Home /News /astrology /

Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' राशींसाठी आजचा दिवस उत्तम; काय सांगते तुमची जन्मतारीख; वाचा भविष्य

Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' राशींसाठी आजचा दिवस उत्तम; काय सांगते तुमची जन्मतारीख; वाचा भविष्य

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 2 ऑगस्ट 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 2 ऑगस्ट 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) कुटुंबातल्या ज्येष्ठांचे आशीर्वाद घेत राहा. कामगिरी चांगली होण्यासाठी तुमची प्रगल्भता उपयोगी होईल; पण इतरांनी तयार केलेल्या गुंतागुंतीचा तुमच्या कामगिरीवर परिणाम होईल. संयमी आणि सावध राहा. यश मिळवण्यासाठी ऑफिसमधल्या वरिष्ठांशी हातमिळवणी करा आणि मीटिंगसाठी प्रवास करण्याचं नियोजन करा. क्लायंट, नातेवाईक यांच्याशी हेल्दी नातेसंबंध तयार करण्यासाठी, त्यांचा विश्वास प्राप्त करण्यासाठी आज आणखी एक चांगला दिवस आहे. आज वैयक्तिक आयुष्यात तुम्हाला डिप्लोमॅटिक होण्याची गरज आहे. तुमच्या ज्ञानाची नव्या गुंतवणुकीसाठी यशस्वीपणे अंमलबजावणी केली जाईल आणि चांगला परतावा मिळेल. शुभ रंग : Beige शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 1 दान : गायींना किंवा गरिबांना पिवळं धान्य दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजच्या उद्भवणाऱ्या परिस्थितीत तुमचा आत्मसन्मान कमी होऊ देऊ नका. आजचा दिवस भावनांचा आणि दयाळूपणाचा आहे. देवाचे आणि कुटुंबातल्या ज्येष्ठांचे आशीर्वाद मिळाल्याबद्दल तुमच्या मनात कृतज्ञतेची भावना असेल. मास कम्युनिकेशन आणि शॉपिंगने सुरू होण्यासाठी चांगला दिवस. काँट्रॅक्ट सुरू करण्यासाठी चांगला दिवस. आज डिप्लोमॅटिक संभाषण महत्त्वाचं ठरेल. प्रिय व्यक्तींसमवेत भावनिक वेळ व्यतीत करण्यासाठी चांगला दिवस आहे. आज तुमची स्वप्नं सत्यात उतरण्याच्या दिशेने वाटचाल करणार आहेत. त्यामुळे दिवसाचा शेवट leisure activity ने करण्यासाठी तयार राहा. आज पांढऱ्या रंगाचे परिधान करणं उत्तम ठरेल. शुभ रंग : Creme शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 दान : मंदिरात चांदीचं नाणं दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्या गुरूंचे आशीर्वाद मिळण्यासाठी केळीचं झाड लावा आणि दररोज सकाळी साखरेच्या पाण्याचा नैवेद्य दाखवा. तुमचे शब्द आणि तुमची उपस्थिती यांतून तुम्ही इंटरव्ह्यू, तसंच प्रपोझल्समध्ये तुमचा प्रभाव पाडू शकता. आजचा दिवस सोशलायझेशन आणि तुमच्या मित्रांवर प्रभाव पाडण्यासाठी चांगला आहे. तुम्ही शिक्षक असाल, वक्ते असाल किंवा नृत्य, स्वयंपाक, डिझायनिंग, अभिनय, बँकिंग, मार्केटिंग, ऑडिटिंग आदी क्षेत्रांत असलात, तर आजचा दिवस तुमच्या टॅलेंटचं दर्शन घडवण्याचा आहे. फायनान्स आणि योग या क्षेत्रातले विद्यार्थी चांगल्या मार्क्सची अपेक्षा करू शकतात. शुभ रंग : Orange शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3, 9 दान : गायी किंवा गरिबांना केळी दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजच्या दिवसात बऱ्याच घडामोडी घडतील. आजचा दिवस भविष्यातल्या धोरणांबद्दलचा आहे. तुमचं सामान आणि कागदपत्रं सांभाळा. मशीन्स चालवताना सावधगिरी बाळगा. क्लायंट मीटिंग आणि प्रेझेंटेशन्स उत्तम होतील आणि कौतुक होईल. पैसे मिळवण्याच्या कल्पना, व्यायाम, ऑडिटिंग, कौन्सेलिंग, मार्केटिंग आदी गोष्टींत बराच वेळ व्यतीत करायला हवा. मॅन्युफॅक्चरिंग, मशिनरी, इलेक्ट्रॉनिक्स, हीलिंग, अभिनय, खेळ, राजकारण आदी क्षेत्रांत असलेल्यांनी कोलॅबोरेशन जरूर करावं. वैयक्तिक नातेसंबंधांत कोणताही गैरसमज असणार नाही आणि ते हेल्दी असतील. शांत राहण्यासाठी गोड खाण्याची गरज आहे. आजूबाजूच्या मित्रांसोबत काही वेळ व्यतीत करा. शुभ रंग : Blue शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : आश्रमात कपडे दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) प्रवास आणि पार्टीचा आनंद घेणं याच दिवसाचा बराच काळ जाईल. आज तुम्ही तुमच्यावरचं इतरांचं डॉमिनेशन सांभाळण्यासाठी सज्ज असलं पाहिजे. गुंतवणुकीचे प्लॅन्स एका दिवसासाठी रिटर्नेबल असतील. मीटिंगमध्ये Aqua रंगाचे कपडे घालणं फायद्याचं ठरेल. इंटरव्ह्यू, प्रपोझल्ससाठी आनंदाने बाहेर जा. आज प्रॉपर्टीशी संबंधित निर्णय योग्य ठरतील. प्रवास आवडणाऱ्या व्यक्ती परदेशात जाऊ शकतील किंवा जाण्याचा विचार करतील. जीवनशैलीत शिस्त महत्त्वाची आहे. आज तुम्ही प्रोफेशनल किंवा पर्सनल पार्टनर्सचा विश्वास प्राप्त करण्यात यशस्वी व्हाल. त्यामुळे आयुष्य आनंदी होईल. आजचा दिवस जुन्या मित्राला भेटण्याचा आहे. शुभ रंग : Aqua शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : अनाथांना हिरवी फळं दान करा. #नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुम्ही कुटुंबातल्या सर्वांचे, नातेवाईकांचे लाडके आहात. त्यामुळे आजचा दिवस वचनं आणि जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचा आहे. अनेक संधी आज तुमचं दार ठोठावतील. कुटुंबीय, मित्र, सहकारी आदींचा पाठिंबा असल्यामुळे तुम्हाला कृतज्ञ वाटेल. जोडीदारासोबत वेळ व्यतीत कराल. ऑफिसमध्ये प्रमोशनसाठी अप्रैझलची शक्यता. बिझनेसशी संबंधित योग्य निर्णय घेण्याची हुशारी तुमच्याकडे आहे. स्टॉक मार्केट गुंतवणूक अनुकूल ठरेल. रोमँटिक डेटमुळे नातेसंबंध दृढ होतील. गुडविल आणि रिसोर्सेसचा वापर करण्यासाठी तुमचं सोशल नेटवर्क मदत करील. शुभ रंग : Peach शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : भिकाऱ्यांना किंवा मुलांना पांढरी मिठाई दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांवर आंधळेपणाने विश्वास ठेवणं टाळा. आणखी एका भावनिक गोंधळामुळे तुमच्या मनातला गोंधळ आणखीच वाढेल. तुमच्या लायाबिलिटीज वाढवणं टाळा. स्टॉक्समध्ये गुंतवणूक करू शकता. आजचा दिवस प्रवास होईल, बिझनेस टार्गेट्स पूर्ण करावी लागतील. हीलिंग, वकिली, वैद्यकीय, मीडिया, एक्स्पोर्ट-इम्पोर्ट, पॉलिटिक्स आदी क्षेत्रांतल्या महिलांसाठी आजचा दिवस लकी आहे. विरुद्धलिंगी व्यक्तीच्या सजेशन्स स्वीकारण्याचा प्रयत्न करा. अकाउंट्स योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी सीएचा सल्ला घेणं योग्य राहील. बिझनेस डील्सना उशीर होईल. लग्नाचे प्रस्ताव विचार करण्यायोग्य असतील. भगवान शिवशंकराच्या मंदिरात जाऊन अभिषेक करणं चांगलं ठरेल. शुभ रंग : Sea Green शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : मंदिरात तांबं किंवा कासे धातूचा तुकडा दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुमची बिझनेसमध्ये जोखीम घेण्याची क्षमता खूप जास्त आहे. त्यामुळे त्यासह पुढे जायला हवं. आजचा दिवस स्वप्नपूर्तीसाठी लकी आहे. लीगल केसेस पैशांच्या साह्याने सेटलमेंट करून सुटतील. बिझनेस डील्स क्रॅक करण्यासाठी लवचिकता महत्त्वाची आहे. इगो बाजूला ठेवला पाहिजे. तुमच्या विनोदी स्वभावामुळे तुमचा पार्टनर प्रभावित होईल. विद्यार्थी, खेळाडू दानधर्म करतील. यशाबद्दल देवाचे आभार मानतील. आर्थिक व्यवहारांत दिवसभर व्यग्र असाल. त्यामुळे दिवसाच्या शेवटी समाधान वाटेल. व्हेज अन्न खाऊन आरोग्य राखा. वृद्धाश्रमात दानधर्म करणं गरजेचं आहे. शुभ रंग : Sea Blue शुभ दिवस : शनिवार शुभ अंक : 6 दान : गरजूंना चपला दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) डॉक्टर्स आणि इंजिनीअर्सना आज मंगळ ग्रहाची पूर्ण शक्ती मिळेल. त्यामुळे त्यांना स्वतःची ब्रँड इमेज तयार करण्यास मदत होईल. नवी ऑफर स्वीकारणाऱ्यांसाठी, जागेत स्थलांतर करणाऱ्यांसाठी, नवे नातेसंबंध सुरू करणाऱ्यांसाठी, इंटरव्ह्यूला जाण्यासाठी, नव्या घरात जाण्यासाठी आज चांगला दिवस आहे. प्रेमात असलेल्या व्यक्तींनी पुढे जाऊन आपल्या पार्टनरला प्रपोझ केलं पाहिजे. बिझनेस रिलेशन्स आणि डील्स अगदी सुरळीतपणे होतील. पॉलिटिक्स, मीडिया, फायनान्स, शिक्षण आदी क्षेत्रांत असलेल्यांची प्रगती चांगली होईल. सरकारी अधिकाऱ्यांना प्रश्नांना सामोरं जावं लागेल. त्यामुळे प्रामाणिक राहा, जेणेकरून वरिष्ठांवर उत्तम प्रभाव पडेल. डिझायनिंग इंडस्ट्रीत असलेल्यांनी इंटरव्ह्यूला जावं किंवा स्पर्धा परीक्षेला बसावं. पालकांना आज आपल्या मुलांचा अभिमान वाटेल. विरुद्धलिंगी व्यक्तीकडून बिझनेसमध्ये विश्वास प्राप्त केला जाईल. आज चांगला नफा मिळेल. शुभ रंग : Brown शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : मंदिरात ब्राउन राइस दान करावा. 2 ऑगस्ट रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : विजय रूपाणी, सिद्धार्थ रॉय कपूर, पिंगळी व्यंकय्या, सुषमा रेड्डी, रमेश बैस
First published:

Tags: Numerology

पुढील बातम्या