मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology:अंकशास्त्रानुसार 26 जुलैचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या भविष्य

Numerology:अंकशास्त्रानुसार 26 जुलैचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या भविष्य

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 26 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 26 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 26 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 26 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज भरपूर मेहनत करण्याचा दिवस आहे. तसंच तुम्हाला संयम बाळगावा लागेल. आज काही अडचणी समोर येतील; मात्र तुमचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. आईचे आणि शिक्षकांचे आशीर्वाद तुमच्या कामी येतील. या दोन व्यक्तींना दुखावू नका. दुसऱ्यांच्या यशामुळे तुमचं काम झाकलं जाईल; मात्र त्याची चिंता करू नका. ही गोष्ट काही काळापुरतीच राहील. आज रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. विशेषतः नवीन गोष्ट करत असाल, नवीन ठिकाणी काम सुरू करत असाल, नवीन मित्र बनवत असाल किंवा बिझनेसमध्ये नवीन गुंतवणूक करत असाल, तर घरातल्या वडिलधाऱ्यांचा सल्ला अवश्य घ्या. पैशांचे व्यवहार सुरळीत पार पडतील. मेडिकल प्रॅक्टिशनर असलेल्या व्यक्तींना आज एक नवीन ऑफर मिळेल. शेती आणि शिक्षण क्षेत्रामध्ये फायदा होईल. शुभ रंग : Blue and Orange शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 3 दान : कृपया गरिबांना पिवळ्या डाळी दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमचा स्वभाव अती लवचिक असल्यामुळे इतर व्यक्ती कधी कधी तुमचा गैरफायदा घेतात. तुमच्या भावना कुठे दाखवायच्या आणि कुठे लपवायच्या हे तुम्हाला माहिती हवं. कामात प्रामाणिकपणा आणि सचोटी दाखवल्याने मोठं यश मिळेल. तुमच्या निरागसतेचा अन्य व्यक्ती फायदा घेऊ शकतात. त्यामुळे प्रॅक्टिकल विचार करणंच उत्तम. समुपदेशक, शिक्षक, डॉक्टर, इंजिनीअर, ब्रोकर या व्यक्तींसाठी भाग्याचा दिवस. लिक्विड बिझनेस, एक्स्पोर्ट-इम्पोर्ट, ट्रॅव्हल एजन्सी, शेअर मार्केट आणि पार्टनरशिप फर्म्स यांना मोठं यश मिळेल. जोडीदार किंवा सहकाऱ्यांकडून दुखावले गेल्यामुळे मूड खराब असेल; मात्र ही परिस्थिती तात्पुरत्या स्वरूपाची असेल. शुभ रंग : Sky Blue and Beige शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 दान : कृपया गायींना साखर खाऊ घाला. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्या ऑफिसमध्ये पूर्व दिशेला हिरव्या झाडाचं चित्र वा फोटो लावणं फायद्याचं ठरेल. कामाच्या ठिकाणी चांगलं नेतृत्व करण्यासाठी आणि इतरांवर छाप पाडण्यासाठी तुमच्या अंगभूत गुणांचा वापर करा. प्रेमात असलेल्या व्यक्तींनी आपल्या मनातल्या गोष्टी थेट बोलून दाखवणं फायद्याचं ठरेल. तुमची इमॅजिनेशन पॉवर, क्रिएटिव्ह थिंकिंग आणि संभाषण कौशल्य यामुळे कामाच्या ठिकाणी वरिष्ठांवर आणि घरी कुटुंबीयांवर चांगला प्रभाव पडेल. आज तुमच्या वस्तूंची काळजी घेण्याची गरज आहे. फॅमिली ग्रुपमध्ये तुमच्या प्रतिमेची काळजी घ्या. डिझायनर, लेखक, अभिनेते, संगीतकार अशा क्रिएटिव्ह व्यक्तींसाठी आणि मोटिव्हेशनल स्पीकर्स, तसंच क्रीडा प्रशिक्षकांसाठी भरपूर प्रसिद्धी मिळवून देणारा दिवस. बांधकाम आणि शेतीमध्ये गुंतवणूक करण्याची ही उत्तम वेळ आहे. दररोज सकाळी गुरुनामाचा जप करणं फायद्याचं राहील. शुभ रंग : Orange and Brown शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3 आणि 9 दान : कृपया मंदिरात एखादी लाकडी वस्तू दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज मंदिरात जाणं फायद्याचं आहे. तसंच, गरिबांची आणि प्राण्यांची सेवा करण्याची सवयदेखील लावून घेणं तुमच्यासाठी आवश्यक आहे. आज भरपूर पैसा मिळेल; मात्र त्या बदल्यात तब्येतीच्या किंवा कौटुंबिक तक्रारी येऊ शकतात. उच्च पदावर असलेल्या व्यक्तींची आणखी प्रगती होईल. विद्यार्थ्यांनी आज सरकारी नोकरीसाठी अर्ज करणं फायद्याचं ठरेल. आज कपडे दान केल्यामुळे पुण्य लाभेल. उत्पादक आणि डॉक्टरांना भरपूर आर्थिक नफा होईल. तसंच कामाचं कौतुकही होईल. आज दानधर्म करणं गरजेचं आहे. कृपया मांसाहार आणि मद्यपान टाळा. शुभ रंग : Blue शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया मंदिरात बांबूचं रोप दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्या घराच्या मध्यभागी एखादी इलेक्ट्रिक वस्तू असेल, तर तिची जागा बदला. यामुळे आजुबाजूची नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल. नवीन नोकरी शोधणाऱ्या व्यक्तींना चांगला पर्याय उपलब्ध होईल. आज नशीब जोरावर असल्यामुळे कित्येक अडथळे दूर होतील. तुमच्या जोडीदाराला तुमच्या मनातल्या भावना सांगण्यासाठी उत्तम दिवस. शेअर किंवा जमीन खरेदी करण्यासाठी, प्रॉपर्टी विकण्यासाठी, कागदपत्रांवर सही करण्यासाठी आणि क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी उत्तम दिवस. सॉफ्टवेअर इंजिनीअर, दिग्दर्शक, वकील आणि राजकीय व्यक्तींचं सर्व स्तरातून कौतुक होईल. आज बोलण्यावर ताबा ठेवणं गरजेचं आहे. शुभ रंग : Teal शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 6 दान : कृपया अनाथाश्रमातल्या मुलांना हिरवी फळं दान करा. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) शुक्र ग्रहाची शक्ती वाढवण्यासाठी शुक्रपूजा करणं उत्तम राहील. आजचा दिवस हा येणाऱ्या संधीचं सोनं करण्याचा आहे. करिअर वृद्धीसाठी बऱ्याच संधी समोर येतील. आज एकट्याने सर्व कामं करण्याऐवजी तुमच्या टीममध्ये वाटून केल्यास चांगले परिणाम दिसतील. कुटुंबीयांकडून आदर आणि आधार मिळाल्यामुळे समाधानी वाटेल. गृहिणी, डिझायनर, वकील, तंत्रज्ञान क्षेत्रातले कर्मचारी, राजकीय नेते आणि अभिनेत्यांसाठी भाग्याचा दिवस. शुभ रंग : Sky Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 आणि 9 दान : कृपया घरातल्या कामगारांना कॉस्मेटिक वस्तू दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुम्ही चामड्याचा पट्टा असलेलं घड्याळ वापरत असाल, तर ते सोडून चांदीचा किंवा चंदेरी रंगाचा धातूचा पट्टा असलेलं घड्याळ वापरणं सुरू करा. आज गोंधळाचा दिवस आहे, चिडचिड होईल. दुपारच्या जेवणानंतर एखादी नवी गोष्ट घडू शकते. आज येणाऱ्या नव्या ऑफर्स स्वीकारू नका. लवकरच रिलेशनशिप, आर्थिक गोष्टी आणि काम या सर्व बाबतीत चांगले दिवस सुरू होणार आहेत. आज रात्री उशिरापर्यंत पार्टी करणं टाळा. तसंच, जंक फूड खाणं टाळल्यास उत्तम. बिझनेसमध्ये आज कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीची मदत फायद्याची ठरेल. खेळाडूंना मोठं यश आणि भरपूर प्रसिद्धी मिळेल. विरुद्धलिंगी व्यक्ती आणि ज्येष्ठ व्यक्तींमुळे नशीब उजळेल. भगवान शंकराचे आशीर्वाद मिळवण्यासाठी अभिषेक करणं उत्तम. शुभ रंग : Green and Yellow शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 3 दान : कृपया भटक्या प्राण्यांना अन्न दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुमचे कामगार किंवा कनिष्ठ व्यक्तींसमोर रागावर नियंत्रण ठेवा. आज पैसे कमावण्यासाठी चांगला दिवस आहे; मात्र त्यासाठी तुमच्या तत्त्वांशी तडजोड करू नका. आज उपवास केल्यामुळे तब्येत चांगली राहील. समोरून ऑफर आल्यास मोठ्या ब्रँडसोबत टायअप करणं फायद्याचं ठरेल. आज घरापेक्षा जास्त वेळ ऑफिसमध्ये व्यतीत कराल. आज अकाउंट्स तपासण्याची गरज आहे. आज मृदू वाणी आणि दानधर्म या दोन गोष्टींचा भरपूर फायदा होईल. निसर्गाच्या सान्निध्यात काही वेळ व्यतीत केल्याने समाधान लाभेल. शुभ रंग : Purple शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया गरिबांना काळ्या वस्तू दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) शाळा आणि शिक्षण संस्थांना एखाद्या मोठ्या ब्रँडकडून भागीदारीची ऑफर येऊ शकते. ती टाळू नका. तुमची प्रसिद्धी ही तुमच्यासाठी मोलाची आहे. त्यामुळे नेहमीच अ‍ॅक्टिव्ह आणि दयाळू राहा. संगीतकार, डान्सर, अभिनेते, हीलर्स, प्रशिक्षक, ज्वेलर्स, समुपदेशक, सर्जन, राजकीय नेते आणि खेळाडूंना भरपूर प्रसिद्धी मिळेल. आजचा दिवस हा भरपूर संधींचा, प्रसिद्धीचा, आनंदाचा आणि उत्साहाचा राहील. हा उत्साह तुमच्या ध्येयाच्या दिशेने जाण्यासाठी वापरा. आज प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन आणि कमाई आरामात होईल. एकमेकांना वेळ देता येत नसल्यामुळे जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. शुभ रंग : Red शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया मंदिरात कुंकू दान करा. 26 जुलै रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : मुग्धा गोडसे, ऐश्वर्या लक्ष्मी, पंकजा मुंडे, जुगल हंसराज, सुमन रंगनाथन, जगदीश भगवती
First published:

Tags: Lifestyle, Numerology

पुढील बातम्या