध्ये रिस्क घेणं फायद्याचं ठरेल. नशीब तुमच्या बाजूने आहे. कपडे, वाहन, ज्वेलरी, घर, मोबाइल या गोष्टींची खरेदी करण्यासाठी उत्तम दिवस. समुपदेशन, हीलिंग, रिव्ह्यू यांना उपस्थित राहणं योग्य ठरेल. एखादी छोटी सहल प्लॅन करण्यासाठी चांगला दिवस. आज शेअर मार्केटमध्ये केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल.

शुभ रंग : Aqua

शुभ दिवस : शुक्रवार

शुभ अंक : 6

दान : कृपया अनाथाश्रमात साखर दान करा.

नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुमच्या ओळखी आणि समाजातली तुमची प्रतिमा यामुळे तुम्हाला यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. वकील आणि राजकीय व्यक्तींनी आपल्या योजना कोणालाही सांगू नयेत. आयुष्यात काही चढ-उतार येतील, हुशारीने वागणं गरजेचं आहे. एखाद्या लहान ब्रँडकडून किंवा विरुद्धलिंगी व्यक्तीकडून येणारी संधी सोडू नका. पैशांची योग्य बचत करण्यासाठी वकिलाचा सल्ला घेणं फायद्याचं ठरेल. विवाहाचे प्रस्ताव आज नक्की होतील. भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन अभिषेक केल्याने समाधान लाभेल.

शुभ रंग : Yellow

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 7

दान : कृपया मंदिरात पिवळ्या मोहरीचं तेल दान करा.

#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज प्रेमात असलेल्यांसाठी भाग्याचा दिवस आहे. दिलेल्या कमिटमेंट्स पूर्ण केल्यामुळे मोठं यश मिळेल. कोणतंही डील यशस्वी करण्यासाठी तुमची हुशारी आणि पैशांचा योग्य वापर करा. कायदेशीर प्रकरणांमध्येही पैसा किंवा प्रभावी व्यक्तीच्या मदतीने यश मिळेल. बिझनेस डील पूर्ण करण्यासाठी ओळखी कामी येतील. तुमच्या पैशांची जोडीदारावर चांगली छाप पडेल. विद्यार्थांनी आपल्या ध्येयासाठी वेळ देणं गरजेचं आहे. आज तुम्ही घ्याल ते सर्व निर्णय पथ्यावर पडतील. खेळाडूंसाठी भाग्याचा दिवस. आज दानधर्म करणं गरजेचं आहे.

शुभ रंग : Sea Green

शुभ दिवस : शनिवार

शुभ अंक : 6

दान : कृपया गरजूंना चपला दान करा.

#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

संवाद कौशल्यात तुमची बरोबरी कोणीच करू शकत नाही. त्यामुळे पब्लिक फिगर असणाऱ्या व्यक्तींना आज भरपूर प्रसिद्धी मिळेल. सरकारी टेंडर, प्रॉपर्टी डील, डिफेन्स कोर्स, मेडिकल कोर्स अशा गोष्टींचं डॉक्युमेंटेशन आरामात पार पडेल. ग्लॅमर, सॉफ्टवेअर, गूढविद्या, संगीत, मीडिया आणि शिक्षण क्षेत्रांतल्या व्यक्तींना प्रसिद्धी मिळेल. तरुण राजकीय नेते आणि कलाकारांना नवीन संधी मिळतील. आजचा दिवस भाषण देण्यासाठी, मुलाखतींसाठी किंवा स्पर्धा परीक्षा देण्यासाठी उत्तम आहे. संगीतकार व्यक्तींच्या पालकांना आपल्या मुलांचा अभिमान वाटेल. डॉक्टर आणि सर्जन असलेल्या व्यक्तींना पुरस्कार मिळेल. प्रवासाचे बेत यशस्वी ठरतील.

शुभ रंग : Orange

शुभ दिवस : मंगळवार

शुभ अंक : 9

दान : कृपया लहान मुलांना सफरचंद दान करा.

28 जुलै रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : हुमा कुरेशी, दलकीर सलमान, आयेशा झुल्का, कासू ब्रह्मानंद रेड्डी, कृष्णा वामसी

First published:

Tags: Astrology and horoscope, Numerology

पुढील बातम्या