मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology: अंकशास्त्रानुसार ही जन्मतारीख असणाऱ्या लोकांना आजचा दिवस शुभ; काय आहे तुमचं भविष्य?

Numerology: अंकशास्त्रानुसार ही जन्मतारीख असणाऱ्या लोकांना आजचा दिवस शुभ; काय आहे तुमचं भविष्य?

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 27 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 27 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 27 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 27 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमची अनेक महत्त्वाची कामं पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. तुम्ही कार्यक्रमांमध्ये जा, स्टेजवर जा आणि माइक हातात घ्या. तुमच्या भाषण करण्याच्या अनोख्या शैलीमुळे इतरांवर जबरदस्त छाप पडेल. व्यवसाय उद्योगामध्ये नवीन संबंध प्रस्थापित करण्यावर भर द्या. प्रेमी जोडप्यांमधलं प्रेम वाढेल. कलाकार, डान्सर्स, सौरऊर्जेशी संबंधित उत्पादनं विकणारे, लेखक, सरकारी अधिकारी, डॉक्टर, संगीतकार आणि ग्लॅमर उद्योगाशी संबंधित लोकांना भरपूर लोकप्रियता मिळेल. शुभ रंग : Orange शुभ दिवस : रविवार आणि मंगळवार शुभ अंक : 1 आणि 9 दान : गरिबांना संत्री दान करा #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमचं काम आणि कारकिर्दीत चांगलं यश मिळत असल्याने अनेकांचा जळफळाट होत आहे. त्यामुळे त्यांच्या टीकेकडे दुर्लक्ष करा. त्यामुळे तुमच्या भावनांवर नियंत्रण मिळवा आणि इतरांना गरज नसली तरी मदत करणं सोडा. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या मदतीने यशस्वी व्हाल. कुठल्याही गोष्टीत फेरफार करणं हा तुमचा स्वभाव नाही. त्यामुळे तुमच्या स्वभावाला आवर घाला. तुमची मुलं आणि नातेवाईकांबरोबर वेळ घालवा, कौटुंबिक कार्यक्रमांना हजेरी लावा, एखादी छोटी ट्रिप प्लॅन करा, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा आणि तुमच्या जोडीदाराला एखादं सरप्राइज द्या. गुंतवणुकीत भागीदारी करा आणि तुमचा व्यवसाय वाढवा. तुम्ही जर कोणतीही तक्रार केली नाहीत, तर नात्यातील रोमान्सची अगदी भरभराट होईल. शुभ रंग : Pink शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 दान : भिकाऱ्यांना दही दान करा नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस भरपूर कामाचा आहे आणि त्याचबरोबर तुमच्या कौशल्यांनाही दाद मिळण्याचा आहे. अध्यात्म आणि ज्ञानात वाढ होण्यासाठी प्रवास करण्याची वेळ आहे. आध्यात्मिक समुपदेशन हा तुम्ही करियरचा पर्याय म्हणून विचार करायला हरकत नाही. गायक, कोच, शिक्षणतज्ज्ञ, राजकीय व्यक्ती आणि वकिलांसाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम आणि छाप पाडण्याचा आहे. कपडे, दागिने, पुस्तकं, काही सजावटीचं सामान, धान्य खरेदी करण्याचा किंवा प्रवासाचं बुकिंग करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. डिझायनर्स, हॉटेल व्यावसायिक, अँकर्स, लाइफ आणि स्पोर्ट कोच आणि वित्तपुरवठा करणारे, संगीतकार यांना आज भरघोस यश मिळणार आहे. थोडीशी हळद खाऊन तुमचा आजचा दिवस सुरू करा. शुभ रंग : Red शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3 आणि 9 दान : देवळात चंदन दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) व्यावसायिक प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. व्यावसायिक करार किंवा सरकारी ऑर्डर उशिराने मिळतील. आजच्या दिवशी पैशांशी संबंधित कोणतेही निर्णय घेतल्यास त्यामध्ये खूप अडथळे येऊ शकतात. सेल्स कर्मचारी, आयटी क्षेत्रातले कर्मचारी, थिएटर कलाकार किंवा अभिनेते, टीव्ही अँकर्स आणि डान्सर्स यांनी आज मुलाखतींसाठी जरूर अर्ज करावा. आज त्यांना भरपूर फायदा होण्याची पुष्कळ शक्यता आहे. बांधकाम साहित्याचे उत्पादक, धातू आणि कापड उत्पादक यांनी व्यवसायातल्या संधी आधीच ओळखाव्यात. चांगल्या आरोग्यासाठी पालेभाज्या खा. शुभ रंग : Purple शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : मित्राला मनीप्लँट दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्यासारखा स्वभाव असणाऱ्यांबरोबर मिसळताना अ‍ॅटिट्यूड बाजूला ठेवा आणि इतरांवर विश्वास ठेवायला सुरुवात करा. खूप काळापासूनची एखादी समस्या सोडविण्यासाठी तुम्हाला तुमचे कुटुंबीय आणि मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आर्थिक फायदा सर्वसामान्यच राहील; पण आयात-निर्यातीमध्ये गुंतवणूक केल्यास त्याचा परतावा मिळू शकेल. तुम्हाला तुमचे डोळे उघडे ठेवायची गरज आहे. तुमच्या कुटुंबाकडून मिळणाऱ्या आदराबद्दल तुम्ही त्यांचे आभार माना. शेअर मार्केट, स्पोर्ट्स, इव्हेंट्स, स्पर्धा परीक्षा आणि मुलाखतींसाठी आज नक्की प्रयत्न करा. आज तुमचा जोडीदार फक्त तुमचाच असणार आहे. शुभ रंग : Green and Orange शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : जनावरांना किंवा अनाथश्रमात दूध दान करा. नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) छोटी किंवा मोठी कोणतीही संधी असली तर तिचा फायदा घ्या. ती भविष्यासाठी उपयुक्त ठरेल. आजचा दिवस अत्यंत आरामदायी आहे. आजचा दिवस तुमच्या आयुष्यात आनंद आणि परिपूर्णता आणेल. व्यवसाय-उद्योगातल्या क्लायंट्सच्या समस्या सोडविण्याचा आजचा दिवस आहे. तसंच आजचा दिवस डिनर आणि शॉपिंगला जाण्यासाठीचाही आहे. गृहिणी, शेफ, विद्यार्थ्यांना आज त्यांच्या प्रगतीच्या दृष्टीने नवीन काम मिळू शकेल. रोमँटिक नात्यामुळे घरात आनंद परत येईल. शुभ रंग : Violet शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : देवळात चांदीचं नाणं दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) कोणताही वैयक्तिक मोठा निर्णय घेण्याआधी तुम्ही तुमच्या पालकांचा सल्ला आणि मान्यता द्या. तुम्हाला देण्यात आलेलं आव्हान स्वीकारा. कारण तुमच्या शहाणपणामुळे तुम्ही सगळ्यावर मात करणार आहात. आई आणि अन्य ज्येष्ठांच्या सूचनांकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. आज तुम्हाला एखादी समस्या कदाचित खूप मोठी वाटत असेल; पण ती लवकर नाहीशी होणार आहे. तुम्हाला कदाचित कोणी तरी खाली खेचण्याचा प्रयत्न करील; पण त्यात ते यशस्वी होणार नाहीत. ज्वेलरी व्यवसायात असलेले, वकील, कुरिअर सर्व्हिसेसमध्ये असलेले, वैमानिक, राजकारणी, थिएटर आर्टिस्ट, सीएस, सॉफ्टवेअरमधल्या लोकांसाठी आज विशेष भाग्याचा दिवस आहे. शुभ रंग : Orange शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 आणि 9 दान : तांब्याच्या धातूचा छोटासा तुकडा दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजच्या दिवसाची सुरुवात दान करणं, वाटप करण्याने करा. तुमच्या मोठ्या कंपन्यांशी असलेल्या संबंधांमुळे तुम्हाला त्याचा भविष्यात चांगला फायदा होईल; पण सध्या तरी काही काळ संघर्ष करावा लागेल, तेव्हा थोडा संयम ठेवा. आज तुम्हाला आर्थिक फायदा भरपूर होणार आहे आणि प्रॉपर्टी आणि मशिनरी खरेदी करण्याबाबतचे निर्णय तुमच्यासाठी फायद्याचे ठरतील. अनेक जबाबदाऱ्या, कायदेशीर वाद यामुळे ताणतणाव खूप असेल. हा ताण लवकरच निवळेल. डॉक्टर्स आणि उत्पादकांना आज त्यांच्या कामगिरीमुळे गौरव वाटेल. तुमच्या जोडीदाराबरोबर काही वाद होण्याची शक्यता आहे, तेव्हा डोकं शांत ठेवा. आज धान्य दान करा आणि आंबट फळं अवश्य खा. शुभ रंग : Purple शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : गरजूंना छत्री दान करा #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुम्ही दुखावले जाण्याची किंवा तुमची थोडीशी बदनामी/अपमान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आज तुम्ही गर्दीपासून थोडंसं लांबच राहा. ज्यांना आपल्या भावना व्यक्त करायला आवडतात त्यांच्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. व्यावसायिक संबंध आणि करार प्रत्यक्षात येण्यासाठी काही वेळ लागेल. मीडिया आणि ग्लॅमर इंडस्ट्रीतल्या व्यक्तींना प्रसिद्धी मिळेल आणि राजकीय नेत्यांना आज मोठ्या संधी मिळतील. त्यामुळे सार्वजनिक व्यक्तिमत्त्वांनी आणि विद्यार्थ्यांनी आजचा दिवस यश मिळवण्यासाठी कामी आणावा. विद्यार्थी, प्रशिक्षक, संगीतकार, लेखक, डिझायनर्स, डॉक्टर, वकील, इंजिनीअर आणि अभिनेत्यांनी मिळणारी लोकप्रियता एंजॉय करा. शुभ रंग : Red शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : लाल मसूर दान करा. 27 जुलै रोजी जन्मलेले सेलिब्रिटीज : राहुल बोस, कृती सॅनॉन, के. एस. चित्रा, उद्धव ठाकरे, विश्वमोहन भट
First published:

Tags: Astrology and horoscope, Numerology

पुढील बातम्या