मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology: स्वातंत्र्यदिनी जन्मलेल्या व्यक्तींसाठी आज झक्कास दिवस; जन्मतारखेनुसार जाणून घ्या भविष्य

Numerology: स्वातंत्र्यदिनी जन्मलेल्या व्यक्तींसाठी आज झक्कास दिवस; जन्मतारखेनुसार जाणून घ्या भविष्य

अंकशास्त्रानुसार 15 ऑगस्ट 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

अंकशास्त्रानुसार 15 ऑगस्ट 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

अंकशास्त्रानुसार 15 ऑगस्ट 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 15 ऑगस्ट 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) संपूर्ण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागेल. गरजेनुसार झुकायची तयारी ठेवा. आज भरपूर जबाबदाऱ्या अंगावर घ्याल. काही कालावधीमध्ये समाजात पत वाढेल. एखाद्या जुन्या मित्राचा सल्ला ऐका. कायदेशीर प्रकरणामध्ये तुम्हाला मदत करू शकेल अशा एखाद्या व्यक्तीची भेट होईल. अभिनेत्यांनी आज येणारी ऑफर स्वीकारावी. कृपया चामड्याच्या वस्तू वापरणं टाळा. शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 9 दान : कृपया आश्रमात पिवळ्या डाळी दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) वैयक्तिक गोष्टींबाबत निर्णय घेताना कृपया भावनांना आवर घाला. एखाद्या मित्रामुळे आयुष्यात आनंद येईल. रोमँटिक नातेसंबंध आणि मुलांसोबतची नाती विश्वासार्ह आणि चांगली असतील. तुमच्या मनातल्या भावना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी चांगला दिवस. बिझनेस कमिटमेंट आरामात पार पडतील. एखाद्या मोठ्या कंपनीसोबत पार्टनरशिप करण्यासाठी योग्य वेळ आहे. राजकीय व्यक्तींनी कागदपत्रांवर सही करताना खबरदारी घ्यावी. सेवा क्षेत्रातल्या व्यक्तींना भरपूर यश मिळेल. शुभ रंग : Sky Blue शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 आणि 6 दान : कृपया गरिबांना पांढरा भात दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) गुरू ग्रहाची ताकद वाढवण्यासाठी केळीच्या झाडाला साखरेचं पाणी घाला. कलाकार, गृहिणी, रिटेलर, बेकर्स किंवा शेफ, राजकीय व्यक्ती आणि पब्लिक डीलर्स यांच्यासाठी भाग्याचा दिवस. तुमच्या मित्रांसोबत आर्थिक बाबींवर चर्चा करणं टाळा. संगीतकार, डिझायनर, विद्यार्थी, वृत्त निवेदक, राजकीय व्यक्ती, अभिनेते, कलाकार, गृहिणी, हॉटेल व्यावसायिक आणि लेखकांना करिअरसंबंधी एखादी विशेष बातमी मिळेल. शुभ रंग : Red and Pink शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3 आणि 1 दान : कृपया गरजूंना लेमन राइस दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) बिझनेस व्यवहारांसाठी प्रवास संभवतो. तुमचं नशीब जोरावर आहे. त्यामुळे घडामोडी वेगात घडतील. हातातली सर्व कामं वेळेवर पूर्ण होतील. कपडे किंवा चपला दान केल्यामुळे आश्चर्यकारक परतावा मिळेल. बांधकाम, मशीनरी, सॉफ्टवेअर आणि ब्रोकर्स या व्यवसायातल्या व्यक्तींनी आज कागदपत्रांवर सही करणं टाळा. पालकांना आपल्या मुलांचा अभिमान वाटेल. प्रोफेशनल लाइफ उत्तम राहील. शुभ रंग : Blue शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया अनाथाश्रमांमध्ये कपडे दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुम्ही चर्चेचा विषय ठराल, सर्वांचं लक्ष तुमच्याकडेच राहील. आज घरूनच काम करा. ज्यामुळे कुटुंबीयांना आणि मित्रांना वेळ देता येईल. नवीन गुंतवणूक आरामात शक्य होईल. तुमच्या कामासाठी प्रसिद्धी मिळेल. प्रॉपर्टी किंवा शेअर्समध्ये गुंतवणूक फायद्याची ठरेल. खेळाडू आणि ट्रॅव्हलर व्यक्तींसाठी भाग्याचा दिवस. मीटिंगमध्ये जाताना हिरव्या रंगाचे कपडे घातल्याने फायदा होईल. तुमचा प्रियकर वा प्रेयसीला प्रपोझ करण्यासाठी उत्तम दिवस. शुभ रंग : Sea Green शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : कृपया गरिबांना हिरवी फळं दान करा. #नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्या भूतकाळातल्या चांगल्या कामांचे परिणाम आता दिसून येतील. या कामांमुळेच तुमचे सध्याचे दिवस भाग्याचे आणि आरामाचे असणार आहेत. तुमच्या देशभक्तीच्या भावनेमुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल. कामाव्यतिरिक्त इतर संधी शोधण्यासाठी चांगला दिवस. कौटुंबिक कार्यक्रम, मित्रांची भेट, कौटुंबिक सहल, पिकनिक, स्टेज परफॉर्मन्स किंवा शॉपिंगसाठी उत्तम दिवस. तुमच्या आनंदी आयुष्यासाठी देवाचे आभार नक्की माना. डिझायनर, डान्सर, ज्वेलर्स, अभिनेते, जॉकी आणि डॉक्टरांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. वडील आपल्या मुलांना भविष्यासाठी मार्गदर्शन करतील. शुभ रंग : Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया महिलांना निळं कापड दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) घराच्या पूर्व दिशेला एक विंडचाइम लावा. सध्याचे काही दिवस बऱ्याच चांगल्या-वाईट घटना घडतील; मात्र तुमचे सहकारी आणि कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळे सर्व अडचणींवर मात कराल. आर्थिक निर्णय घेताना तुमची हुशारी कामी येईल. नातेसंबंधात विश्वास आणि आदर मिळेल. आज कागदपत्रांबाबत खबरदारी घेणं आणि ऑडिट करणं गरजेचं आहे. सरकारी टेंडर, रिअल इस्टेट, शाळा, इंटीरिअर आणि धान्य या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींसाठी भाग्याचा दिवस. भावनिक न राहता निर्णय घेतल्यास बिझनेस रिलेशन्स चांगली राहतील. शुभ रंग : Orange and Blue शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : कृपया मंदिरात पिवळी मिठाई दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) नेहमी प्राण्यांसाठी मनापासून दानधर्म, सेवा करणं गरजेचं आहे. तुमचे आर्थिक निर्णय फायद्याचे ठरणार आहेत. यामुळे भरपूर स्थैर्य प्राप्त होईल. कुटुंबातल्या वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला ऐका. तुम्ही सध्या भरपूर जबाबदाऱ्या तुमच्या खांद्यावर घेऊ शकता. तुम्हाला लवकरच मोठं यश मिळणार आहे. करार किंवा मुलाखती टाळू नका. आज कुटुंबीयांसोबत वेळ व्यतीत करणं गरजेचं आहे. आर्थिक आणि प्रेमसंबंध अशा दोन्ही पातळींवर भाग्य तुमच्या बाजूने असेल. शुभ रंग : Sea Blue and Red शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया गरिबांना ब्राउन राइस दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) दिवसाची सुरुवात कपाळावर चंदन किंवा कुंकू लावून करा. मेडिकल सायन्स क्षेत्रातल्या व्यक्तींना आज नाव आणि प्रसिद्धी कमावण्याची उत्तम संधी प्राप्त होईल. वैज्ञानिक, खेळाडू, विद्यार्थी आणि ग्लॅमर, फायनान्स, अ‍ॅस्ट्रॉलॉजी, वास्तू आणि आर्किटेक्चर क्षेत्रातल्या व्यक्तींना भरपूर यश मिळेल. बिझनेस किंवा नोकरीमध्ये मोठं पद मिळवण्यासाठी ओळखींचा वापर करून घ्याल. आज लाल रंगाचे कपडे घालणं फायद्याचं ठरेल. डान्सर, गायक, डिझायनर, पेंटर, आणि गृहिणी यांनी आरोग्याची काळजी घ्यावी. आज मांसाहार कटाक्षाने टाळा. शुभ रंग : Red शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 आणि 6 दान : कृपया गरिबांना लाल फळं दान करा. 15 ऑगस्ट रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : श्री अरविंद, राखी गुलजार, अदनान सामी, अयान मुखर्जी, रमेश पोखरियाल, ए. के. हंगल
First published:

Tags: Numerology

पुढील बातम्या