मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology: 1, 10, 19, 28 तारखांना जन्मलेल्या व्यक्तिंना आज मिळेल यश; सूर्य-चंद्रदर्शन घेणं आवश्यक

Numerology: 1, 10, 19, 28 तारखांना जन्मलेल्या व्यक्तिंना आज मिळेल यश; सूर्य-चंद्रदर्शन घेणं आवश्यक

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 19 ऑगस्ट 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 19 ऑगस्ट 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 19 ऑगस्ट 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

    ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 19 ऑगस्ट 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) सकाळची वेळ काहीशी संथ वाटेल; मात्र उरलेला दिवस हा पूर्णपणे उत्साहाचा असेल. सर्व कामं वेळेवर पूर्ण कराल. आज तुम्ही जपलेल्या नातेसंबंधांमुळे सर्व गोष्टी आरामात पार पडतील. यश मिळवण्यासाठी सूर्यदेव आणि चंद्रदेवतेचा आशीर्वाद घेणं गरजेचं आहे. रोमँटिक वातावरणामुळे आनंदी असाल. खेळाडूंना मोठं यश मिळेल. कामाच्या ठिकाणी कृत्रिम सूर्यफुलं ठेवल्यास फायदा होईल. शुभ रंग : Yellow and Blue शुभ दिवस : रविवार आणि शुक्रवार शुभ अंक : 1 आणि 9 दान : कृपया सूर्यफुलाचं तेल दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) प्रेमसंबंध किंवा बिझनेस रिलेशन्स अधिक मजबूत करण्यासाठी उत्तम दिवस. दिवसाच्या सुरुवातीला तुम्ही भूतकाळातल्या आठवणींमध्ये हरवलेले असाल. काम आणि वैयक्तिक आयुष्य यांचा योग्य समतोल राखा. तुमच्या मुलांसोबत वेळ व्यतीत करण्यासाठी उत्तम दिवस. आज केलेल्या गुंतवणुकीचा चांगला परतावा मिळेल. विशेषतः घर किंवा व्यावसायिक प्रॉपर्टी व्यवहारातून फायदा होईल. लिक्विड, इलेक्ट्रॉनिक्स, धान्य, ज्वेलरी, केमिकल्स, औषध आणि एक्सपोर्ट-इम्पोर्ट व्यवसायातल्या व्यक्तींना विशेष लाभ होईल. शुभ रंग : Sky Blue शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 दान : कृपया आज भिक्षेकऱ्यांना दूध दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्या कौशल्याबद्दल आज समाजातून भरपूर कौतुक आणि रिवॉर्ड मिळेल. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल; मात्र काहीसं असुरक्षित वाटत असल्यामुळे सेलिब्रेशन करता येणार नाही. बिझनेस डील्सबाबत केवळ लेखी संवादाला प्रत्युत्तर द्या. राजकीय व्यक्ती किंवा सरकारी अधिकाऱ्यांना आज लोकांचं लक्ष आकर्षित करणं शक्य होईल. विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यापूर्वी किंवा मुलाखतीपूर्वी गुरुमंत्राचा जप करावा. गुरू ग्रहाची शक्ती वाढवण्यासाठी पिवळ्या रंगाचे पदार्थ बनवून संपूर्ण कुटुंबाला खाण्यास द्या. आज सर्व क्षेत्रांत यश मिळेल. शुभ रंग : Orange शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3 आणि 1 दान : कृपया मंदिरात कच्ची हळद दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. मौखिक संवादाच्या माध्यमातून भरपूर काही साध्य करण्याचा आजचा दिवस आहे. सरकारी कंत्राट मिळवण्यासाठी पैशांची भूमिका महत्त्वाची ठरेल. कायदेशीर प्रकरणांमध्ये दुसऱ्यांच्या सल्ल्यापासून सावध राहा, तुमच्या मनाचंच ऐका. वैयक्तिक नातेसंबंधांना भावनिक वळण मिळेल, संवाद साधत राहा. व्यायाम करणं गरजेचं आहे. शुभ रंग : Blue शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया प्राण्यांना अन्न खाऊ घाला. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) भूतकाळातल्या आठवणींकडे दुर्लक्ष करा. अन्यथा सध्याच्या नातेसंबंधांवरदेखील वाईट परिणाम होतील. नवीन जागा, नवीन पोझिशन, नवीन डील अशा गोष्टींची ऑफर येऊ शकते. तुमच्या सहकाऱ्यांपासून सावध राहा. ते तुमची भावनिक फसवणूक करू शकतात. आज मुलाखतींचे प्लॅन रद्द करा. मीटिंगमध्ये हिरव्या रंगाचे कपडे घातल्याने फायदा होईल. आज पार्टी करणं किंवा मांसाहार टाळा. रोमँटिक रिलेशनशिप अधिक बळकट होतील. प्रॉपर्टी संबंधी निर्णय तुमच्या बाजूने ठरतील. खेळात मोठं यश मिळेल. शुभ रंग : Green शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : कृपया वृद्धाश्रमांमध्ये रोपं दान करा. #नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज निर्णय घेण्यासाठी तुमचा सिक्स्थ सेन्स वापरा. सर्वांवर विश्वास ठेवणं ही तुमच्या व्यक्तिमत्त्वाची खरं तर कमकुवत बाजू आहे. त्यामुळे जोडीदार निवडताना व्यावहारिक विचार करून आणि हुशारीने निर्णय घ्या. कुटुंबीय, मित्र आणि सहकारी सगळ्यांची तुम्हाला साथ आहे; तरीही तुम्ही सध्या खांद्यावर आणखी जबाबदाऱ्या घेणं टाळा. ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन देण्यासाठी, तसंच जोडीदारासोबत काही वेळ व्यतीत करण्यासाठी योग्य दिवस. सरकारी टेंडरच्या बाबतीत रिस्क घेऊ शकता. वाहन, मोबाइल, घर इत्यादी गोष्टींच्या खरेदीसाठी किंवा छोटीशी सहल प्लॅन करण्यासाठी उत्तम दिवस. शेअर मार्केटमधली गुंतवणूक फायद्याची ठरेल. दिवस रोमँटिक असेल, त्यामुळे आनंदी असाल. शुभ रंग : Aqua शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया मंदिरात चांदीचं नाणं दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्या मनात एखादी गोष्ट किंवा सल्ला असेल, तर तो जोडीदाराला सांगावा. भविष्यात फायदा होईल. दिवसभरात बरेच चढ-उतार दिसतील; मात्र शेवटी भरपूर फायदा होईल. पैशांचे व्यवहार करताना खबरदारी घेणं गरजेचं आहे. तसंच कायदेशीर कागदपत्रंदेखील पुन्हा तपासण्याची गरज आहे. ज्येष्ठ व्यक्तींसोबत काही काळ व्यतीत करा आणि त्यांचा सल्ला ऐका. विरुद्धलिंगी व्यक्तीने दिलेला सल्ला स्वीकारण्याची तयारी ठेला. सॉफ्टवेअर, डिफेन्स, गोल्ड, पेट्रोल, बेव्हरेज, आणि कॉस्मेटिक्स या क्षेत्रांमधली बिझनेस डील्स यशस्वी होतील. विवाहाचे अनुरूप प्रस्ताव येतील. आज भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन आशीर्वाद घेणं गरजेचं आहे. लहान ब्रँडसोबत भागीदारी करण्यासाठी चांगला दिवस. शुभ रंग : Yellow शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : कृपया मंदिरात पिवळं कापड दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुम्ही भरपूर उत्साही असाल; शरीरात आश्चर्यकारक ऊर्जा असेल. ही ऊर्जा यश मिळवण्यासाठी वापरा. तुम्ही बऱ्याच जणांसाठी मार्गदर्शक व्हाल; मात्र अगदी कठोर वागू नका. कायदेशीर प्रकरणं सोडवण्यासाठी पैशांची वा प्रभावी व्यक्तीची मदत घ्याल. पैसा वाढवण्यासाठी तुमच्या जोडीदाराची मोलाची मदत होईल. विद्यार्थ्यांनी परदेशात शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करावा. सध्या भरपूर फी भरावी लागत असली, तरी भविष्यात त्याचा फायदाच होणार आहे हे लक्षात घ्यावं. तुम्ही सध्या प्रचंड मेहनत घेत आहात, त्यामुळे सर्व निर्णय हे तुमच्याच फायद्याचे ठरत आहेत. खेळाडूंसाठी आज विशेष भाग्याचा दिवस आहे. आज प्रवासाचे बेत टाळावेत. तसंच दानधर्म अवश्य करावा. शुभ रंग : Sea Green शुभ दिवस : शनिवार शुभ अंक : 6 दान : कृपया गरजूंना तेल दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) महिलांसाठी आज भाग्याचा दिवस, आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. उच्चपदस्थ व्यक्तींसोबत ओळखी वाढवून प्रगती साधण्याचा आजचा दिवस आहे; मात्र आपल्या अधिकारांचा गैरवापर करू नका. बिझनेस रिलेशन आणि व्यवहार सुरळीत पार पडतील. सोलर पॉवर, शिक्षण, ग्लॅमर, सॉफ्टवेअर, गूढविद्या, संगीत, मीडिया या क्षेत्रांतल्या व्यक्तींना, तसंच सरकारी अधिकाऱ्यांना प्रसिद्धी मिळेल. तरुणांना नवीन पद ऑफर केलं जाईल. आज तुम्ही घेतलेले सर्व निर्णय योग्य ठरतील. कोलॅबोरेशन, मुलाखत देणं, भाषण करणं, स्पर्धा परीक्षा देणं अशा गोष्टींमध्ये यश मिळेल. खेळाडूंच्या पालकांना त्यांच्या मुलांचा अभिमान वाटेल. डॉक्टर आणि सर्जन यांना पुरस्कार मिळेल. महिलांनी आज शारीरिक व्यायाम करावा. शुभ रंग : Orange and Red शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया मंदिरात कुंकू दान करा. 19 ऑगस्ट रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : सत्या नाडेला, सुधा मूर्ती, बिल क्लिंटन, नंदना सेन, गोविंद निहलानी, विजय कुमार
    First published:

    Tags: Numerology

    पुढील बातम्या