मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology: जन्मतारखेनुसार तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस; अंकशास्त्रानुसार जाणून घ्या भविष्य

Numerology: जन्मतारखेनुसार तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस; अंकशास्त्रानुसार जाणून घ्या भविष्य

18 ऑगस्ट 2022 रोजीचं अंकशास्त्र

18 ऑगस्ट 2022 रोजीचं अंकशास्त्र

अंकशास्त्रानुसार 18 ऑगस्ट 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 18 ऑगस्ट 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) किचनमध्ये असणाऱ्या गॅस शेगडीच्या वरती सूर्यदेवाचं चित्र लावा. आज तुमच्या सर्व कल्पना सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करा. दिवस भाग्याचा आहे. स्पर्धांमध्ये मोठं यश मिळवाल. गॅदरिंग, कार्यक्रम अशा ठिकाणी बोलण्याची किंवा इतरांवर छाप पाडण्याची संधी सोडू नका. तुमच्या संवादकौशल्यामुळे बरेच जण प्रभावित होतील. त्यामुळे आज अधिकाधिक जनसंवाद साधण्याचा प्रयत्न करा. सर्व जोडप्यांसाठी उत्तम दिवस. सरकारी अधिकारी, डॉक्टर, संगीतकार आणि ग्लॅमर क्षेत्रातल्या व्यक्तींना भरपूर प्रसिद्धी मिळेल. शुभ रंग : Orange and Green शुभ दिवस : रविवार आणि मंगळवार शुभ अंक : 3 आणि 1 दान : कृपया लहान मुलांना केशरी पेन दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) कामाच्या ठिकाणी एखादी हलणारी शोभेची वस्तू ठेवा. आज कुटुंबीय आणि मित्रांची साथ लाभेल. लहान लहान अडचणी आता दूर होतील. भूतकाळातल्या आठवणींमध्ये जास्त रमणं टाळा. तसंच बोलताना मुत्सद्देगिरीचा वापर करा. कन्सल्टन्सी फर्म्सना चांगलं यश मिळेल. शेअर मार्केट गुंतवणूक आणि एक्सपोर्ट-इम्पोर्ट व्यवसायात फायदा होईल. रिलेशनशिपमध्ये रोमान्स वाढेल. त्यामुळे समाधानी असाल. अर्थात, त्यासाठी तुम्हाला दोघांमध्ये इतरांच्या प्रभावापासून दूर राहणं गरजेचं आहे. शुभ रंग : Pink शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 दान : कृपया आज भिक्षेकऱ्यांना दही दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज प्रवासासाठी तयार राहा.तुम्ही पब्लिक फिगर असाल, तर तुम्हाला भरपूर प्रसिद्धी मिळेल. क्रिएटिव्ह क्षेत्रातल्या कलाकारांना मोठी संधी मिळेल. या आठवड्यात केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला याच आठवड्यात मिळणार आहे. तुमच्या योजना या कागदावर तयार ठेवा. अभिनेते, डिझायनर, संगीतकार, लेखक, राजकीय नेते आणि वकील यांच्यासाठी भाग्याचा दिवस. कपडे किंवा शोभेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी चांगला दिवस. डॉक्टर, निवेदक, हॉटेल व्यावसायिक, प्रशिक्षक, फायनान्सर आणि डान्सर या व्यक्तींना मोठं यश मिळेल. दिवसाच्या सुरुवातीला पिवळा भात खाणं उत्तम. शुभ रंग : Red शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3 आणि 9 दान : कृपया मंदिरात चंदन दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) सध्या नशीब तुमच्या बाजूने आहे. त्यामुळे करिअरमध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. बिझनेस व्यवहार वेळेवर पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत घेतलेले मोठे निर्णय फायद्याचे ठरतील. थिएटर कलाकार, निवेदक आणि डान्सर असणाऱ्या व्यक्तींनी ऑडिशन चुकवू नये. मेटल आणि कापड उत्पादकांना दिवसाच्या शेवटी मोठा फायदा होईल. कृपया आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. मांसाहार टाळा. शुभ रंग : Purple शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया मंदिरात धातूचा तुकडा दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज एकमेकांप्रति विश्वास ठेवला, आणि आळशीपणा बाजूला ठेवला तर भरपूर फायदा होईल. एक्सपोर्ट-इम्पोर्ट व्यवसायातून भरपूर आर्थिक फायदा होईल. तुमच्या जोडीदाराकडून मिळणारं प्रेम आणि आदर या गोष्टींची जाणीव तुम्हाला असणं गरजेचं आहे. शेअर मार्केट, स्पोर्ट्स, समारंभ, मुलाखती, स्पर्धा परीक्षा अशा गोष्टींमध्ये नशीब आजमावू शकता. तुमचा जोडीदार आज पूर्ण वेळ तुमच्यासोबत असेल. शुभ रंग : Sea Green and Red शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : कृपया पाळीव प्राण्यांना द्रव पदार्थ द्या. #नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज भगवान विष्णू आणि लक्ष्मीपूजा केल्याने फायदा होईल. जोडीदाराची चांगली वागणूक तुमचे नातेसंबंध अधिक बळकट करेल. अ‍ॅक्सेसरीज, फूड, ज्वेलरी, रिटेल, कापड या व्यवसायातल्या व्यक्ती आणि अभिनेत्यांना नवीन संधी आणि फायदे मिळतील. आजचा दिवस अगदी ऐशोआराम आणि समाधानाचा आहे. जोडीदारासोबत सुरू असणारे वाद मिटवून एकत्र शॉपिंगला जाणं फायद्याचं ठरेल. डिझायनर, इव्हेंट मॅनेजर, ब्रोकर, शेफ आणि विद्यार्थ्यांना नवीन काम मिळेल, ज्यामुळे त्यांची प्रगती होईल. रोमँटिक रिलेशनशिपमुळे आनंदी व्हाल. शुभ रंग : Violet शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया भिक्षेकऱ्यांना पांढरा भात दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) दिवसाची सुरुवात आईचा आशीर्वाद घेऊन करा, सर्व बाबतीत विजय प्राप्त कराल. तुमचे सहकारी आणि जोडीदारावर विश्वासाने एखादी जबाबदारी देऊ शकाल. समोर येणाऱ्या आव्हानाचा स्वीकार करा. हुशारीने त्यावर मात कराल. आई, बहीण किंवा पत्नीने दिलेला सल्ला नक्की स्वीकारा. एखादी अडचण सोडवण्यासाठी वेगळा विचार करणं फायद्याचं ठरेल. बिझनेस किंवा पर्सनल आयुष्यात येणारं एखादं प्रपोझल स्वीकारा, फायदा होईल. वकील, नाट्य कलाकार, सीए, सॉफ्टवेअर क्षेत्रातल्या व्यक्ती या सर्वांसाठी भाग्याचा दिवस. शुभ रंग : Orange शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 आणि 9 दान : कृपया तांब्याची एखादी छोटी वस्तू दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) प्राण्यांवर प्रेम करणं आणि त्यांच्यासाठी वेळोवेळी अन्नदान करणं गरजेचं आहे. त्यांच्यावर हिंसा करू नये. सरकारी अधिकारी, सेल्स क्षेत्रातल्या व्यक्ती, प्रॉपर्टी बिल्डर, मीडिया आणि तंत्रज्ञ कर्मचारी या सर्व व्यक्तींना कंपनीकडून प्रमोशन किंवा कॉम्पेन्सेशन मिळेल. कायदेशीर प्रकरणं मिटण्यासाठी आणखी थोडा वेळ लागेल. डॉक्टर आणि उत्पादकांना मोठं यश मिळेल. जोडीदारासोबत प्रत्यक्षात वाद होऊ शकतात. त्यामुळे डोकं थंड ठेवा. आज धान्य दान करणं, आणि लिंबूवर्गीय पदार्थ खाणं गरजेचं आहे. शुभ रंग : Deep Purple शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया गरिबांना खारवलेले पदार्थ दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज कुटुंबीयांसोबत आणि नातेवाईकांसोबत काही वेळ व्यतीत करा. भरपूर फायदा आणि प्रसिद्धी दोन्ही एकत्रितपणे तुम्हाला मिळेल. पैसा, नशीब, आनंद, स्थैर्य आणि ऐशोआराम या सर्व गोष्टी आज नशीबात आहेत. ग्लॅमर आणि मीडिया क्षेत्रातल्या व्यक्तींना प्रसिद्धी मिळेल. राजकीय व्यक्तींना मोठ्या संधी मिळतील. पब्लिक फिगर असणाऱ्या व्यक्तींनी एकत्रित काम करून प्रगती करणं फायद्याचं ठरेल. प्रशिक्षक, डिझायनर, डॉक्टर, वकील, इंजिनीअर आणि अभिनेत्यांना भरपूर प्रसिद्धी मिळेल. शुभ रंग : Red शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया लाल मसूर दान करा. 18 ऑगस्ट रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : गुलजार, निर्मला सीतारामन, संदीप पाटील, बाजीराव, विजयालक्ष्मी पंडित, दलेर मेहंदी
First published:

Tags: Numerology

पुढील बातम्या